1 00:00:03,180 --> 00:00:04,749 मी, महमूद अगिओर्ली 2 00:00:04,773 --> 00:00:07,507 आणि TEDसाठी स्वयंसेवी भाषांतरकार म्हणून काम करतो. 3 00:00:07,938 --> 00:00:09,257 मूळचा सीरियाचा रहिवासी आहे. 4 00:00:09,281 --> 00:00:12,615 आणि मी उत्तरेत वसलेल्या अलेप्पो या शहरातला आहे. 5 00:00:13,187 --> 00:00:15,960 हे प्राचीन शहर आहे, तसं पाहिलं तर -- 6 00:00:15,984 --> 00:00:19,405 तिथे ३००० वर्षांपासून आहे. 7 00:00:19,792 --> 00:00:22,330 परंतु अलीकडे, फक्त ४ वर्षांत, सर्वकाही नष्ट झालं. 8 00:00:22,354 --> 00:00:27,534 माझी ठिकाणं, आठवणी आणि इमारती ज्यांची मला आस्था आहे 9 00:00:27,558 --> 00:00:28,708 सर्व बेचिराख झालं. 10 00:00:28,831 --> 00:00:33,573 ते आगीत खाक झाले किंवा बॉम्बहल्ल्याला बळी पडले, नामशेष झाले. 11 00:00:33,597 --> 00:00:36,698 आजघडीला ती ठिकाणं तिथे नाहीत. 12 00:00:37,929 --> 00:00:40,546 आम्ही एडमला खूप काही गोष्टी सांगू, 13 00:00:40,570 --> 00:00:44,687 पण खरंतर, आम्हाला याचं खूप दुःख होतंय की तो त्या अनुभवू शकत नाही. 14 00:00:45,390 --> 00:00:51,613 आणि ही गोष्ट माझ्या मनाला टोचून गेली, प्रत्यक्षात, एक स्त्री आणि एक आई म्हणून.. 15 00:00:53,441 --> 00:00:57,207 की माझं बाळ भेट देऊ शकणार नाही... 16 00:00:58,731 --> 00:01:02,027 त्याच्या बाबांच्या गावाला किंवा आईच्या गावाला. 17 00:01:02,723 --> 00:01:03,873 तर असं आहे हे. 18 00:01:06,121 --> 00:01:08,230 मी आणि भाऊ आम्ही दोघं स्थापत्य अभियंते आहोत. 19 00:01:08,254 --> 00:01:13,089 आणि आम्ही तिथे अभियांत्रिकी सल्लागार कार्यालय उघडायचं स्वप्न पाहत होतो. 20 00:01:13,113 --> 00:01:18,473 पण त्या प्रस्तावित अभियांत्रिकी कार्यालयाची जागा 21 00:01:18,497 --> 00:01:20,903 एका संवेदनशील भागात होती. 22 00:01:20,927 --> 00:01:23,270 म्हणून तेसुद्धा जवळपास नष्ट झालेलंच होतं. 23 00:01:23,825 --> 00:01:26,809 म्हणून मला वाटतं, तुम्ही कल्पना केलेलं भविष्यसुद्धा 24 00:01:26,833 --> 00:01:28,700 असंच नष्ट झालंय किंवा जाळून टाकलंय. 25 00:01:29,278 --> 00:01:31,676 मी कुवैतमध्ये बहुतेक ५ वर्षे व्यतीत केली, 26 00:01:31,700 --> 00:01:36,426 त्यानंतर २०१५ मध्ये मी देशांतर करून इथं ऑस्ट्रेलियात आलो. 27 00:01:37,306 --> 00:01:41,047 गेल्यावर्षी, आम्ही २ नोव्हेंबरला इथं आलो. 28 00:01:41,071 --> 00:01:42,290 सर्व अंधकारमय होतं, 29 00:01:42,314 --> 00:01:44,727 आणि सूर्योदय झाला तेव्हा नवजीवन लाभलं. 30 00:01:45,087 --> 00:01:46,915 सर्व काही सुंदर आहे, 31 00:01:46,939 --> 00:01:49,227 सर्व काही टवटवीत, फुलांनी बहरलेलं आहे. 32 00:01:49,462 --> 00:01:52,188 नूर अलहज येहिआ: एडमने चांगल्या वातावरणात जगावं असं वाटतं. 33 00:01:52,212 --> 00:01:55,399 त्याने उत्तम आयुष्य जगावं असं आम्हाला वाटतं. 34 00:01:56,267 --> 00:02:00,071 आणि मला वाटतं तोच मुख्य कारण होता 35 00:02:00,095 --> 00:02:04,782 ज्यासाठी आम्ही देशांतराचा निर्णय घेतला. 36 00:02:04,806 --> 00:02:06,985 हा काही सहज, सोपा निर्णय नव्हता. 37 00:02:07,767 --> 00:02:09,788 दुसऱ्या देशात स्थायिक होणं 38 00:02:09,812 --> 00:02:13,532 हे आपल्याला ज्याची सवय झालेली असते त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं 39 00:02:13,556 --> 00:02:14,930 तितकंसं सोपं नसतं. 40 00:02:15,290 --> 00:02:16,633 आम्ही आता खूपच आनंदी आहोत, 41 00:02:16,657 --> 00:02:19,000 आणि आम्हाला माहितीय आम्ही जे केलं ते बरोबर केलं 42 00:02:19,024 --> 00:02:20,813 आमच्यासाठी, आणि एडमसाठी सुद्धा. 43 00:02:20,923 --> 00:02:23,540 महमूद अगिओर्ली: फेब्रुवारीपासून, ऑगस्टपर्यंत 44 00:02:23,564 --> 00:02:28,204 मी दररोज शोध घ्यायचो आणि जवळपास १०-१२ ठिकाणी बायोडेटा पाठवायचो. 45 00:02:28,228 --> 00:02:30,816 खरंतर, माझं नाव बदलण्याचाच मुख्य उपदेश मिळायचा, 46 00:02:30,840 --> 00:02:34,149 कारण "महमूद" हे फारच पारंपरिक वाटतं. 47 00:02:34,173 --> 00:02:35,485 दुसरा उपदेश 48 00:02:35,509 --> 00:02:39,895 हा होता की ते मला माझ्या प्रमाणपत्रावरचं 49 00:02:39,919 --> 00:02:41,969 माझं जन्म ठिकाण व कुळ-मूळ लपवायला सांगायचे. 50 00:02:41,993 --> 00:02:44,563 त्यांनी मला सांगितलं "सीरियाचा कोणताही उल्लेख करू नका." 51 00:02:44,587 --> 00:02:47,086 मी ज्याठिकाणी जन्मलो तो देश काही मी निवडलेला नव्हता. 52 00:02:47,196 --> 00:02:48,586 माझं नावही मी ठरवलं नव्हतं. 53 00:02:48,610 --> 00:02:51,383 तर मी निवड न केलेल्या गोष्टींनी लोक मला पारखत होते. 54 00:02:51,642 --> 00:02:54,399 मात्र ठरवलं की मी या समस्यांना कसा सामोरा जाईन ते. 55 00:02:54,423 --> 00:02:58,118 आणि नवीन कल्पना चा योग्य अंगिकार असणं 56 00:02:58,142 --> 00:03:02,071 हे त्या लोकांसाठी अत्यावश्यक असतं जे युद्ध क्षेत्रात राहणारे असतात 57 00:03:02,095 --> 00:03:05,029 व त्या लोकांसाठी, ज्यांनी भूतकाळ गमावलेला असतो. 58 00:03:05,400 --> 00:03:08,970 TED तुम्हाला खूप साऱ्या संकल्पनांची योग्य प्रणाली प्रदान करेल 59 00:03:08,994 --> 00:03:10,825 जगभरातील असंख्य लोकांमार्फत. 60 00:03:10,849 --> 00:03:14,661 तुम्ही त्यांना अगदी थेटपणे सांगू शकता ज्यांनी याच समस्येचा सामना केला, 61 00:03:14,685 --> 00:03:17,792 त्यांना अगदी थेटपणे सांगू शकता जे नुकतेच परदेशात स्थायिक झाले, 62 00:03:17,816 --> 00:03:20,856 त्यांना प्रत्यक्ष कथन करू शकता जे नवीन कुटुंबात सहभागी होताहेत, 63 00:03:20,880 --> 00:03:22,348 कोणीतरी अडचणींचा सामना करणारे. 64 00:03:22,372 --> 00:03:25,572 महमूदच्या ठायी प्रेम करण्याचं आणि देण्याचं महान सामर्थ्य आहे. 65 00:03:25,872 --> 00:03:29,012 आणि मला वाटतं स्वयंसेवी कार्य -- 66 00:03:29,169 --> 00:03:30,481 (बाळ रडतंय) 67 00:03:30,583 --> 00:03:32,840 हा प्रेम करण्याचा आणि देण्याचा मार्ग आहे. 68 00:03:32,969 --> 00:03:35,421 एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करणे 69 00:03:35,445 --> 00:03:36,750 ही प्रचंड शक्ती आहे. 70 00:03:39,358 --> 00:03:43,035 महमूद अगिओर्ली अरबी TED भाषांतरकार 71 00:03:43,165 --> 00:03:45,785 २००९ पासून ४७४ भाषांतरे