1 00:00:01,254 --> 00:00:04,979 नौकानयन करता येणे ही एक असामान्य दैवी देणगी आहे. 2 00:00:05,003 --> 00:00:07,096 जगात त्यासारखं दुसरं काही नाही. 3 00:00:07,120 --> 00:00:13,802 माझ्यासाठी सर्वोच्च समाधानाची गोष्ट म्हणजे एखाद्या बंदरातून निघाल्यानंतर, 4 00:00:13,826 --> 00:00:18,223 ही बोट आणि आपला चमू आपण सुरक्षितपणे दुसऱ्या बंदरापर्यंत नेऊ 5 00:00:18,247 --> 00:00:20,712 हा विश्वास वाटणे. 6 00:00:20,736 --> 00:00:24,336 मग ते बंदर तीन, चार, पाच, सहा हजार मैल दूर का असेना. 7 00:00:25,019 --> 00:00:27,297 मला वाटतं, समुद्रावरचा प्रवास 8 00:00:27,321 --> 00:00:28,859 म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. 9 00:00:28,883 --> 00:00:34,007 आपल्या स्वभावानुसार जगण्याची सुवर्णसंधी. 10 00:00:34,031 --> 00:00:35,746 तिथे दुसरं काही करणं शक्यच नाही. 11 00:00:35,770 --> 00:00:38,577 बोटीतल्या सहकाऱ्यांसमोर तुम्ही जणु नग्नावस्थेत असता. 12 00:00:38,601 --> 00:00:40,025 ती एक छोटीशी जागा असते. 13 00:00:40,049 --> 00:00:42,284 आमची 'मेडन' बोट ५८ फूट लांबीची आहे. 14 00:00:42,308 --> 00:00:44,707 ५८ फुटी जहाजामध्ये १२ स्त्रिया. 15 00:00:44,731 --> 00:00:47,475 म्हणजे तुम्ही अक्षरशः एकमेकांसमोर असता. 16 00:00:47,499 --> 00:00:49,955 म्हणून तिथे स्वतःच्या स्वभावानुसारच वागावं लागतं. 17 00:00:49,979 --> 00:00:53,254 माझ्यासाठी समुद्रप्रवासातला सर्वात मोठा क्षण कोणता, 18 00:00:53,278 --> 00:00:56,317 तर ज्या क्षणी जमीन दिसेनाशी होते, तो. 19 00:00:56,341 --> 00:00:59,185 तो एक अवर्णनीय क्षण असतो. 20 00:00:59,209 --> 00:01:00,303 (दीर्घ श्वास) 21 00:01:00,327 --> 00:01:03,834 साहसाचा. मागे न फिरण्याचा. 22 00:01:03,858 --> 00:01:08,175 फक्त आपण, आपली बोट आणि पंचमहाभूतं. 23 00:01:08,199 --> 00:01:11,936 प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी हे अनुभवावं अशी माझी इच्छा आहे. 24 00:01:11,960 --> 00:01:14,016 आपण जमिनीपासून जितके दूर जाऊ, 25 00:01:14,040 --> 00:01:16,794 तितके जास्त स्वतःसारखे होत जातो. 26 00:01:16,818 --> 00:01:18,048 तिथे फक्त तुम्हीच असता. 27 00:01:18,072 --> 00:01:19,665 पुढच्या ठिकाणावर कसं पोहोचायचं? 28 00:01:19,689 --> 00:01:21,144 आपले जीव कसे सांभाळायचे? 29 00:01:21,168 --> 00:01:23,770 एकमेकांची काळजी कशी घ्यायची 30 00:01:23,794 --> 00:01:26,214 आणि सुखरूप पैलतीरी कसं पोहोचायचं? 31 00:01:26,670 --> 00:01:30,374 मी व्याख्यानं द्यायला जाते, तेव्हा हा प्रश्न मला सर्वात जास्त विचारला जातो: 32 00:01:30,398 --> 00:01:34,262 महासागरी शर्यतीत भाग कसा घ्यायचा? 33 00:01:34,286 --> 00:01:36,016 हा अतिशय चांगला प्रश्न आहे. 34 00:01:36,040 --> 00:01:39,453 मला सांगायला आवडलं असतं, की "आधी मला तसा आभास झाला. 35 00:01:39,477 --> 00:01:40,682 मग ते माझं स्वप्न बनलं, 36 00:01:40,706 --> 00:01:43,165 मग तो माझा ध्यास झाला." 37 00:01:43,189 --> 00:01:45,205 पण अर्थात, आयुष्य तसं नसतं. 38 00:01:45,229 --> 00:01:48,805 एक गोष्ट लोकांना सांगण्याची मला फार उत्कंठा आहे. 39 00:01:48,829 --> 00:01:51,560 माझं आयुष्य अ बिंदूपासून ब बिंदूकडे गेलं नाही. 40 00:01:51,584 --> 00:01:54,743 कारण आपलं आयुष्य अ पासून ब पर्यंत गेलं, असं किती लोक सांगू शकतील? 41 00:01:54,767 --> 00:01:58,044 किती लोक "मी हे करेन" म्हणतात, आणि तसं करतात? 42 00:01:58,953 --> 00:02:00,509 म्हणून मी सत्य तेच सांगते. 43 00:02:00,533 --> 00:02:03,967 ते असं, की वयाच्या १५व्या वर्षी मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. 44 00:02:03,991 --> 00:02:08,644 वैतागलेल्या मुख्याध्यापकांनी एक वैतागाचं लांबलचक पत्र लिहिलं. 45 00:02:08,668 --> 00:02:10,010 माझ्या वैतागलेल्या आईला. 46 00:02:10,034 --> 00:02:14,692 त्याचा अर्थ इतकाच, की ट्रेसीची सावली जरी शाळेच्या दारात पडली, 47 00:02:14,716 --> 00:02:16,422 तर पोलिसांना बोलवू. 48 00:02:16,446 --> 00:02:20,231 आईने मला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, 49 00:02:20,255 --> 00:02:23,457 "डार्लिंग, शिक्षण हे प्रत्येकाला जमतंच असं नाही." 50 00:02:23,481 --> 00:02:27,223 त्यानंतर तिने मला सर्वात मोलाचा सल्ला दिला. 51 00:02:27,247 --> 00:02:30,565 ती म्हणाली, "आपल्यापैकी प्रत्येकाला एखाद्या विषयात गती असते. 52 00:02:30,589 --> 00:02:33,403 तो विषय कोणता, ते शोधून काढायला हवं." 53 00:02:33,427 --> 00:02:37,155 आणि वयाच्या १६व्या वर्षी तिने मला पाठीवर बॅगपॅक बांधून ग्रीसमध्ये पाठवलं. 54 00:02:37,715 --> 00:02:40,716 मी बोटींवर कामं करू लागले. ठीक चाललं होतं. 55 00:02:40,740 --> 00:02:44,058 माझं वय सतरा वर्षांचं होतं. आपल्याला काय करायचंय ते कळत नव्हतं. 56 00:02:44,082 --> 00:02:45,902 प्रवाहाबरोबर वाहत जात होते. 57 00:02:45,926 --> 00:02:48,637 अटलांटिक महासागरावरच्या दुसऱ्या सफरीवेळी 58 00:02:48,661 --> 00:02:51,065 कप्तानाने मला विचारलं, "तुला बोट चालवता येते?" 59 00:02:51,089 --> 00:02:53,022 मी म्हटलं, "छे! मला नाही येत. 60 00:02:53,046 --> 00:02:54,809 भागाकार शिकण्यापूर्वी शाळेने हाकललं." 61 00:02:54,833 --> 00:02:57,750 तो म्हणाला, "आपल्याला ते यावं, असं नाही वाटत तुला? 62 00:02:57,774 --> 00:02:59,570 मी बोटीवरून खाली समुद्रात पडलो, तर? 63 00:02:59,594 --> 00:03:01,508 आयुष्याकडे त्रयस्थासारखं बघणं थांबव. 64 00:03:01,532 --> 00:03:03,425 आपण काय करतो ते नुसतं पाहू नकोस. 65 00:03:03,449 --> 00:03:05,171 त्यात प्रत्यक्ष भाग घे." 66 00:03:05,839 --> 00:03:09,379 आणि त्या दिवशी माझ्या संपूर्ण आयुष्याला सुरुवात झाली. 67 00:03:09,403 --> 00:03:11,420 दोन दिवसांत मी बोट चालवायला शिकले. 68 00:03:11,444 --> 00:03:13,523 मी, आकडे न आवडणारी व्यक्ती. 69 00:03:13,547 --> 00:03:15,165 आकड्यांना गूढ चिन्हलिपी मानणारी. 70 00:03:15,872 --> 00:03:20,116 यामुळे माझ्या कल्पनेपलीकडचे मार्ग आणि संधी मला मिळाल्या. 71 00:03:20,140 --> 00:03:23,865 मी व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीच्या बोटीवर स्थान मिळवलं. 72 00:03:23,889 --> 00:03:26,974 माझ्याबरोबर सतरा दक्षिण आफ्रिकन पुरुष होते. 73 00:03:26,998 --> 00:03:28,883 माझं वय होतं एकवीस वर्षं. 74 00:03:28,907 --> 00:03:31,052 ते नऊ महिने मला फार मोठे वाटले. 75 00:03:31,076 --> 00:03:32,750 मी स्वयंपाकी म्हणून गेले होते. 76 00:03:32,774 --> 00:03:34,483 मी शेवटपर्यंत टिकून राहिले. 77 00:03:34,507 --> 00:03:36,238 शर्यत संपली, 78 00:03:36,262 --> 00:03:40,102 तेव्हा मला कळलं, की शर्यतीत २३० लोकांनी भाग घेतला होता. 79 00:03:40,126 --> 00:03:41,292 आणि तीन महिला. 80 00:03:41,316 --> 00:03:42,467 त्यापैकी मी एक होते. 81 00:03:42,491 --> 00:03:44,094 मी फार वाईट स्वयंपाक करते. 82 00:03:44,118 --> 00:03:45,862 पण मी जहाज उत्तमरीत्या चालवू शकते. 83 00:03:46,759 --> 00:03:51,388 मला वाटतं, माझ्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा विचार असा, की 84 00:03:51,412 --> 00:03:56,983 "कोणताही पुरुष मला त्याची बोट कधीच चालवू देणार नाही." 85 00:03:57,393 --> 00:03:59,292 हे आजही खरं आहे. 86 00:03:59,316 --> 00:04:01,073 व्हिटब्रेड शर्यतीच्या ३५ वर्षांत 87 00:04:01,097 --> 00:04:05,016 संपूर्ण महिला चमूची जहाजं वगळता, फक्त दोन महिला खलाशांनी भाग घेतला आहे. 88 00:04:05,040 --> 00:04:06,548 यातूनच मेडन बोटीचा जन्म झाला. 89 00:04:06,572 --> 00:04:10,065 त्यावेळी मला वाटलं, "मला याविरुद्ध लढलं पाहिजे." 90 00:04:10,089 --> 00:04:13,918 आपण याविरुद्ध लढणार आहोत याची पूर्वकल्पना नसूनही 91 00:04:13,942 --> 00:04:18,442 एखादं बदक पाण्यात उतरावं तशी मी सहज सुरुवात केली. 92 00:04:18,932 --> 00:04:23,490 माझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मलाच नव्याने समजल्या. 93 00:04:23,836 --> 00:04:26,329 माझ्यातल्या लढाऊ वृत्तीचा शोध लागला. 94 00:04:26,353 --> 00:04:28,105 माझ्यात स्पर्धक वृत्ती आहे हे समजलं, 95 00:04:28,129 --> 00:04:29,742 जे यापूर्वी ठाऊक नव्हतं. 96 00:04:29,766 --> 00:04:33,370 माझ्या मनातला दुसरा ध्यास समजला. 97 00:04:33,394 --> 00:04:35,625 समानतेचा आग्रह. 98 00:04:35,649 --> 00:04:37,967 हा ध्यास मी सोडू शकले नसते. 99 00:04:37,991 --> 00:04:41,538 हा ध्यास फक्त माझ्यापुरता नव्हता. मला बोट चालवायला मिळावी, 100 00:04:41,562 --> 00:04:43,764 माझे खलाशी निवडावे 101 00:04:43,788 --> 00:04:45,163 आणि चमू गोळा करावा, 102 00:04:45,187 --> 00:04:47,304 स्वतः पैसे उभे करावे आणि बोट घ्यावी, 103 00:04:47,328 --> 00:04:49,239 मी स्वतः नौकाचालक होणं हा ध्यास नव्हता. 104 00:04:49,263 --> 00:04:50,828 तर सर्व स्त्रियांसाठी. 105 00:04:50,852 --> 00:04:53,018 यावेळी माझ्या लक्षात आलं, की 106 00:04:53,042 --> 00:04:56,894 कदाचित आपण यापुढच्या आयुष्यात हेच काम करणार आहोत. 107 00:04:56,918 --> 00:04:58,763 बऱ्याच काळाच्या प्रयत्नांनी पैसे जमवून 108 00:04:58,787 --> 00:05:01,419 १९८९ सालच्या व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीला गेलो. 109 00:05:01,443 --> 00:05:03,452 तिथे आमच्या भोवती मोठमोठ्या 110 00:05:03,476 --> 00:05:07,226 लक्षावधी पौंड्स किंमतीच्या बोटी होत्या. त्यातले सर्व खलाशी पुरुष होते. 111 00:05:07,250 --> 00:05:11,085 खास शर्यतीकरिता बनवलेल्या त्या नव्याकोऱ्या चकचकीत बोटी 112 00:05:11,109 --> 00:05:14,201 पाहून आमच्या लक्षात आलं, की आपल्याजवळ असं काही नाही. 113 00:05:14,225 --> 00:05:16,154 आम्हांला सुधारणा करणं भाग होतं. 114 00:05:16,178 --> 00:05:19,135 इतकी प्रचंड रक्कम देण्याइतका विश्वास कोणी आमच्यावर ठेवला नसता. 115 00:05:19,159 --> 00:05:20,511 मग मी माझं घर गहाण ठेवलं. 116 00:05:20,535 --> 00:05:24,137 आम्हांला एक नादुरुस्त बोट सापडली. तिलाही इतिहास होता. 117 00:05:24,161 --> 00:05:25,315 व्हिटब्रेड शर्यतीत 118 00:05:25,339 --> 00:05:27,455 तिने दोनदा पृथ्वीप्रदक्षिणा केली होती. 119 00:05:27,479 --> 00:05:28,751 ती दक्षिण आफ्रिकेत होती. 120 00:05:28,775 --> 00:05:31,371 कशीबशी एका माणसाला विनंती करून, त्याच्या जहाजावरून 121 00:05:31,395 --> 00:05:33,774 आम्ही तिला इंग्लंडला आणवलं. 122 00:05:33,798 --> 00:05:37,255 बोटीची दुर्दशा बघून माझ्या चमूतल्या मुली घाबरल्या. 123 00:05:37,632 --> 00:05:39,442 एका यार्डात आम्हांला मोफत जागा मिळाली. 124 00:05:39,466 --> 00:05:42,684 तिथे नेऊन आम्ही तिची पुनर्रचना केली. 125 00:05:42,708 --> 00:05:44,151 तिचे भाग सुटे केले. 126 00:05:44,175 --> 00:05:46,479 हे सगळं आम्ही स्वतःच केलं. 127 00:05:46,503 --> 00:05:49,805 त्या यार्डात स्त्रिया आलेल्या याआधी कोणी पाहिल्या नव्हत्या. 128 00:05:49,829 --> 00:05:51,412 ते फार मजेशीर होतं. 129 00:05:51,436 --> 00:05:53,428 रोज सकाळी आम्ही तिथे गेलो, की 130 00:05:53,452 --> 00:05:55,435 लोक वेड्यासारखे आम्हांला बघत राहत. 131 00:05:55,459 --> 00:05:59,206 पण त्याचे फायदेही होते. कारण ते सगळे आम्हांला मदत करत. 132 00:05:59,230 --> 00:06:01,404 आम्ही म्हणजे एक नवलाईची गोष्ट बनलो होतो. 133 00:06:01,428 --> 00:06:04,239 कोणीतरी आम्हांला एक जुना जनरेटर आणि एक इंजिन दिलं. 134 00:06:04,263 --> 00:06:05,680 "हा जुना दोर हवा का?" 135 00:06:05,704 --> 00:06:06,886 "होय." 136 00:06:06,910 --> 00:06:08,080 "जुनी शिडं?" 137 00:06:08,104 --> 00:06:09,266 "हो, चालतील. " 138 00:06:09,290 --> 00:06:11,481 असं आम्ही साहित्य गोळा करत गेलो. 139 00:06:11,505 --> 00:06:15,632 मला वाटतं, आम्हांला एक मोठा फायदा मिळाला. 140 00:06:15,656 --> 00:06:18,568 यापूर्वी कोणालाच कल्पना नव्हती, की 141 00:06:18,592 --> 00:06:21,522 स्त्रियांचा चमू पृथ्वीप्रदक्षिणा कशा पद्धतीने करेल. 142 00:06:21,546 --> 00:06:24,013 त्यामुळे आम्ही जे केलं, ते योग्यच ठरलं. 143 00:06:24,037 --> 00:06:28,056 आणि त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. 144 00:06:28,080 --> 00:06:29,231 फक्त स्त्रियाच नव्हेत, 145 00:06:29,255 --> 00:06:31,669 पुरुषही, ज्यांना याआधी सांगितलं गेलं होतं, 146 00:06:31,693 --> 00:06:34,492 "अमुक गोष्ट करू नकोस, कारण तुला ती तितकीशी जमणार नाही -- 147 00:06:34,516 --> 00:06:37,519 तुझं लिंग, वर्ण, जात किंवा असलंच काहीतरी योग्य नाही म्हणून." 148 00:06:37,543 --> 00:06:40,366 मेडन बोट हा एक ध्यास बनला. 149 00:06:40,390 --> 00:06:43,553 त्यासाठी पैसे जमवणं फार कठीण होतं. 150 00:06:43,577 --> 00:06:45,659 शेकडो संस्थांनी नकार दिला. 151 00:06:45,683 --> 00:06:48,016 त्या म्हणाल्या, "हे तुम्ही करू शकणार नाही." 152 00:06:48,040 --> 00:06:50,498 या प्रयत्नात आमचं मरण ओढवेल, असं लोकांना वाटत होतं. 153 00:06:50,522 --> 00:06:53,072 खरोखरच लोक माझ्याजवळ येऊन म्हणत, 154 00:06:53,096 --> 00:06:54,296 "यात तुमचा जीव जाईल." 155 00:06:54,320 --> 00:06:57,600 मला वाटे, "तो माझा प्रश्न आहे. तुमचा नव्हे." 156 00:06:57,948 --> 00:07:00,568 शेवटी, जॉर्डनचे राजे हुसेन यांनी आर्थिक साहाय्य केलं. 157 00:07:00,592 --> 00:07:03,031 ही नवलाईची गोष्ट होती. 158 00:07:03,055 --> 00:07:05,586 त्यांनी काळाच्या पुढे जाऊन, समानतेला पाठिंबा दिला. 159 00:07:05,610 --> 00:07:08,680 शांती आणि समानतेचा संदेश घेऊन आम्ही जगपर्यटन केलं. 160 00:07:08,704 --> 00:07:12,212 एखादा संदेश घेऊन शर्यतीत उतरलेली ही आमची एकमेव बोट होती. 161 00:07:12,236 --> 00:07:14,594 व्हिटब्रेड शर्यतीतल्या दोन टप्प्यांत आम्ही जिंकलो, 162 00:07:14,618 --> 00:07:16,261 सर्वात कठीण टप्प्यांमधले हे दोन. 163 00:07:16,285 --> 00:07:17,920 आणि संपूर्ण शर्यतीत दुसरा क्रमांक. 164 00:07:17,944 --> 00:07:22,419 १९७७ पासूनच्या ब्रिटिश इतिहासातला हा विक्रम अजून अबाधित आहे. 165 00:07:22,443 --> 00:07:24,152 या विजयामुळे अनेकांचा जळफळाट झाला. 166 00:07:24,176 --> 00:07:26,028 त्या वेळी आम्ही काय केलं, 167 00:07:26,052 --> 00:07:27,296 हे आम्हांला समजलं नव्हतं. 168 00:07:27,320 --> 00:07:30,509 आम्ही अंतिम रेषा ओलांडली. शर्यतीचा शेवट अविश्वसनीय झाला. 169 00:07:30,533 --> 00:07:33,378 सोलेन्ट सामुद्रधुनीमधून आमच्याबरोबर सहाशे बोटी येत होत्या. 170 00:07:33,402 --> 00:07:40,354 आम्ही बंदरात येतेवेळी ओशियन व्हिलेज मध्ये ५० हजार लोक "मेडन, मेडन" चा घोष करत होते. 171 00:07:40,378 --> 00:07:43,179 त्यावेळी समजलं, की आम्ही आमचं ध्येय पूर्ण केलं आहे. 172 00:07:43,203 --> 00:07:45,966 आपली कामगिरी चांगली झाली असेल, अशी आम्हांला आशा होती, 173 00:07:45,990 --> 00:07:51,290 पण आमच्यामुळे किती स्त्रियांची आयुष्यं बदलली असतील याची कल्पना नव्हती. 174 00:07:52,018 --> 00:07:53,923 दक्षिण समुद्र हा माझा आवडता समुद्र आहे. 175 00:07:53,947 --> 00:07:55,574 समुद्राला व्यक्तिमत्व असतं. 176 00:07:55,598 --> 00:07:58,454 उत्तर अटलांटिक समुद्र हा उत्साही समुद्र आहे. 177 00:07:58,478 --> 00:08:02,495 आनंदी, तत्पर आणि जोरकस, 178 00:08:02,519 --> 00:08:04,248 हा धमाल समुद्र आहे. 179 00:08:04,272 --> 00:08:07,979 दक्षिण समुद्र हा अत्यंत गंभीर समुद्र आहे. 180 00:08:08,003 --> 00:08:12,199 तिथे पोहोचल्यावर लगेच समजतं, की आपण दक्षिण समुद्रात प्रवेश केला, 181 00:08:12,223 --> 00:08:13,887 त्या अक्षांश रेखांशावर आलो. 182 00:08:13,911 --> 00:08:15,491 तिथे पोहोचताच 183 00:08:15,515 --> 00:08:17,086 लाटा येऊ लागतात, 184 00:08:17,110 --> 00:08:19,641 त्यांच्यावर पांढरा फेस दिसू लागतो. 185 00:08:19,665 --> 00:08:21,118 सगळीकडे धुरकट दिसू लागतं. 186 00:08:21,142 --> 00:08:23,193 काही कळेनासं होतं. 187 00:08:23,556 --> 00:08:28,437 फक्त आपण कोण आहोत, काय करतो आहोत, इतकंच समजतं. 188 00:08:28,461 --> 00:08:31,738 भोवताली निसर्गाचं प्रचंड स्वरूप दिसतं. 189 00:08:32,118 --> 00:08:33,269 सर्वत्र रिकामं दिसतं. 190 00:08:33,293 --> 00:08:36,714 किती प्रचंड, किती रिकामा. 191 00:08:37,297 --> 00:08:40,155 बोटीभोवती समुद्रपक्षी घिरट्या घालताना दिसतात. 192 00:08:40,179 --> 00:08:43,132 त्यांच्या क्षेत्रातून बाहेर पडायला सुमारे चार दिवस लागतात. 193 00:08:43,156 --> 00:08:45,655 त्यामुळे तेच पक्षी चार दिवस दिसत राहतात. 194 00:08:45,679 --> 00:08:47,394 त्यांनाही आपल्याला पाहून नवल वाटतं. 195 00:08:47,418 --> 00:08:52,814 त्यामुळे शिडावरून येणाऱ्या वाऱ्यासोबत भराऱ्या मारत 196 00:08:52,838 --> 00:08:55,624 ते बोटीच्या मागेमागे राहतात. 197 00:08:55,648 --> 00:08:57,514 त्यामुळे मागे कोणीतरी आहे असा भास होऊन 198 00:08:57,538 --> 00:08:58,723 आपण मागे वळतो. 199 00:08:58,747 --> 00:09:00,831 तर काय, तो समुद्रपक्षी आपल्याला पाहत असतो. 200 00:09:00,855 --> 00:09:02,835 शर्यतीच्या शेवटी आम्ही मेडन विकली. 201 00:09:02,859 --> 00:09:04,229 आमच्याजवळ पैसे नव्हते. 202 00:09:04,253 --> 00:09:06,301 पाच वर्षांपूर्वी आम्हांला ती परत मिळाली. 203 00:09:06,325 --> 00:09:08,904 त्याचवेळी एका दिग्दर्शकाने ठरवलं, की 204 00:09:08,928 --> 00:09:11,745 मेडनबद्दल माहितीपट करायचा. 205 00:09:11,769 --> 00:09:12,920 आम्हांला मेडन सापडली. 206 00:09:12,944 --> 00:09:14,321 ती धडाक्याने परत आली. 207 00:09:14,345 --> 00:09:17,663 तिने आठवणी परत आणल्या, 208 00:09:17,687 --> 00:09:18,983 गेल्या काही वर्षांतल्या. 209 00:09:19,007 --> 00:09:21,635 आपल्या इच्छेप्रमाणे जगावं 210 00:09:21,659 --> 00:09:24,126 आणि जगाचा एक भाग व्हावं, याची आठवण. 211 00:09:24,150 --> 00:09:28,249 आयुष्यात मला जे काही महत्त्वाचं वाटतं, 212 00:09:28,273 --> 00:09:29,948 ते सर्व मेडनमुळे मिळालं आहे. 213 00:09:29,972 --> 00:09:32,059 पुन्हा एकदा आम्ही तिला जीवदान दिलं. 214 00:09:32,083 --> 00:09:33,256 जनता मदतफंड उभा केला. 215 00:09:33,280 --> 00:09:35,302 आफ्रिकेतल्या सेयशल्स मधून तिला सोडवलं. 216 00:09:35,326 --> 00:09:37,634 राजे हुसेन यांची राजकन्या हाया हिने 217 00:09:37,658 --> 00:09:41,263 मेडनला इंग्लडला परत आणण्याचा आणि तिच्या डागडुजीचा खर्च उचलला. 218 00:09:41,287 --> 00:09:43,102 मूळ चमूतील सर्व खलाशी यात सहभागी झाले. 219 00:09:43,126 --> 00:09:45,074 आम्ही जुना चमू परत उभा केला. 220 00:09:45,640 --> 00:09:48,438 आणि मग विचार केला, "आता पुढे मेडनचं काय करायचं?" 221 00:09:48,462 --> 00:09:51,216 यावेळी माझ्या मनात 222 00:09:51,240 --> 00:09:54,336 भूतकाळातली प्रत्येक गोष्ट उभी राहिली. 223 00:09:54,360 --> 00:09:56,502 प्रत्येक प्रकल्प, मनातली प्रत्येक भावना, 224 00:09:56,526 --> 00:09:59,550 प्रत्येक ध्यास, प्रत्येक लढा, झगडा. 225 00:09:59,574 --> 00:10:02,686 म्हणून मी ठरवलं, की मेडनने हा लढा पुढे सुरु ठेवायला हवा. 226 00:10:02,710 --> 00:10:04,229 पुढच्या पिढीसाठी. 227 00:10:04,253 --> 00:10:07,545 आता मेडन पाच वर्षांची जागतिक सफर करत आहे. 228 00:10:07,569 --> 00:10:11,713 जगभरातल्या हजारो मुलींशी आम्ही संवाद साधत आहोत. 229 00:10:11,737 --> 00:10:16,308 मुलींना शिक्षणाकडे वळवणाऱ्या सामाजिक उपक्रमांना साहाय्य करत आहोत. 230 00:10:16,332 --> 00:10:19,453 शिक्षण म्हणजे केवळ वर्गात बसणं नव्हे. 231 00:10:19,477 --> 00:10:24,610 तर त्यांना चुकीच्या कल्पना दाखवून देणं. तुम्ही असंच दिसलं पाहिजे, हे चुकीचं आहे. 232 00:10:24,634 --> 00:10:27,023 तुमच्या भावना अशाच असल्या पाहिजेत, 233 00:10:27,047 --> 00:10:28,930 तुम्ही असंच वागलं पाहिजे, हे चूक. 234 00:10:28,954 --> 00:10:30,153 तुम्ही यशस्वी होऊ शकता. 235 00:10:30,177 --> 00:10:31,426 स्वप्नं पूर्ण करू शकता. 236 00:10:31,450 --> 00:10:32,967 त्यासाठी लढा देऊ शकता. 237 00:10:32,991 --> 00:10:34,690 आयुष्य अ पासून ब पर्यंत जात नसतं. 238 00:10:34,714 --> 00:10:35,872 ते गुंतागुंतीचं असतं. 239 00:10:35,896 --> 00:10:38,708 माझ्या आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतागुंत होती. 240 00:10:38,732 --> 00:10:41,349 पण त्यातूनच मी इथवर पोहोचले. 241 00:10:41,373 --> 00:10:45,144 आमचं आणि मेडनचं भविष्य उज्जवल आहे. 242 00:10:45,168 --> 00:10:46,796 माझ्यासाठी, 243 00:10:46,820 --> 00:10:48,981 हे एक वर्तुळ पूर्ण करण्यासारखं आहे. 244 00:10:49,005 --> 00:10:51,524 मेडनबरोबरचं वर्तुळ पूर्ण करणं. 245 00:10:51,548 --> 00:10:54,211 आणि तिच्या साहाय्याने मुलींना सांगणं, 246 00:10:54,235 --> 00:10:56,642 फक्त एका व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास असेल, तर 247 00:10:56,666 --> 00:10:57,841 काहीही साध्य करता येतं.