0:00:00.000,0:00:00.250 मला आठवतंय, मी अकरा वर्षांची असताना 0:00:02.404,0:00:06.966 एके दिवशी सकाळी मला [br]एका खुशखबरीने जाग आली होती. 0:00:06.966,0:00:09.437 माझे वडील त्यांच्या छोट्या करड्या रेडिओवर[br] 0:00:09.437,0:00:13.611 बीबीसीच्या बातम्या ऐकत होते. 0:00:13.611,0:00:16.487 त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हास्य होतं. [br]हे एक नवलच होतं. 0:00:16.487,0:00:20.458 कारण बातम्या ऐकून ते नेहमी उदास होत असत. 0:00:20.458,0:00:25.343 "तालिबान निघून गेले" ते ओरडले. 0:00:25.343,0:00:27.931 मला याचा अर्थ समजला नाही. 0:00:27.931,0:00:33.117 पण माझे वडील खूप खूष दिसत होते. 0:00:33.117,0:00:41.628 "आता तुला खऱ्या शाळेत जाता येईल." [br]ते म्हणाले. 0:00:41.628,0:00:46.797 ती सकाळ मी कधीच विसरणार नाही. 0:00:46.797,0:00:51.965 खरी शाळा. 0:00:51.965,0:00:55.073 मी सहा वर्षांची होते तेव्हा[br]तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला 0:00:55.073,0:00:58.596 आणि मुलींचं शिक्षण बेकायदेशीर ठरवलं.[br] 0:00:58.596,0:01:01.704 पुढची पाच वर्षं मी [br]मुलांसारखे कपडे घालीत असे. 0:01:01.704,0:01:04.215 माझ्या मोठ्या बहिणीला[br]एकटीने हिंडायला बंदी होती. 0:01:04.215,0:01:09.629 म्हणून, तिच्यासोबत [br]एका छुप्या शाळेत जाण्यासाठी. 0:01:09.629,0:01:14.254 आम्हा दोघींना शिकण्याचा तो एकच मार्ग होता. 0:01:14.254,0:01:17.488 दर दिवशी आम्ही वेगळ्या रस्त्याने जायचो. 0:01:17.488,0:01:21.511 कुणाला संशय येऊ नये म्हणून. 0:01:21.511,0:01:23.705 आम्ही आमची पुस्तकं पिशवीत लपवून 0:01:23.705,0:01:29.841 सहज बाजारात गेल्यासारख्या जायचो. 0:01:29.841,0:01:32.217 ही शाळा एका घरात होती. 0:01:32.217,0:01:37.880 आम्ही शंभरावर मुलं [br]एका छोट्या खोलीत जमायचो. 0:01:37.880,0:01:43.730 हिवाळ्यात ते उबदार वाटे. [br]पण उन्हाळ्यात अतिशय उकडायचं. 0:01:43.730,0:01:46.251 आम्ही जाणूनबुजून जीव धोक्यात घालीत होतो. 0:01:46.251,0:01:50.605 शिक्षक, विद्यार्थी आणि आमचे पालक, सर्वच. 0:01:50.605,0:01:52.978 अनेकदा शाळा अचानक आठवडाभर बंद ठेवली जाई. 0:01:52.978,0:01:56.894 तालिबानला संशय आला म्हणून. 0:01:56.894,0:01:59.674 आम्हाला नेहमी वाटे, [br]त्यांना आपल्याबद्दल काय माहित असेल? 0:01:59.674,0:02:02.706 आपला पाठलाग होत असेल का? 0:02:02.706,0:02:06.238 आपण कुठे राहतो ते त्यांना ठाऊक असेल का? 0:02:06.238,0:02:08.896 आम्हाला भीती वाटे. 0:02:08.896,0:02:15.822 पण तरीही आम्हाला शाळेत जायचं होतं. 0:02:15.822,0:02:19.562 माझं भाग्य मोठं, म्हणून [br]मी अशा एका कुटुंबात लहानाची मोठी झाले 0:02:19.562,0:02:25.809 की जिथे शिक्षणाला मान होता [br]आणि मुली ही मौल्यवान ठेव होती. 0:02:25.809,0:02:30.960 माझे आजोबा त्यांच्या काळातले [br]एक असामान्य पुरुष होते. 0:02:30.960,0:02:34.439 अफगाणिस्तानाच्या एका दुर्गम भागातल्या [br]या सर्वस्वी बेलगाम माणसाने, 0:02:34.439,0:02:37.935 आग्रह धरला, त्यांच्या मुलीला,[br]म्हणजे माझ्या आईला, शाळेत घालण्याचा. 0:02:37.935,0:02:44.348 आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांनी [br]त्यांच्याशी संबंध तोडले होते. 0:02:44.348,0:02:47.858 पण माझी आई शिकली, ती शिक्षिका झाली. 0:02:47.858,0:02:50.884 ही पहा. 0:02:50.884,0:02:53.551 दोन वर्षांपूर्वी ती निवृत्त झाली, ती केवळ 0:02:53.551,0:02:58.929 आमच्या घराचं रूपांतर, आजूबाजूच्या [br]मुली आणि स्त्रियांच्या शाळेत करण्यासाठीच. 0:02:58.929,0:03:03.317 आणि माझे वडील - हे पहा - 0:03:03.317,0:03:10.218 त्यांच्या घराण्यातले शिकणारे ते पहिलेच. 0:03:10.218,0:03:12.327 तेव्हा त्यांची मुलं [br]आणि मुलीसुद्धा शिकणार 0:03:12.327,0:03:17.416 यात शंकाच नव्हती. 0:03:17.416,0:03:21.836 तालिबानसारखे धोके असूनही. 0:03:21.836,0:03:30.182 त्यांच्या मते, आपल्या मुलांना [br]शिक्षण न देणं हा जास्त मोठा धोका होता. 0:03:30.182,0:03:33.310 मला आठवतंय, तालिबानच्या काळात काही वेळा 0:03:33.310,0:03:38.403 आपल्या आयुष्याकडे पाहून मी खूप हताश होई. 0:03:38.403,0:03:42.355 तसंच सततची भीती, [br]आणि समोर भविष्य दिसत नसल्यामुळेही. 0:03:42.355,0:03:45.409 मला (शिक्षण) सोडून द्यावंसं वाटे. 0:03:45.409,0:03:48.545 पण माझे वडील, 0:03:48.545,0:03:51.054 ते म्हणत, 0:03:51.054,0:03:53.159 "ऐक, माझ्या मुली, 0:03:53.159,0:03:56.475 आयुष्यात आपल्या मालकीचं जे काही असतं, [br]ते सगळं गमावलं जाऊ शकतं. 0:03:56.475,0:04:00.680 आपले पैसे चोरले जाऊ शकतात. [br]लढाईत आपल्याला आपल्या घरातून [br]हाकललं जाऊ शकतं. 0:04:00.680,0:04:03.461 पण कायम आपल्यासोबत राहणारी [br]एकमेव गोष्ट म्हणजे 0:04:03.461,0:04:06.769 ही इथे आहे ती. 0:04:06.769,0:04:11.685 आणि आम्हाला जर [br]तुझ्या शाळेची फी भरण्याकरता [br]आमचं रक्त विकावं लागणार असेल, 0:04:11.685,0:04:14.906 तर आम्ही ते विकू. 0:04:14.906,0:04:19.988 तर, अजूनही तुला (शिक्षण) [br]सुरू ठेवावसं वाटत नाही काय?” 0:04:19.988,0:04:23.116 आज मी बावीस वर्षांची आहे. 0:04:23.116,0:04:25.886 मी लहानाची मोठी झाले, ती 0:04:25.886,0:04:29.056 दशकभर चाललेल्या युद्धात [br]नाश पावलेल्या एका देशात. 0:04:29.056,0:04:34.197 माझ्या वयाच्या [br]सहा टक्क्याहून कमी स्त्रियांनी[br]माध्यमिक शाळा पार केली आहे. 0:04:34.197,0:04:36.662 माझ्या कुटुंबाने जर [br]माझ्या शिक्षणाचा निर्धार केला नसता, 0:04:36.662,0:04:39.266 तर मीही [br]त्या (स्त्रियां)तलीच एक ठरले असते. 0:04:39.266,0:04:44.581 त्याऐवजी, आज मी इथे [br]मिडलबरी कॉलेजची पदवीधर म्हणून [br]अभिमानाने उभी आहे. 0:04:44.581,0:04:54.594 (टाळ्या) 0:04:54.594,0:04:57.542 मी जेव्हा अफगाणिस्तानात परतले, तेव्हा 0:04:57.542,0:05:02.121 मुलींना शिकवल्याबद्दल [br]घरातून हद्दपार झालेल्या [br]माझ्या आजोबांनी 0:05:02.121,0:05:05.615 माझं सर्वप्रथम अभिनंदन केलं. 0:05:05.615,0:05:08.245 ते बढाई मारतात, ती केवळ [br]माझ्या पदवीची नव्हे, 0:05:08.245,0:05:10.454 तर (पदवी घेणारी) मी [br]पहिलीच स्त्री म्हणूनही. 0:05:10.454,0:05:12.176 आणि मी पहिलीच स्त्री आहे, 0:05:12.176,0:05:15.678 त्यांना काबूलच्या रस्त्यांतून [br]स्वतः गाडी चालवून घेऊन जाणारी, म्हणून. 0:05:15.678,0:05:21.040 (टाळ्या) 0:05:21.040,0:05:23.689 माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास आहे. 0:05:23.689,0:05:28.639 मी मोठी स्वप्नं पाहते, [br]पण माझ्या घरच्यांची स्वप्नं त्याहूनही मोठी आहेत. 0:05:28.639,0:05:33.106 म्हणून मी १० x १० ची वैश्विक राजदूत झाले. 0:05:33.106,0:05:35.870 १० x १० ही स्त्रीशिक्षणाची [br]एक जागतिक मोहीम आहे. 0:05:35.870,0:05:38.449 तशीच मी SOLA ची सहसंस्थापिका झाले. 0:05:38.449,0:05:40.916 SOLA ही अफ़गाणिस्तानातली[br]पहिलीच आणि कदाचित एकमेव[br] 0:05:40.916,0:05:42.645 मुलींची निवासी शाळा आहे. 0:05:42.645,0:05:48.282 अशा एका देशातली, जिथे अजूनही [br]मुलींनी शाळेत जाणं धोक्याचं आहे. 0:05:48.282,0:05:52.047 कौतुकाची गोष्ट अशी, की माझ्या शाळेतल्या [br]महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी 0:05:52.047,0:05:57.675 मला सुसंधी पटकावताना दिसताहेत. 0:05:57.675,0:06:00.602 आणि त्यांचे पालक आणि जन्मदाते, 0:06:00.602,0:06:05.180 माझ्या घरच्यांप्रमाणेच, [br]त्यांची पाठराखण करताना दिसताहेत, 0:06:05.180,0:06:14.112 भयानक विरोध पत्करून आणि त्याला तोंड देऊन. 0:06:14.112,0:06:16.818 अहमद प्रमाणे. [br]हे काही त्याचं खरं नाव नव्हे. 0:06:16.818,0:06:19.446 आणि मी तुम्हाला त्याचा चेहरा [br]दाखवू शकत नाही. 0:06:19.446,0:06:23.091 पण अहमद माझ्या एका विद्यार्थिनीचा पिता. 0:06:23.091,0:06:26.927 महिन्याभरापूर्वी, तो आणि त्याची मुलगी 0:06:26.927,0:06:30.261 SOLA हून आपल्या गावी जायला निघाले होते. 0:06:30.261,0:06:36.754 आणि ते रस्त्यावरच्या बॉम्बस्फोटात [br]अक्षरशः मरता मरता वाचले. 0:06:36.754,0:06:41.536 केवळ काही मिनिटांच्या फरकाने. 0:06:41.536,0:06:44.939 तो घरी पोहोचताच फोन वाजला. 0:06:44.939,0:06:47.634 त्याला धमकावण्यात आलं. 0:06:47.634,0:06:51.029 पुन्हा जर मुलीला शाळेत पाठवलंस, 0:06:51.029,0:06:53.806 तर आम्ही पुन्हा प्रयत्न करू म्हणून. 0:06:53.806,0:06:57.708 "हवं तर आत्ताच मारा मला," तो म्हणाला, 0:06:57.708,0:07:01.602 "पण तुमच्या जुन्या आणि [br]मागासलेल्या कल्पनांपायी 0:07:01.602,0:07:06.434 मी माझ्या मुलीचं भविष्य नष्ट करणार नाही." 0:07:06.434,0:07:08.803 मला जी गोष्ट अफगाणिस्तानबद्दल जाणवली आहे, 0:07:08.803,0:07:11.050 आणि जी पाश्चात्यांकडून नेहमी डावलली जाते [br]ती अशी, की 0:07:13.297,0:07:15.546 आमच्यापैकी बहुतेक यशस्वी मुलींच्या पाठीशी[br]एक पिता असतो, 0:07:15.546,0:07:22.909 जो त्याच्या मुलीची योग्यता जाणतो 0:07:22.909,0:07:27.536 आणि तिचं यश हेच आपलं यश मानतो. 0:07:27.536,0:07:31.474 (मला) असं म्हणायचं नाही, की [br]आमच्या माता आमच्या यशाच्या [br]शिल्पकार नसतात. 0:07:31.474,0:07:36.010 खरं तर, बरेचदा त्याच पुढाकार घेऊन 0:07:36.010,0:07:39.350 मुलींना शिकवण्याचा आग्रह धरतात. 0:07:39.350,0:07:42.761 पण अफगाणिस्तानासारख्या [br]समाजाच्या संदर्भात, 0:07:42.761,0:07:46.181 आम्हाला पुरुषांचा पाठिंबा आवश्यक असतो. 0:07:46.181,0:07:49.731 तालिबानच्या राजवटीत,[br]शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या 0:07:49.731,0:07:51.523 शेकड्यात होती. 0:07:51.523,0:07:53.861 आठवतं का, ते बेकायदेशीर होतं. 0:07:53.861,0:07:59.353 पण आज, अफगाणिस्तानातल्या [br]तीस लाखावर मुली शाळेत शिकताहेत. 0:07:59.353,0:08:06.600 (टाळ्या) 0:08:06.600,0:08:12.751 अमेरिकेतून अफगाणिस्तान खूप वेगळा दिसतो. 0:08:12.751,0:08:17.723 मला वाटतं, अमेरिकेतून पाहताना [br]हे बदल क्षीण दिसतात. 0:08:17.723,0:08:20.773 अमेरिकन फौजा परतल्यानंतर [br]हे बदल फार टिकणार नाहीत, 0:08:20.773,0:08:25.265 अशी भीती वाटते. 0:08:25.265,0:08:28.918 पण मी जेव्हा अफगाणिस्तानात परतते, 0:08:28.918,0:08:33.703 माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी पाहते, 0:08:33.703,0:08:36.072 त्यांच्या पाठीशी उभे असणारे [br]त्यांचे पालक पाहते, 0:08:38.441,0:08:40.810 तेव्हा मला उज्ज्वल भविष्य दिसतं, 0:08:40.810,0:08:44.110 आणि कायम टिकणारे बदल दिसतात. 0:08:44.110,0:08:52.577 माझ्यासाठी, अफगाणिस्तान देश आहे [br]आशेचा आणि अमर्याद शक्यतांचा, 0:08:52.577,0:08:55.989 आणि दरदिवशी 0:08:55.989,0:08:59.397 SOLAच्या मुली मला याची आठवण करून देतात. 0:08:59.397,0:09:02.604 माझ्यासारख्याच, त्याही मोठी स्वप्नं पाहताहेत. 0:09:02.604,0:09:04.315 धन्यवाद. 0:09:04.315,0:09:15.192 (टाळ्या)