1 00:00:00,000 --> 00:00:00,250 मला आठवतंय, मी अकरा वर्षांची असताना 2 00:00:02,404 --> 00:00:06,966 एके दिवशी सकाळी मला एका खुशखबरीने जाग आली होती. 3 00:00:06,966 --> 00:00:09,437 माझे वडील त्यांच्या छोट्या करड्या रेडिओवर 4 00:00:09,437 --> 00:00:13,611 बीबीसीच्या बातम्या ऐकत होते. 5 00:00:13,611 --> 00:00:16,487 त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हास्य होतं. हे एक नवलच होतं. 6 00:00:16,487 --> 00:00:20,458 कारण बातम्या ऐकून ते नेहमी उदास होत असत. 7 00:00:20,458 --> 00:00:25,343 "तालिबान निघून गेले" ते ओरडले. 8 00:00:25,343 --> 00:00:27,931 मला याचा अर्थ समजला नाही. 9 00:00:27,931 --> 00:00:33,117 पण माझे वडील खूप खूष दिसत होते. 10 00:00:33,117 --> 00:00:41,628 "आता तुला खऱ्या शाळेत जाता येईल." ते म्हणाले. 11 00:00:41,628 --> 00:00:46,797 ती सकाळ मी कधीच विसरणार नाही. 12 00:00:46,797 --> 00:00:51,965 खरी शाळा. 13 00:00:51,965 --> 00:00:55,073 मी सहा वर्षांची होते तेव्हा तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला 14 00:00:55,073 --> 00:00:58,596 आणि मुलींचं शिक्षण बेकायदेशीर ठरवलं. 15 00:00:58,596 --> 00:01:01,704 पुढची पाच वर्षं मी मुलांसारखे कपडे घालीत असे. 16 00:01:01,704 --> 00:01:04,215 माझ्या मोठ्या बहिणीला एकटीने हिंडायला बंदी होती. 17 00:01:04,215 --> 00:01:09,629 म्हणून, तिच्यासोबत एका छुप्या शाळेत जाण्यासाठी. 18 00:01:09,629 --> 00:01:14,254 आम्हा दोघींना शिकण्याचा तो एकच मार्ग होता. 19 00:01:14,254 --> 00:01:17,488 दर दिवशी आम्ही वेगळ्या रस्त्याने जायचो. 20 00:01:17,488 --> 00:01:21,511 कुणाला संशय येऊ नये म्हणून. 21 00:01:21,511 --> 00:01:23,705 आम्ही आमची पुस्तकं पिशवीत लपवून 22 00:01:23,705 --> 00:01:29,841 सहज बाजारात गेल्यासारख्या जायचो. 23 00:01:29,841 --> 00:01:32,217 ही शाळा एका घरात होती. 24 00:01:32,217 --> 00:01:37,880 आम्ही शंभरावर मुलं एका छोट्या खोलीत जमायचो. 25 00:01:37,880 --> 00:01:43,730 हिवाळ्यात ते उबदार वाटे. पण उन्हाळ्यात अतिशय उकडायचं. 26 00:01:43,730 --> 00:01:46,251 आम्ही जाणूनबुजून जीव धोक्यात घालीत होतो. 27 00:01:46,251 --> 00:01:50,605 शिक्षक, विद्यार्थी आणि आमचे पालक, सर्वच. 28 00:01:50,605 --> 00:01:52,978 अनेकदा शाळा अचानक आठवडाभर बंद ठेवली जाई. 29 00:01:52,978 --> 00:01:56,894 तालिबानला संशय आला म्हणून. 30 00:01:56,894 --> 00:01:59,674 आम्हाला नेहमी वाटे, त्यांना आपल्याबद्दल काय माहित असेल? 31 00:01:59,674 --> 00:02:02,706 आपला पाठलाग होत असेल का? 32 00:02:02,706 --> 00:02:06,238 आपण कुठे राहतो ते त्यांना ठाऊक असेल का? 33 00:02:06,238 --> 00:02:08,896 आम्हाला भीती वाटे. 34 00:02:08,896 --> 00:02:15,822 पण तरीही आम्हाला शाळेत जायचं होतं. 35 00:02:15,822 --> 00:02:19,562 माझं भाग्य मोठं, म्हणून मी अशा एका कुटुंबात लहानाची मोठी झाले 36 00:02:19,562 --> 00:02:25,809 की जिथे शिक्षणाला मान होता आणि मुली ही मौल्यवान ठेव होती. 37 00:02:25,809 --> 00:02:30,960 माझे आजोबा त्यांच्या काळातले एक असामान्य पुरुष होते. 38 00:02:30,960 --> 00:02:34,439 अफगाणिस्तानाच्या एका दुर्गम भागातल्या या सर्वस्वी बेलगाम माणसाने, 39 00:02:34,439 --> 00:02:37,935 आग्रह धरला, त्यांच्या मुलीला, म्हणजे माझ्या आईला, शाळेत घालण्याचा. 40 00:02:37,935 --> 00:02:44,348 आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. 41 00:02:44,348 --> 00:02:47,858 पण माझी आई शिकली, ती शिक्षिका झाली. 42 00:02:47,858 --> 00:02:50,884 ही पहा. 43 00:02:50,884 --> 00:02:53,551 दोन वर्षांपूर्वी ती निवृत्त झाली, ती केवळ 44 00:02:53,551 --> 00:02:58,929 आमच्या घराचं रूपांतर, आजूबाजूच्या मुली आणि स्त्रियांच्या शाळेत करण्यासाठीच. 45 00:02:58,929 --> 00:03:03,317 आणि माझे वडील - हे पहा - 46 00:03:03,317 --> 00:03:10,218 त्यांच्या घराण्यातले शिकणारे ते पहिलेच. 47 00:03:10,218 --> 00:03:12,327 तेव्हा त्यांची मुलं आणि मुलीसुद्धा शिकणार 48 00:03:12,327 --> 00:03:17,416 यात शंकाच नव्हती. 49 00:03:17,416 --> 00:03:21,836 तालिबानसारखे धोके असूनही. 50 00:03:21,836 --> 00:03:30,182 त्यांच्या मते, आपल्या मुलांना शिक्षण न देणं हा जास्त मोठा धोका होता. 51 00:03:30,182 --> 00:03:33,310 मला आठवतंय, तालिबानच्या काळात काही वेळा 52 00:03:33,310 --> 00:03:38,403 आपल्या आयुष्याकडे पाहून मी खूप हताश होई. 53 00:03:38,403 --> 00:03:42,355 तसंच सततची भीती, आणि समोर भविष्य दिसत नसल्यामुळेही. 54 00:03:42,355 --> 00:03:45,409 मला (शिक्षण) सोडून द्यावंसं वाटे. 55 00:03:45,409 --> 00:03:48,545 पण माझे वडील, 56 00:03:48,545 --> 00:03:51,054 ते म्हणत, 57 00:03:51,054 --> 00:03:53,159 "ऐक, माझ्या मुली, 58 00:03:53,159 --> 00:03:56,475 आयुष्यात आपल्या मालकीचं जे काही असतं, ते सगळं गमावलं जाऊ शकतं. 59 00:03:56,475 --> 00:04:00,680 आपले पैसे चोरले जाऊ शकतात. लढाईत आपल्याला आपल्या घरातून हाकललं जाऊ शकतं. 60 00:04:00,680 --> 00:04:03,461 पण कायम आपल्यासोबत राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे 61 00:04:03,461 --> 00:04:06,769 ही इथे आहे ती. 62 00:04:06,769 --> 00:04:11,685 आणि आम्हाला जर तुझ्या शाळेची फी भरण्याकरता आमचं रक्त विकावं लागणार असेल, 63 00:04:11,685 --> 00:04:14,906 तर आम्ही ते विकू. 64 00:04:14,906 --> 00:04:19,988 तर, अजूनही तुला (शिक्षण) सुरू ठेवावसं वाटत नाही काय?” 65 00:04:19,988 --> 00:04:23,116 आज मी बावीस वर्षांची आहे. 66 00:04:23,116 --> 00:04:25,886 मी लहानाची मोठी झाले, ती 67 00:04:25,886 --> 00:04:29,056 दशकभर चाललेल्या युद्धात नाश पावलेल्या एका देशात. 68 00:04:29,056 --> 00:04:34,197 माझ्या वयाच्या सहा टक्क्याहून कमी स्त्रियांनी माध्यमिक शाळा पार केली आहे. 69 00:04:34,197 --> 00:04:36,662 माझ्या कुटुंबाने जर माझ्या शिक्षणाचा निर्धार केला नसता, 70 00:04:36,662 --> 00:04:39,266 तर मीही त्या (स्त्रियां)तलीच एक ठरले असते. 71 00:04:39,266 --> 00:04:44,581 त्याऐवजी, आज मी इथे मिडलबरी कॉलेजची पदवीधर म्हणून अभिमानाने उभी आहे. 72 00:04:44,581 --> 00:04:54,594 (टाळ्या) 73 00:04:54,594 --> 00:04:57,542 मी जेव्हा अफगाणिस्तानात परतले, तेव्हा 74 00:04:57,542 --> 00:05:02,121 मुलींना शिकवल्याबद्दल घरातून हद्दपार झालेल्या माझ्या आजोबांनी 75 00:05:02,121 --> 00:05:05,615 माझं सर्वप्रथम अभिनंदन केलं. 76 00:05:05,615 --> 00:05:08,245 ते बढाई मारतात, ती केवळ माझ्या पदवीची नव्हे, 77 00:05:08,245 --> 00:05:10,454 तर (पदवी घेणारी) मी पहिलीच स्त्री म्हणूनही. 78 00:05:10,454 --> 00:05:12,176 आणि मी पहिलीच स्त्री आहे, 79 00:05:12,176 --> 00:05:15,678 त्यांना काबूलच्या रस्त्यांतून स्वतः गाडी चालवून घेऊन जाणारी, म्हणून. 80 00:05:15,678 --> 00:05:21,040 (टाळ्या) 81 00:05:21,040 --> 00:05:23,689 माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास आहे. 82 00:05:23,689 --> 00:05:28,639 मी मोठी स्वप्नं पाहते, पण माझ्या घरच्यांची स्वप्नं त्याहूनही मोठी आहेत. 83 00:05:28,639 --> 00:05:33,106 म्हणून मी १० x १० ची वैश्विक राजदूत झाले. 84 00:05:33,106 --> 00:05:35,870 १० x १० ही स्त्रीशिक्षणाची एक जागतिक मोहीम आहे. 85 00:05:35,870 --> 00:05:38,449 तशीच मी SOLA ची सहसंस्थापिका झाले. 86 00:05:38,449 --> 00:05:40,916 SOLA ही अफ़गाणिस्तानातली पहिलीच आणि कदाचित एकमेव 87 00:05:40,916 --> 00:05:42,645 मुलींची निवासी शाळा आहे. 88 00:05:42,645 --> 00:05:48,282 अशा एका देशातली, जिथे अजूनही मुलींनी शाळेत जाणं धोक्याचं आहे. 89 00:05:48,282 --> 00:05:52,047 कौतुकाची गोष्ट अशी, की माझ्या शाळेतल्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी 90 00:05:52,047 --> 00:05:57,675 मला सुसंधी पटकावताना दिसताहेत. 91 00:05:57,675 --> 00:06:00,602 आणि त्यांचे पालक आणि जन्मदाते, 92 00:06:00,602 --> 00:06:05,180 माझ्या घरच्यांप्रमाणेच, त्यांची पाठराखण करताना दिसताहेत, 93 00:06:05,180 --> 00:06:14,112 भयानक विरोध पत्करून आणि त्याला तोंड देऊन. 94 00:06:14,112 --> 00:06:16,818 अहमद प्रमाणे. हे काही त्याचं खरं नाव नव्हे. 95 00:06:16,818 --> 00:06:19,446 आणि मी तुम्हाला त्याचा चेहरा दाखवू शकत नाही. 96 00:06:19,446 --> 00:06:23,091 पण अहमद माझ्या एका विद्यार्थिनीचा पिता. 97 00:06:23,091 --> 00:06:26,927 महिन्याभरापूर्वी, तो आणि त्याची मुलगी 98 00:06:26,927 --> 00:06:30,261 SOLA हून आपल्या गावी जायला निघाले होते. 99 00:06:30,261 --> 00:06:36,754 आणि ते रस्त्यावरच्या बॉम्बस्फोटात अक्षरशः मरता मरता वाचले. 100 00:06:36,754 --> 00:06:41,536 केवळ काही मिनिटांच्या फरकाने. 101 00:06:41,536 --> 00:06:44,939 तो घरी पोहोचताच फोन वाजला. 102 00:06:44,939 --> 00:06:47,634 त्याला धमकावण्यात आलं. 103 00:06:47,634 --> 00:06:51,029 पुन्हा जर मुलीला शाळेत पाठवलंस, 104 00:06:51,029 --> 00:06:53,806 तर आम्ही पुन्हा प्रयत्न करू म्हणून. 105 00:06:53,806 --> 00:06:57,708 "हवं तर आत्ताच मारा मला," तो म्हणाला, 106 00:06:57,708 --> 00:07:01,602 "पण तुमच्या जुन्या आणि मागासलेल्या कल्पनांपायी 107 00:07:01,602 --> 00:07:06,434 मी माझ्या मुलीचं भविष्य नष्ट करणार नाही." 108 00:07:06,434 --> 00:07:08,803 मला जी गोष्ट अफगाणिस्तानबद्दल जाणवली आहे, 109 00:07:08,803 --> 00:07:11,050 आणि जी पाश्चात्यांकडून नेहमी डावलली जाते ती अशी, की 110 00:07:13,297 --> 00:07:15,546 आमच्यापैकी बहुतेक यशस्वी मुलींच्या पाठीशी एक पिता असतो, 111 00:07:15,546 --> 00:07:22,909 जो त्याच्या मुलीची योग्यता जाणतो 112 00:07:22,909 --> 00:07:27,536 आणि तिचं यश हेच आपलं यश मानतो. 113 00:07:27,536 --> 00:07:31,474 (मला) असं म्हणायचं नाही, की आमच्या माता आमच्या यशाच्या शिल्पकार नसतात. 114 00:07:31,474 --> 00:07:36,010 खरं तर, बरेचदा त्याच पुढाकार घेऊन 115 00:07:36,010 --> 00:07:39,350 मुलींना शिकवण्याचा आग्रह धरतात. 116 00:07:39,350 --> 00:07:42,761 पण अफगाणिस्तानासारख्या समाजाच्या संदर्भात, 117 00:07:42,761 --> 00:07:46,181 आम्हाला पुरुषांचा पाठिंबा आवश्यक असतो. 118 00:07:46,181 --> 00:07:49,731 तालिबानच्या राजवटीत, शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या 119 00:07:49,731 --> 00:07:51,523 शेकड्यात होती. 120 00:07:51,523 --> 00:07:53,861 आठवतं का, ते बेकायदेशीर होतं. 121 00:07:53,861 --> 00:07:59,353 पण आज, अफगाणिस्तानातल्या तीस लाखावर मुली शाळेत शिकताहेत. 122 00:07:59,353 --> 00:08:06,600 (टाळ्या) 123 00:08:06,600 --> 00:08:12,751 अमेरिकेतून अफगाणिस्तान खूप वेगळा दिसतो. 124 00:08:12,751 --> 00:08:17,723 मला वाटतं, अमेरिकेतून पाहताना हे बदल क्षीण दिसतात. 125 00:08:17,723 --> 00:08:20,773 अमेरिकन फौजा परतल्यानंतर हे बदल फार टिकणार नाहीत, 126 00:08:20,773 --> 00:08:25,265 अशी भीती वाटते. 127 00:08:25,265 --> 00:08:28,918 पण मी जेव्हा अफगाणिस्तानात परतते, 128 00:08:28,918 --> 00:08:33,703 माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी पाहते, 129 00:08:33,703 --> 00:08:36,072 त्यांच्या पाठीशी उभे असणारे त्यांचे पालक पाहते, 130 00:08:38,441 --> 00:08:40,810 तेव्हा मला उज्ज्वल भविष्य दिसतं, 131 00:08:40,810 --> 00:08:44,110 आणि कायम टिकणारे बदल दिसतात. 132 00:08:44,110 --> 00:08:52,577 माझ्यासाठी, अफगाणिस्तान देश आहे आशेचा आणि अमर्याद शक्यतांचा, 133 00:08:52,577 --> 00:08:55,989 आणि दरदिवशी 134 00:08:55,989 --> 00:08:59,397 SOLAच्या मुली मला याची आठवण करून देतात. 135 00:08:59,397 --> 00:09:02,604 माझ्यासारख्याच, त्याही मोठी स्वप्नं पाहताहेत. 136 00:09:02,604 --> 00:09:04,315 धन्यवाद. 137 00:09:04,315 --> 00:09:15,192 (टाळ्या)