WEBVTT 00:00:00.423 --> 00:00:05.309 गेल्या वर्षी मी भारतातल्या एका आदिवासी कुटुंबात राहत होते. 00:00:06.547 --> 00:00:08.228 एका दुपारी 00:00:08.252 --> 00:00:10.680 त्यांचा छोटा मुलगा जेवत होता, 00:00:10.704 --> 00:00:15.805 आणि मला पाहिल्याबरोबर त्याने लगबगीने भाजी आपल्या पाठीमागे लपवली. 00:00:16.694 --> 00:00:21.278 तो काय खात होता ते मला दाखवावं म्हणून फार आग्रह करावा लागला. 00:00:21.994 --> 00:00:25.345 त्या पतंगाच्या अळ्या होत्या. 00:00:25.369 --> 00:00:28.748 माडिया आदिवासींचे हे एक पारंपारिक पक्वान्न. 00:00:29.364 --> 00:00:30.575 मी ओरडले, 00:00:30.599 --> 00:00:33.067 "अरे देवा! या खातो आहेस तू! 00:00:33.091 --> 00:00:35.421 माझ्यासाठी थोड्या शिल्लक आहेत ना?" 00:00:36.466 --> 00:00:38.928 त्या मुलाने अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं. NOTE Paragraph 00:00:38.952 --> 00:00:40.833 "तुम्ही.. या खाता?" NOTE Paragraph 00:00:42.388 --> 00:00:45.338 "मला या फार आवडतात!" मी उत्तर दिले. NOTE Paragraph 00:00:46.513 --> 00:00:49.846 यावर त्याचा जराही विश्वास बसला नाही हे मला स्पष्ट दिसत होते. 00:00:50.678 --> 00:00:55.413 एका शहरी सुशिक्षित महिलेला त्याच्यासारखे अन्न आवडणे कसे शक्य आहे? 00:00:56.562 --> 00:01:00.277 नंतर मी त्याच्या वडिलांकडे हा विषय काढला. 00:01:00.301 --> 00:01:03.388 आणि ते प्रकरण फारच संवेदनशील निघाले. 00:01:04.793 --> 00:01:06.831 त्याचे वडील म्हणाले, 00:01:06.855 --> 00:01:10.190 "माझ्या फक्त ह्याच एका मुलाला हे खाणे आवडते. 00:01:10.214 --> 00:01:13.084 आम्ही त्याला सांगतो, 'ते खाऊ नकोस. ते वाईट असते.' 00:01:13.108 --> 00:01:14.978 पण तो ऐकत नाही. 00:01:15.002 --> 00:01:18.275 हे सर्व खाणे आम्ही बऱ्याच काळापूर्वी सोडून दिले आहे." NOTE Paragraph 00:01:19.763 --> 00:01:21.831 "का?" मी विचारले. 00:01:22.752 --> 00:01:25.126 "हे तुमचे पारंपारिक अन्न आहे. 00:01:26.108 --> 00:01:28.700 हे तुमच्या परिसरात उपलब्ध आहे. 00:01:28.724 --> 00:01:30.170 हे पौष्टिक आहे. 00:01:30.194 --> 00:01:32.898 आणि मी खात्रीने सांगू शकते, की हे स्वादिष्ट आहे. 00:01:33.584 --> 00:01:35.554 हे खाण्यात काय चूक आहे?" NOTE Paragraph 00:01:36.768 --> 00:01:38.437 ते निःशब्द झाले. NOTE Paragraph 00:01:39.360 --> 00:01:40.529 मी विचारले, 00:01:40.998 --> 00:01:45.343 "तुम्हांला सांगितले गेले आहे का, की तुमचे अन्न वाईट आहे, 00:01:45.367 --> 00:01:48.472 किंवा ते खाणे हा मागासलेपणा आहे, 00:01:48.496 --> 00:01:49.984 असंस्कृत आहे?" NOTE Paragraph 00:01:51.960 --> 00:01:53.683 त्यांनी शांतपणे मान हलवली. NOTE Paragraph 00:01:55.069 --> 00:02:01.209 भारतातील आदिवासी लोकांबरोबर काम करताना अनेकदा घडले होते, तसे याही प्रसंगी 00:02:01.233 --> 00:02:03.537 मला अन्नाबद्दल वाटणारी शरम दिसून आली. 00:02:04.545 --> 00:02:08.171 शरमेमागचा समज असा, की आपल्याला अतिशय आवडणारे, 00:02:08.195 --> 00:02:11.372 आपल्या अनेक पिढ्यांनी खाल्लेले अन्न 00:02:11.396 --> 00:02:13.416 हे काही कारणामुळे निकृष्ठ असावे, 00:02:13.440 --> 00:02:14.813 मानवासाठी योग्य नसावे. 00:02:16.008 --> 00:02:21.152 आणि ही शरम फक्त विचित्र, किळसवाण्या अन्नापुरती सीमित नाही, 00:02:21.176 --> 00:02:23.997 म्हणजे कीटक किंवा उंदीर वगैरे, 00:02:24.021 --> 00:02:27.203 तर ती सर्वसाधारण अन्नालाही लागू आहे. 00:02:27.227 --> 00:02:29.219 रानटी भाज्या, 00:02:29.243 --> 00:02:32.035 अळंबी, फुले -- 00:02:32.059 --> 00:02:36.403 थोडक्यात, शेतात पिकवले न जाता गोळा केले जाणारे काहीही. NOTE Paragraph 00:02:37.172 --> 00:02:40.708 भारतातील आदिवासींमध्ये ही शरम सर्वत्र आढळते. 00:02:41.946 --> 00:02:43.700 कोणत्याही कारणाने ती बळावते. 00:02:44.308 --> 00:02:49.194 एका शाळेत एका उच्चवर्णी शाकाहारी शिक्षकांची नेमणूक झाली. 00:02:49.218 --> 00:02:53.666 काही आठवड्यांत मुले पालकांना सांगू लागली, की खेकडे खाणे हे घाणेरडे आहे. 00:02:53.690 --> 00:02:55.364 किंवा मांस खाणे हे पाप आहे. 00:02:56.202 --> 00:03:00.272 एका सरकारी पौष्टिक अन्न योजनेद्वारे मऊ पांढरा भात पुरवला जातो. 00:03:00.296 --> 00:03:03.392 आता कोणालाही लाल तांदूळ किंवा ज्वारी बाजरी खावीशी वाटत नाही. 00:03:03.984 --> 00:03:08.798 एका गावात एक सेवाभावी संस्था गर्भवती मातांसाठी आदर्श आहाराचे तक्ते घेऊन गेली. 00:03:09.344 --> 00:03:10.640 त्याचा परिणाम लगेच झाला. 00:03:10.664 --> 00:03:13.015 सगळ्या गर्भवती माता दुःखी झाल्या. 00:03:13.039 --> 00:03:15.581 सफरचंद आणि द्राक्षे परवडणार नाहीत या विचाराने. 00:03:16.009 --> 00:03:19.219 आणि त्यांना इतर फळांचा विसर पडला, 00:03:19.243 --> 00:03:21.492 जी जंगलातून गोळा करून आणणे शक्य असते. 00:03:22.611 --> 00:03:23.999 आरोग्य सेवक, 00:03:25.086 --> 00:03:27.206 धर्म प्रचारक, 00:03:27.230 --> 00:03:29.668 कोणी सरकारी कर्मचारी, 00:03:29.692 --> 00:03:32.664 आणि त्यांची स्वतःची सुशिक्षित मुलेसुद्धा 00:03:32.688 --> 00:03:37.264 या आदिवासींना अक्षरशः ओरडून सांगताहेत 00:03:37.288 --> 00:03:40.562 की त्यांचे अन्न पुरेसे चांगले नाही. 00:03:40.586 --> 00:03:42.238 ते पुरेसे सुसंस्कृत नाही. 00:03:43.480 --> 00:03:46.024 आणि त्यामुळे हळू हळू थोडे थोडे अन्न 00:03:46.972 --> 00:03:48.519 नाहीसे होत आहे. NOTE Paragraph 00:03:49.836 --> 00:03:54.185 मला प्रश्न पडतो, तुम्ही कधी विचारात घेतले आहे का, 00:03:54.209 --> 00:03:57.754 की तुमच्याही समाजांमध्ये अन्नाचा असाच इतिहास असू शकतो. 00:03:59.468 --> 00:04:02.671 तुम्ही तुमच्या ९० वर्षांच्या आजीशी बोललात, 00:04:03.587 --> 00:04:07.493 तर तुम्ही कधी न पाहिलेल्या वा ऐकलेल्या अन्नाविषयी ती बोलेल का? 00:04:08.631 --> 00:04:11.390 तुम्हांला कल्पना आहे का, तुमच्या समाजाचे किती अन्न 00:04:11.414 --> 00:04:13.280 तुम्हांला आज उपलब्ध नाही? NOTE Paragraph 00:04:14.652 --> 00:04:16.488 स्थानिक तज्ज्ञ मला सांगतात, 00:04:16.512 --> 00:04:22.374 दक्षिण आफ्रिकेतली अन्नाची अर्थव्यवस्था आज पूर्णपणे आयात अन्नावर आधारित आहे. 00:04:23.493 --> 00:04:25.637 मका हे मुख्य अन्न झाले आहे, 00:04:25.661 --> 00:04:31.635 तर स्थानिक ज्वारी, बाजरी, कंद हे सर्व नष्ट झाले आहेत. 00:04:32.384 --> 00:04:35.406 तशीच जंगलात उगवणारी कडधान्ये आणि भाज्या. 00:04:35.430 --> 00:04:39.058 लोक बटाटे आणि कांदे , कोबी आणि गाजर खाताहेत. NOTE Paragraph 00:04:39.921 --> 00:04:41.771 माझ्या देशात 00:04:41.795 --> 00:04:44.598 अन्नाचा हा ऱ्हास प्रचंड प्रमाणावर झालेला आहे. 00:04:45.077 --> 00:04:49.144 आधुनिक भारत अडकला आहे तांदूळ, गहू 00:04:49.168 --> 00:04:51.352 आणि मधुमेह यांच्या विळख्यात. 00:04:52.220 --> 00:04:57.401 आपण काही अन्न पूर्णपणे विसरून गेलो आहोत. उदाहरणार्थ, विविध प्रकारचे कंद, 00:04:57.425 --> 00:05:01.260 झाडांचे गोंद, मासे, कवचधारी मासे, 00:05:01.284 --> 00:05:03.176 तेलबिया, 00:05:03.200 --> 00:05:07.285 गोगलगायसदृश प्राणी, अळंबी, कीटक, 00:05:07.309 --> 00:05:10.436 नामशेष न झालेल्या छोट्या प्राण्यांचे मांस. 00:05:10.460 --> 00:05:14.629 हे सर्व आमच्या परिसरात उपलब्ध होते. NOTE Paragraph 00:05:15.804 --> 00:05:17.645 मग हे सर्व अन्न कुठे गेले? 00:05:18.630 --> 00:05:21.719 अन्नधान्याच्या आपल्या आधुनिक टोपल्या इतक्या आखूड कशा झाल्या? 00:05:22.895 --> 00:05:29.044 आपण गुंतागुंतीच्या राजकीय, अर्थशास्त्रीय आणि पर्यावरणवादी कारणांविषयी बोलू शकतो. 00:05:29.068 --> 00:05:33.349 पण मी शरम या मानवी भावनेविषयी बोलणार आहे. 00:05:34.590 --> 00:05:38.315 कारण शरम हा निर्णायक बिंदू असतो, 00:05:38.339 --> 00:05:42.438 जिथे अन्न खरोखर तुमच्या ताटातून नाहीसे होते. NOTE Paragraph 00:05:43.444 --> 00:05:44.900 शरम काय करते? 00:05:45.845 --> 00:05:48.512 शरम तुम्हांला खुजे वाटायला लावते, 00:05:48.536 --> 00:05:50.071 दुःखी, 00:05:50.095 --> 00:05:51.317 नालायक, 00:05:51.341 --> 00:05:52.715 अवमानवी. 00:05:53.543 --> 00:05:57.549 शरम आकलनात विसंगती निर्माण करते. 00:05:58.115 --> 00:05:59.906 ती अन्नविषयक सत्याचा विपर्यास करते. NOTE Paragraph 00:06:00.963 --> 00:06:02.676 आपण हे एक उदाहरण घेऊ. 00:06:03.549 --> 00:06:05.793 तुम्हांला हे आवडेल का? 00:06:06.742 --> 00:06:08.945 एक अद्भुत, विविधोपयोगी प्राथमिक अन्न, 00:06:09.817 --> 00:06:13.113 जे तुमच्या परिसरात विपुलतेने उपलब्ध आहे. 00:06:13.137 --> 00:06:15.298 तुम्हांला फक्त ते गोळा करावे लागेल, 00:06:15.322 --> 00:06:17.695 वाळवावे लागेल, साठवावे लागेल. 00:06:17.719 --> 00:06:20.093 मग ते तुम्हांला वर्षभर पुरेल. 00:06:20.117 --> 00:06:24.033 तुम्ही त्यापासून हवे तितके विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकाल. 00:06:24.701 --> 00:06:28.516 भारतात असेच एक अन्न होते, महुआ. 00:06:28.540 --> 00:06:29.981 हे त्याचे फूल. 00:06:30.989 --> 00:06:34.895 गेली तीन वर्षे मी या अन्नावर संशोधन करत आहे. 00:06:35.651 --> 00:06:40.230 हे अतिशय पौष्टिक आहे, हे आदिवासी परंपरा जाणते, 00:06:40.254 --> 00:06:42.311 तसेच विज्ञानही जाणते. 00:06:43.130 --> 00:06:44.997 आदिवासींसाठी 00:06:45.021 --> 00:06:49.398 वर्षातले चार ते सहा महिने हे मुख्य अन्न असे. 00:06:50.739 --> 00:06:54.447 हे अनेक प्रकारे तुमच्या स्थानिक मरुला सारखे आहे. 00:06:54.471 --> 00:06:57.403 फरक इतकाच, की हे फूल आहे, फळ नव्हे. 00:06:58.236 --> 00:07:00.169 जिथे जंगले समृद्ध असतात, 00:07:00.193 --> 00:07:03.548 तिथे लोकांना खाण्यासाठी वर्षभर भरपूर अन्न तर मिळतेच, 00:07:03.572 --> 00:07:05.441 आणि विकण्यासाठीही पुरेसे शिल्लक राहते. NOTE Paragraph 00:07:06.292 --> 00:07:11.273 मला महुआचे ३५ प्रकारचे पदार्थ सापडले, 00:07:11.297 --> 00:07:13.971 जे आता कोणीही बनवत नाही. 00:07:15.225 --> 00:07:19.860 हे अन्न आता अन्न म्हणून ओळखलेसुद्धा जात नाही, 00:07:19.884 --> 00:07:22.036 तर दारूसाठी कच्चा माल म्हणून ओळखले जाते. 00:07:23.162 --> 00:07:25.830 हे घरात बाळगण्यासाठी अटक होऊ शकते. 00:07:26.417 --> 00:07:28.597 कारण? शरम. 00:07:29.211 --> 00:07:32.646 भारतभर सर्वत्र मी आदिवासींशी बोलले, 00:07:32.670 --> 00:07:35.211 महुआ खाणे बंद का झाले याविषयी. 00:07:35.701 --> 00:07:38.173 आणि मला सगळीकडे तेच एक उत्तर मिळाले. 00:07:39.237 --> 00:07:42.484 "आम्ही दरिद्री, भुकेकंगाल होतो, तेव्हा ते खात होतो. 00:07:43.405 --> 00:07:45.224 आता आम्ही ते का खावं? 00:07:45.248 --> 00:07:47.375 आमच्याजवळ तांदूळ किंवा गहू आहे." 00:07:48.574 --> 00:07:50.869 आणि त्याच एका दमात, 00:07:50.893 --> 00:07:54.111 महुआ किती पौष्टिक आहे हेही लोक मला सांगतात. 00:07:54.835 --> 00:07:58.500 कोणी वृद्ध पूर्वी महुआ खात, त्यांच्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. 00:07:59.222 --> 00:08:03.186 "आमच्या आजीला दहा मुले होती. 00:08:03.210 --> 00:08:07.543 तरीही ती किती कष्ट करत असे. कधी दमली नाही, की आजारी पडली नाही." 00:08:08.896 --> 00:08:13.584 प्रत्येक ठिकाणी अगदी हेच दुहेरी बोलणे. 00:08:14.634 --> 00:08:15.865 हे कसे काय? 00:08:16.442 --> 00:08:18.648 तेच अन्न 00:08:18.672 --> 00:08:23.764 एकाच वेळी अतिशय पौष्टिक आणि गरिबांचे अन्न कसे ठरते, 00:08:23.788 --> 00:08:25.706 तेही एका वाक्यात? NOTE Paragraph 00:08:26.822 --> 00:08:28.906 जंगलातल्या इतर अन्नाचीही हीच कथा. 00:08:29.653 --> 00:08:32.612 मी एकामागून एक हृदयद्रावक कहाण्या ऐकल्या आहेत. 00:08:32.636 --> 00:08:35.528 दुष्काळ आणि उपासमारीच्या कहाण्या. 00:08:35.552 --> 00:08:39.376 जंगलातून गोळा केलेल्या कचऱ्यामुळे जीव वाचल्याच्या कहाण्या. 00:08:40.455 --> 00:08:42.001 अन्न नव्हते, म्हणून. 00:08:43.207 --> 00:08:45.272 थोडे जास्त खोलात शिरल्यावर मला कळले, 00:08:45.296 --> 00:08:49.029 की अभाव सर्व अन्नाचा नव्हता, 00:08:49.053 --> 00:08:51.586 तर फक्त शिष्टसंमत अन्नाचा, जसे तांदूळ. 00:08:52.396 --> 00:08:54.061 मी त्यांना विचारले, 00:08:54.085 --> 00:08:57.838 "तुम्ही ज्याला कचरा म्हणता, तो खाण्यास योग्य आहे हे कसे कळले? 00:08:59.141 --> 00:09:03.878 तुम्हांला कोणी सांगितले, की ते विशिष्ट कडू कंद गोड करण्यासाठी 00:09:03.902 --> 00:09:06.213 रात्रभर प्रवाहात ठेवावे? 00:09:07.380 --> 00:09:10.395 किंवा गोगलगायीच्या कवचातले मांस कसे काढावे? 00:09:10.419 --> 00:09:12.869 किंवा जंगली उंदिरासाठी सापळा कसा लावावा?" 00:09:14.085 --> 00:09:17.327 मग ते आपली डोकी खाजवू लागतात, 00:09:17.351 --> 00:09:20.487 आणि त्यांच्या लक्षात येते, की आपण हे वडिलधाऱ्यांकडून शिकलो आहोत. 00:09:21.347 --> 00:09:27.265 कित्येक शतके आपले पूर्वज या अन्नावर जगत होते, प्रगती करत होते. 00:09:27.289 --> 00:09:29.470 तांदूळ मिळण्यापूर्वी. 00:09:29.494 --> 00:09:32.529 आणि ते आपल्या या पिढीपेक्षा कितीतरी निरोगी होते. NOTE Paragraph 00:09:34.029 --> 00:09:36.318 अशी ही अन्नाची कहाणी. 00:09:37.898 --> 00:09:39.467 ही आहे शरमेची करामत: 00:09:39.491 --> 00:09:45.857 लोकांच्या आयुष्यातून, आठवणीतून अन्न आणि अन्न परंपरा नाहीशा करणे. 00:09:45.881 --> 00:09:48.051 त्यांना जाणीवही होऊ न देता. NOTE Paragraph 00:09:49.971 --> 00:09:52.914 हा कल कसा पालटावा? 00:09:53.847 --> 00:09:59.882 आपल्या नैसर्गिक अन्नवापराच्या सुंदर, व्यामिश्र पद्धती परत कशा मिळवाव्यात? 00:10:01.017 --> 00:10:05.818 धरणीमातेने तिच्या निसर्गचक्रानुसार आपल्याला प्रेमाने दिलेले अन्न, 00:10:06.718 --> 00:10:10.864 जे आपल्या आज्यापणज्यांनी आनंदाने रांधले, 00:10:10.888 --> 00:10:13.768 आणि आपल्या पितामहांनी जे कृतज्ञतेने खाल्ले 00:10:14.786 --> 00:10:19.487 असे पौष्टिक, स्थानिक, नैसर्गिक अन्न, 00:10:19.511 --> 00:10:22.311 विविधतेने नटलेले, स्वादिष्ट अन्न, 00:10:22.335 --> 00:10:25.312 जे पिकवावे लागत नाही, 00:10:25.336 --> 00:10:27.477 जे पर्यावरणाची हानी करत नाही, 00:10:27.501 --> 00:10:29.106 ज्यासाठी काही खर्च येत नाही? 00:10:30.360 --> 00:10:32.210 या अन्नाची आपल्या सर्वांना गरज आहे, 00:10:32.234 --> 00:10:35.338 मला वाटते, त्याचे कारण मी तुम्हांला सांगायला नको. 00:10:36.489 --> 00:10:40.093 जागतिक आरोग्यविषयक संकटाबद्दल मी सांगण्याची गरज नाही. 00:10:40.117 --> 00:10:42.659 हवामान बदल, पाणीविषयक संकट 00:10:42.683 --> 00:10:44.023 मातीचा कस कमी होणे, 00:10:44.047 --> 00:10:46.039 कोलमडलेल्या शेतकी व्यवस्था, 00:10:46.063 --> 00:10:47.218 हे सर्व. 00:10:48.040 --> 00:10:52.333 पण माझ्यासाठी, या अन्नाच्या गरजेमागची दुसरी काही कारणे तितकीच महत्त्वाची आहेत, 00:10:52.357 --> 00:10:54.139 जी आपल्याला मनात खोलवर जाणवतात, 00:10:55.059 --> 00:10:57.652 कारण अन्न हे बरेच काही असते. 00:10:58.355 --> 00:11:02.072 अन्न म्हणजे पुष्टी, समाधान, 00:11:02.096 --> 00:11:04.861 सृजनशीलता, समाज, 00:11:04.885 --> 00:11:08.610 आनंद, सुरक्षितता, स्वत्व 00:11:08.634 --> 00:11:09.992 आणि इतरही बरेच काही. NOTE Paragraph 00:11:10.708 --> 00:11:13.097 आपण अन्नाशी कसा संबंध जोडतो 00:11:13.121 --> 00:11:15.189 यावर आयुष्यात बरेचसे काही अवलंबून असते. 00:11:15.745 --> 00:11:18.280 त्यावरून आपण आपल्या शरीराशी कसा संबंध जोडतो हे ठरते, 00:11:19.027 --> 00:11:21.391 कारण आपले शरीर म्हणजे शेवटी अन्नच असते. 00:11:22.192 --> 00:11:25.759 अन्न हे एक मूलभूत संबंध जोडते, 00:11:25.783 --> 00:11:27.326 आपल्या अस्तित्वाशी. 00:11:28.464 --> 00:11:31.501 या अन्नाची आज सर्वात जास्त गरज आहे. 00:11:31.525 --> 00:11:35.376 मानवप्राणी म्हणून आपल्या अस्तित्वाची नवी व्याख्या करण्यासाठी 00:11:35.400 --> 00:11:37.677 निसर्गरचनेचा एक भाग या नात्याने. 00:11:38.507 --> 00:11:41.169 आज या नव्या व्याख्येची गरज आहे का? NOTE Paragraph 00:11:43.692 --> 00:11:47.682 माझ्यासाठी, एकमेव खरे उत्तर आहे प्रेम. 00:11:49.261 --> 00:11:54.247 कारण प्रेम ही शरमेला विरोध करणारी एकमेव गोष्ट आहे. 00:11:55.571 --> 00:12:00.499 आपल्या अन्नाशी असणाऱ्या संबंधात जास्त प्रेम कसे आणावे? 00:12:02.285 --> 00:12:06.065 माझ्यासाठी, प्रेम म्हणजे प्रामुख्याने 00:12:06.089 --> 00:12:09.857 वेग जरा कमी करण्याची इच्छा. 00:12:10.826 --> 00:12:14.193 आपला वेळ देऊन 00:12:14.217 --> 00:12:18.470 संवेदना जाणवू देणे, ऐकणे, माहिती विचारणे. NOTE Paragraph 00:12:19.704 --> 00:12:22.188 स्वतःच्या शरीराचे संकेत ऐकणे हेही प्रेम म्हणता येईल. 00:12:22.875 --> 00:12:29.587 आपल्या शरीरांच्या काय गरजा असतात, खाण्याच्या सवयी, कल्पना, 00:12:30.188 --> 00:12:31.565 आणि व्यसनांच्या मुळाशी? 00:12:32.488 --> 00:12:36.497 या कल्पना तपासून पाहण्यासाठी वेळ देणे, हेही प्रेम असू शकेल. 00:12:37.159 --> 00:12:38.756 त्या कल्पना कुठून आल्या? 00:12:39.586 --> 00:12:42.115 त्यासाठी कदाचित बालपणात मागे जावे लागेल. 00:12:43.012 --> 00:12:44.719 त्या वेळी कोणते अन्न आवडत होते? 00:12:45.577 --> 00:12:47.107 आता काय बदलले आहे? 00:12:47.940 --> 00:12:53.038 कदाचित प्रेम म्हणजे एखादी शांत संध्याकाळ वडिलधाऱ्यांबरोबर घालवणे असेल. 00:12:53.062 --> 00:12:55.748 त्यांच्या अन्नविषयक आठवणी ऐकणे, 00:12:55.772 --> 00:12:58.697 त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात त्यांना मदत करणे, 00:12:58.721 --> 00:13:00.162 आणि एकत्र भोजन घेणे. 00:13:02.035 --> 00:13:06.251 हे प्रेम म्हणजे आठवण ठेवणे, की 00:13:06.275 --> 00:13:08.433 मानवता अथांग आहे, 00:13:08.457 --> 00:13:10.279 आणि अन्नविषयक निवडी भिन्न असू शकतात. 00:13:11.018 --> 00:13:14.782 प्रेम म्हणजे आदर आणि जिज्ञासा दाखवणे. 00:13:14.806 --> 00:13:16.663 दोषारोप करणे नव्हे, 00:13:16.687 --> 00:13:20.375 कोणी एखादे पूर्णपणे अनोळखी अन्न खात असेल त्यावेळी. 00:13:22.344 --> 00:13:25.647 प्रेम म्हणजे चौकशी करण्यासाठी वेळ देणे, 00:13:26.591 --> 00:13:28.423 माहिती काढणे, 00:13:28.447 --> 00:13:30.326 संबंध जोडणे. 00:13:31.233 --> 00:13:34.598 फेनबॉस जंगलात शांतपणे फेरफटका करणे. 00:13:35.485 --> 00:13:39.969 एखादे झाड आपल्याशी बोलते का, ते पाहणे. 00:13:39.993 --> 00:13:41.159 तसे घडते. 00:13:41.183 --> 00:13:42.793 माझ्याशी झाडे नेहमी बोलतात. 00:13:44.936 --> 00:13:46.374 सर्वात महत्त्वाचे, NOTE Paragraph 00:13:46.524 --> 00:13:51.100 ही छोटी छोटी संशोधनाची पावले 00:13:51.301 --> 00:13:55.011 आपल्याला मोठ्या उत्तराकडे नेऊ शकतील असा विश्वास बाळगणे. 00:13:55.741 --> 00:13:58.496 कधी ही उत्तरे अतिशय आश्चर्यकारक असू शकतील. 00:13:59.759 --> 00:14:02.346 एकदा एका आदिवासी वैदू स्त्रीने मला सांगितले, 00:14:03.006 --> 00:14:06.361 प्रेम म्हणजे, धरणीमातेवर पावले टाकताना, 00:14:06.475 --> 00:14:08.918 आपण तिचे सर्वात लाडके मूल आहोत अशा भावनेने चालणे. 00:14:10.108 --> 00:14:14.369 असा विश्वास बाळगणे, की ती प्रामाणिक हेतूंचा आदर करते, 00:14:14.886 --> 00:14:17.454 आणि आपल्या पावलांना कसे मार्गदर्शन करावे हे ती जाणते. 00:14:17.814 --> 00:14:19.898 आशा आहे, की मी तुम्हांला प्रेरणा दिली असेल, NOTE Paragraph 00:14:20.238 --> 00:14:23.330 पूर्वजांच्या अन्नाशी संबंध जोडण्यासाठी. 00:14:23.480 --> 00:14:24.478 ऐकण्याबद्दल धन्यवाद. NOTE Paragraph 00:14:24.958 --> 00:14:27.257 (टाळ्या)