1 00:00:01,720 --> 00:00:03,096 हॅलो. 2 00:00:03,120 --> 00:00:04,320 माझं नाव सिमोन. 3 00:00:05,280 --> 00:00:08,576 तुम्ही ऐकलं असेल, की व्यासपीठावर वाटणारी भीती कमी होण्यासाठी, 4 00:00:08,600 --> 00:00:11,096 समोरचे लोक विवस्त्र बसले आहेत, अशी कल्पना करावी. 5 00:00:11,120 --> 00:00:14,496 त्यामुळे तुमचा धीर वाढू शकतो. 6 00:00:14,520 --> 00:00:15,776 पण मला वाटलं, की 7 00:00:15,800 --> 00:00:21,216 आज, २०१८ साली विवस्त्र प्रेक्षकांची कल्पना करणं विचित्र आणि चुकीचं ठरेल. 8 00:00:21,240 --> 00:00:24,256 आपण या असल्या गोष्टी मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. 9 00:00:24,280 --> 00:00:26,896 आता व्यासपीठावरच्या भीतीसाठी 10 00:00:26,920 --> 00:00:29,056 आपल्याला एक नवीन उपाय शोधला पाहिजे. 11 00:00:29,080 --> 00:00:31,216 मग माझ्या लक्षात आलं, की 12 00:00:31,240 --> 00:00:35,296 तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता आलं, 13 00:00:35,320 --> 00:00:37,736 तर फिटंफाट होईल. 14 00:00:37,760 --> 00:00:40,496 म्हणजे माझ्याकडेही पुष्कळ डोळे असले, 15 00:00:40,520 --> 00:00:43,296 तर मग मला तितकीशी भीती वाटणार नाही. 16 00:00:43,320 --> 00:00:47,056 म्हणून मग आजच्या व्याख्यानासाठी मी एक शर्ट तयार केला. 17 00:00:47,230 --> 00:00:50,230 (खुळखुळ आवाज ) 18 00:00:53,000 --> 00:00:54,920 (हशा) 19 00:00:57,800 --> 00:01:00,776 हे आहेत हलणारे डोळे. 20 00:01:00,800 --> 00:01:02,896 हा शर्ट बनवायला मला १४ तास 21 00:01:02,920 --> 00:01:06,616 आणि २२७ डोळे लागले. 22 00:01:06,640 --> 00:01:09,696 तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता यावं, 23 00:01:09,720 --> 00:01:12,216 हे खरं तर, हा शर्ट बनवण्यामागचं फक्त अर्धंच कारण आहे. 24 00:01:12,240 --> 00:01:14,176 आणि असं करता यावं, हे उरलेलं अर्धं कारण. 25 00:01:14,200 --> 00:01:15,536 (खुळखुळ आवाज ) 26 00:01:15,560 --> 00:01:16,816 (हशा) 27 00:01:16,840 --> 00:01:18,576 मी अशा अनेक गोष्टी करते. 28 00:01:18,600 --> 00:01:22,416 मला एखादा प्रश्न पडतो आणि मग मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढते. 29 00:01:22,440 --> 00:01:24,256 उदाहरणार्थ, दात घासणे. 30 00:01:24,280 --> 00:01:27,216 हे काम आपल्याला सर्वांना करावं लागतं, पण ते कंटाळवाणं आहे. 31 00:01:27,240 --> 00:01:29,336 कुणालाच ते आवडत नाही. 32 00:01:29,360 --> 00:01:31,736 आता इथे प्रेक्षकांत कोणी सात वर्षांची मुलं असतील, 33 00:01:31,760 --> 00:01:34,256 तर ती नक्की म्हणतील, "हो हो, अगदी खरं." 34 00:01:34,280 --> 00:01:37,120 पण हे काम एखाद्या यंत्राने केलं तर? 35 00:01:42,800 --> 00:01:45,920 (हशा) 36 00:01:46,720 --> 00:01:47,960 मी या यंत्राला 37 00:01:50,360 --> 00:01:52,320 नाव ठेवलं आहे.. टूथब्रश हेल्मेट. 38 00:01:53,000 --> 00:01:55,680 (हशा) 39 00:01:57,480 --> 00:02:00,216 (यांत्रिक हाताचा आवाज) 40 00:02:00,240 --> 00:02:03,456 (हशा) 41 00:02:03,480 --> 00:02:06,976 (टाळ्या) 42 00:02:07,000 --> 00:02:11,536 माझ्या या टूथब्रश हेल्मेटची शिफारस दहापैकी शून्य दंतवैद्यांनी केली आहे. 43 00:02:11,560 --> 00:02:15,736 या यंत्राने दंतवैद्यकशास्त्रात कसलीही क्रांती घडवली नाही. 44 00:02:15,760 --> 00:02:18,936 पण त्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. 45 00:02:18,960 --> 00:02:22,416 हे टूथब्रश हेल्मेट बनवण्याचं काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालं. 46 00:02:22,440 --> 00:02:23,976 हे यंत्र तयार झाल्यानंतर 47 00:02:24,000 --> 00:02:26,656 मी माझ्या दिवाणखान्यात गेले. कॅमेरा सुरु केला, आणि 48 00:02:26,680 --> 00:02:29,160 या यंत्राचं काम दाखवणारी सात सेकंदांची फिल्म बनवली. 49 00:02:29,760 --> 00:02:30,976 आणि आजच्या युगातली 50 00:02:31,000 --> 00:02:33,896 परीकथा अशी असते.. 51 00:02:33,920 --> 00:02:36,136 एखादी मुलगी इंटरनेटवर काहीतरी प्रसिद्ध करते. 52 00:02:36,160 --> 00:02:38,736 ते जगभर पसरतं. 53 00:02:38,760 --> 00:02:41,576 मग प्रतिसादाच्या जागेत हजारो पुरुष प्रकट होतात, 54 00:02:41,600 --> 00:02:43,296 आणि तिला लग्नाची मागणी घालतात. 55 00:02:43,320 --> 00:02:44,336 (हशा) 56 00:02:44,360 --> 00:02:46,696 पण तिकडे लक्ष न देता ती एक YouTube चॅनल काढते, 57 00:02:46,720 --> 00:02:48,360 आणि यंत्रं बनवत राहते. 58 00:02:49,120 --> 00:02:53,056 त्यावेळेपासून मी इंटरनेटवर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. 59 00:02:53,080 --> 00:02:55,576 मी आहे कुचकामी यंत्र संशोधक. 60 00:02:55,600 --> 00:02:57,256 आपण सर्व जाणताच, की 61 00:02:57,280 --> 00:03:00,936 आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 62 00:03:00,960 --> 00:03:03,056 अगदी छोटं क्षेत्र निवडणं. 63 00:03:03,080 --> 00:03:05,296 (हशा) 64 00:03:05,320 --> 00:03:09,656 (टाळ्या) 65 00:03:09,680 --> 00:03:12,856 तर, मी माझ्या यंत्रांबद्दलचा YouTube चॅनल चालवते. 66 00:03:12,880 --> 00:03:15,656 ड्रोन वापरून मी केस कापते. 67 00:03:15,680 --> 00:03:17,376 (ड्रोनचा आवाज) 68 00:03:17,400 --> 00:03:19,776 (हशा) 69 00:03:19,800 --> 00:03:20,856 (ड्रोन पडतो.) 70 00:03:20,880 --> 00:03:22,296 (हशा) 71 00:03:22,320 --> 00:03:23,416 (ड्रोनचा आवाज) 72 00:03:23,440 --> 00:03:25,336 (हशा) 73 00:03:25,360 --> 00:03:27,456 (टाळ्या) 74 00:03:27,480 --> 00:03:30,216 हे यंत्र मला सकाळी उठवतं. 75 00:03:30,240 --> 00:03:32,176 (गजर) 76 00:03:32,200 --> 00:03:34,600 (हशा) 77 00:03:37,200 --> 00:03:38,936 (व्हिडीओ) आ! 78 00:03:38,960 --> 00:03:41,536 हे यंत्र भाजी चिरायला मदत करतं. 79 00:03:41,560 --> 00:03:44,000 (सुऱ्यांची पाती भाजी चिरतात.) 80 00:03:45,200 --> 00:03:46,456 मी अभियंती नाही. 81 00:03:46,480 --> 00:03:48,816 मी विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण घेतलं नाही. 82 00:03:48,840 --> 00:03:52,416 पण शाळेत असताना मी खूप महत्त्वाकांक्षी होते. 83 00:03:52,440 --> 00:03:54,936 माध्यमिक शाळेत मी सतत ए ग्रेड मिळवत असे. 84 00:03:54,960 --> 00:03:57,176 वर्गात मी पहिल्या क्रमांकावर होते. 85 00:03:57,200 --> 00:03:58,456 पण याची दुसरी बाजू अशी, की 86 00:03:58,480 --> 00:04:02,176 या यशाबद्दलची पराकोटीची चिंता मला सतत भेडसावत असे. 87 00:04:02,200 --> 00:04:05,216 त्या सुमाराला मी माझ्या भावाला लिहिलेली ही ईमेल पहा. 88 00:04:05,240 --> 00:04:08,136 "हे सांगणं मला किती कठीण जातंय, याची तुला कल्पना येणार नाही. 89 00:04:08,160 --> 00:04:09,376 ही कबुली देताना 90 00:04:09,400 --> 00:04:10,776 मला खूप शरम वाटते आहे. 91 00:04:10,800 --> 00:04:13,016 मी मूर्ख आहे, असं लोकांना वाटायला नको. 92 00:04:13,040 --> 00:04:14,616 आता मला रडू येतंय. 93 00:04:14,640 --> 00:04:16,096 छे!" 94 00:04:16,120 --> 00:04:19,656 नाही, मी काही घराला चुकून आग वगैरे लावली नव्हती. 95 00:04:19,680 --> 00:04:23,976 ज्या गोष्टीविषयी मी इतकं अस्वस्थ होऊन ईमेल मध्ये लिहिलं ती गोष्ट होती, 96 00:04:24,000 --> 00:04:26,240 गणिताच्या परीक्षेत मिळालेली बी ग्रेड. 97 00:04:27,480 --> 00:04:30,680 तो काळ आणि हा काळ... मधल्या काळात नक्कीच काहीतरी घडलं असलं पाहिजे. 98 00:04:31,600 --> 00:04:36,016 (हशा) 99 00:04:36,040 --> 00:04:38,216 त्यापैकी एक.. पौगंडावस्था. 100 00:04:38,240 --> 00:04:39,616 (हशा) 101 00:04:39,640 --> 00:04:41,016 खरंच, सुंदर काळ होता तो. 102 00:04:41,040 --> 00:04:42,376 आणि त्याच काळात 103 00:04:42,400 --> 00:04:44,536 मला यंत्रं बनवणंही आवडू लागलं. 104 00:04:44,560 --> 00:04:47,816 हार्डवेअरबद्दल जास्त शिकावंसं वाटू लागलं. 105 00:04:47,840 --> 00:04:51,336 पण स्वतःच स्वतःला हार्डवेअरबद्दल शिकवणं, 106 00:04:51,360 --> 00:04:53,736 आणि त्यापासून यंत्रं बनवणं हे अतिशय कठीण आहे. 107 00:04:53,760 --> 00:04:55,656 त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. 108 00:04:55,680 --> 00:04:56,896 तसंच, त्यामुळे 109 00:04:56,920 --> 00:04:59,696 आपण मूर्ख आहोत असं वाटणंही साहजिक आहे. 110 00:04:59,720 --> 00:05:01,840 याच गोष्टीची भीती मला सर्वात जास्त वाटत होती. 111 00:05:02,640 --> 00:05:08,896 म्हणून मग शंभर टक्के यश मिळेल अशी योजना मी आखली. 112 00:05:08,920 --> 00:05:12,296 या योजनेत अयशस्वी होणं केवळ अशक्य होतं. 113 00:05:12,320 --> 00:05:15,296 ही योजना अशी, की नीट चालणाऱ्या यंत्रांऐवजी, 114 00:05:15,320 --> 00:05:17,880 कुचकामी यंत्रं बनवायची. 115 00:05:19,360 --> 00:05:21,616 त्यावेळी माझ्या लक्षात आलं नव्हतं,की 116 00:05:21,640 --> 00:05:25,576 कुचकामी गोष्टी बनवायलासुद्धा अक्कल लागते. 117 00:05:25,600 --> 00:05:28,256 हार्डवेअरबद्दल शिकताना, 118 00:05:28,280 --> 00:05:29,736 आयुष्यात पहिल्यांदाच, 119 00:05:29,760 --> 00:05:32,280 मला यशाची चिंता वाटेनाशी झाली. 120 00:05:32,880 --> 00:05:36,576 स्वतःवर लादलेलं अपेक्षांचं दडपण दूर केल्यावर 121 00:05:36,600 --> 00:05:39,976 त्याची जागा उत्साहाने घेतली. 122 00:05:40,000 --> 00:05:41,760 त्यामुळे तो खेळ वाटू लागला. 123 00:05:42,880 --> 00:05:44,136 एक संशोधक म्हणून, 124 00:05:44,160 --> 00:05:46,576 लोकांना कठीण वाटणाऱ्या गोष्टींमध्ये मला रस वाटतो. 125 00:05:46,600 --> 00:05:50,176 मग त्या गोष्टी छोट्या असोत, मोठ्या असोत, किंवा अधल्यामधल्या. 126 00:05:50,200 --> 00:05:54,736 TED व्याख्यान देताना काही नवीन प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. 127 00:05:54,760 --> 00:05:56,256 त्या मी सोडवू शकते. 128 00:05:56,280 --> 00:05:59,376 समस्या नीट समजून घेणं, ही कुचकामी यंत्र बनवण्याच्या प्रक्रियेतली 129 00:05:59,400 --> 00:06:00,880 पहिली पायरी आहे. 130 00:06:01,520 --> 00:06:03,056 हे व्याख्यान देताना 131 00:06:03,080 --> 00:06:06,656 येणाऱ्या समस्यांचा विचार 132 00:06:06,680 --> 00:06:07,960 मी इथे येण्यापूर्वी केला. 133 00:06:08,720 --> 00:06:10,000 काय बोलायचं ते मी विसरेन. 134 00:06:11,480 --> 00:06:12,776 लोक हसणार नाहीत. 135 00:06:12,800 --> 00:06:14,000 म्हणजे तुम्ही. 136 00:06:15,080 --> 00:06:16,296 किंवा त्याहून वाईट, 137 00:06:16,320 --> 00:06:18,240 तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसाल. 138 00:06:19,480 --> 00:06:21,056 आता इथे हसायला हरकत नाही. 139 00:06:21,080 --> 00:06:22,296 धन्यवाद. 140 00:06:22,320 --> 00:06:23,336 (हशा) 141 00:06:23,360 --> 00:06:25,736 किंवा, मला खूप भीती वाटेल. माझे हात थरथर कापतील. 142 00:06:25,760 --> 00:06:27,816 ही मला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. 143 00:06:27,840 --> 00:06:30,976 किंवा माझी पॅन्ट व्याख्यानभर उघडीच राहील. 144 00:06:31,000 --> 00:06:33,056 आणि हे मला कळणार नाही, पण तुम्हाला दिसेल. 145 00:06:33,080 --> 00:06:36,136 पण पॅन्ट बंद आहे, तेव्हा ती भीती नाही. 146 00:06:36,160 --> 00:06:39,616 पण हात थरथरण्याची भीती मला खूप अस्वस्थ करते. 147 00:06:39,640 --> 00:06:41,816 मला आठवतं, लहानपणी 148 00:06:41,840 --> 00:06:43,536 शाळेत वर्गासमोर बोलताना 149 00:06:43,560 --> 00:06:45,656 मी माझे मुद्दे एका कागदावर लिहीत असे, 150 00:06:45,680 --> 00:06:49,136 आणि त्या कागदामागे एक वही धरत असे. 151 00:06:49,160 --> 00:06:52,416 थरथरणारा कागद कोणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून. 152 00:06:52,440 --> 00:06:54,160 मी पुष्कळ व्याख्यानं देते. 153 00:06:55,000 --> 00:06:59,056 मला ठाऊक आहे, इथले निम्मे प्रेक्षक म्हणत असतील, 154 00:06:59,080 --> 00:07:01,056 "निरुपयोगी यंत्रं मजेशीर असतील, 155 00:07:01,080 --> 00:07:03,736 पण हा व्यवसाय कसा होऊ शकतो?" 156 00:07:03,760 --> 00:07:05,696 व्याख्यानं देणं हा त्याचा एक भाग आहे. 157 00:07:05,720 --> 00:07:08,776 व्यासपीठावर आयोजक एखादा पेला भरून पाणी ठेवतात. 158 00:07:08,800 --> 00:07:11,136 तहान लागली तर पिण्यासाठी. 159 00:07:11,160 --> 00:07:15,056 मला नेहमीच ते पाणी प्यायची जोरदार इच्छा होते. 160 00:07:15,080 --> 00:07:16,936 पण तो पेला उचलायची हिम्मत होत नाही. 161 00:07:16,960 --> 00:07:20,256 लोकांना माझे थरथरणारे हात दिसतील, अशी भीती वाटते. 162 00:07:20,280 --> 00:07:24,376 मग, पाण्याचा पेला उचलून देणारं यंत्र बनवलं तर? 163 00:07:24,400 --> 00:07:27,576 हलणाऱ्या डोळ्यांचा शर्ट घातलेली घाबरट मुलगी ते यंत्र विकत घेईल. 164 00:07:27,600 --> 00:07:30,600 आता हा शर्ट काढते, कारण मला तुम्हांला काहीतरी दाखवायचं आहे. 165 00:07:31,440 --> 00:07:34,320 (डोळ्यांचा खुळखुळ आवाज) 166 00:07:39,400 --> 00:07:40,816 ओह 167 00:07:40,840 --> 00:07:42,336 (खुळखुळ) 168 00:07:42,360 --> 00:07:45,120 (हशा) 169 00:07:53,480 --> 00:07:56,456 मला या यंत्रासाठी अजून नाव सुचलेलं नाही. 170 00:07:56,480 --> 00:08:00,016 "मस्तक कक्षा यंत्र" वगैरे काहीतरी म्हणू. 171 00:08:00,040 --> 00:08:03,056 कारण याचं कडं आपल्या डोक्याभोवती फिरतं. 172 00:08:03,080 --> 00:08:04,576 त्यावर आपण काहीही ठेवू शकतो. 173 00:08:04,600 --> 00:08:08,416 यावर कॅमेरा ठेवला, तर आपल्या संपूर्ण डोक्याची छायाचित्रं मिळतील. 174 00:08:08,440 --> 00:08:12,336 या यंत्राचे अनेक उपयोग आहेत. 175 00:08:12,360 --> 00:08:14,056 (हशा) 176 00:08:14,080 --> 00:08:15,976 उदाहरणार्थ, 177 00:08:16,000 --> 00:08:18,416 आपण यावर खाद्यपदार्थ ठेवू शकतो. 178 00:08:18,440 --> 00:08:19,696 आपल्या इच्छेनुसार. 179 00:08:19,720 --> 00:08:21,536 माझ्याकडे पॉपकॉर्न आहेत. 180 00:08:21,560 --> 00:08:26,040 त्यातले थोडे मी या यंत्रावर ठेवले. 181 00:08:27,000 --> 00:08:28,536 आणि मग.. 182 00:08:28,560 --> 00:08:31,376 विज्ञानासाठी थोडासा त्याग केला. 183 00:08:31,400 --> 00:08:34,456 यापैकी काही पॉपकॉर्न जमिनीवर सांडले. 184 00:08:34,480 --> 00:08:35,895 आता कक्षेतून भ्रमण पूर्ण करू. 185 00:08:35,919 --> 00:08:37,616 (यंत्राचा आवाज) 186 00:08:37,640 --> 00:08:39,416 (हशा) 187 00:08:39,440 --> 00:08:41,015 आता एक छोटासा हात पुढे येईल. 188 00:08:41,039 --> 00:08:42,856 तो योग्य उंचीवर आणू. 189 00:08:42,880 --> 00:08:44,456 फक्त खांदे उडवले, की झालं. 190 00:08:44,480 --> 00:08:46,376 (हशा) 191 00:08:46,400 --> 00:08:47,616 (टाळ्या) 192 00:08:47,640 --> 00:08:48,896 छोटासा हात.. 193 00:08:48,920 --> 00:08:50,136 (हात जोरात ढकलतो.) 194 00:08:50,160 --> 00:08:51,376 (हशा) 195 00:08:51,400 --> 00:08:54,960 (टाळ्या) 196 00:08:59,480 --> 00:09:02,176 मी मायक्रोफोन पाडला वाटतं. 197 00:09:02,200 --> 00:09:04,120 पण काही हरकत नाही. ठीक आहे. 198 00:09:05,240 --> 00:09:07,656 आता मला हे पॉपकॉर्न चावून खाल्ले पाहिजेत. 199 00:09:07,680 --> 00:09:10,616 तुम्ही आणखी थोडा वेळ टाळ्या वाजवत राहाल का? 200 00:09:10,640 --> 00:09:14,736 (टाळ्या) 201 00:09:14,760 --> 00:09:17,576 तर ही आहे माझी खाजगी सूर्यमाला. 202 00:09:17,600 --> 00:09:19,496 या शतकात जन्मल्यामुळे, 203 00:09:19,520 --> 00:09:21,976 मी आत्मकेंद्रित आहे. सगळं माझ्याभोवती फिरलं पाहिजे. 204 00:09:22,000 --> 00:09:25,056 (हशा) 205 00:09:25,080 --> 00:09:27,696 आता पुन्हा पाण्याच्या पेल्याकडे वळू. 206 00:09:27,720 --> 00:09:29,776 या यंत्रावर अजून.. खरं सांगते.. 207 00:09:29,800 --> 00:09:31,376 या पेल्यात पाणी नाहीये. 208 00:09:31,400 --> 00:09:32,896 माफ करा. 209 00:09:32,920 --> 00:09:37,496 पण या यंत्रावर मला अजून काम केलं पाहिजे. 210 00:09:37,520 --> 00:09:40,776 पेला उचलून कड्यावर ठेवता आला पाहिजे. 211 00:09:40,800 --> 00:09:42,816 आता माझे हात जरासे थरथरले, 212 00:09:42,840 --> 00:09:44,096 तरी ते दिसणार नाहीत. 213 00:09:44,120 --> 00:09:47,016 कारण या अद्भुत यंत्राने तुम्हांला मंत्रमुग्ध केलं आहे. 214 00:09:47,040 --> 00:09:48,456 माझी काळजी मिटली. 215 00:09:48,480 --> 00:09:49,680 ठीक आहे. 216 00:09:50,146 --> 00:09:51,296 (यंत्राचा आवाज) 217 00:09:51,320 --> 00:09:52,760 (गाते) 218 00:09:53,800 --> 00:09:56,296 अरेरे, हे तर अडकलं. 219 00:09:56,320 --> 00:09:59,480 या यंत्रालाही कधीकधी व्यासपीठावर भीती वाटते. 220 00:10:00,200 --> 00:10:02,040 मग ते जरासं अडकतं. 221 00:10:03,480 --> 00:10:04,960 अगदी माणसांसारखं. 222 00:10:05,880 --> 00:10:08,496 थांबा.. थोडं मागे जाऊ. 223 00:10:08,520 --> 00:10:09,736 आणि मग.. 224 00:10:09,760 --> 00:10:10,976 (पेला पडतो) 225 00:10:11,000 --> 00:10:13,176 (हशा) 226 00:10:13,200 --> 00:10:15,656 आजच्या काळात जन्माला येणं किती भाग्याचं आहे. 227 00:10:15,680 --> 00:10:17,936 (हशा) 228 00:10:17,960 --> 00:10:22,560 (टाळ्या) 229 00:10:24,680 --> 00:10:29,296 माझी यंत्रं म्हणजे जणु आंगिक विनोदाचा अभियांत्रिकी अवतार. 230 00:10:29,320 --> 00:10:32,736 पण यातून मला काहीतरी महत्त्वाचं सापडलं. आनंद आणि विनम्रपणा. 231 00:10:32,760 --> 00:10:37,656 बरेचदा, अभियांत्रिकी जगात या गोष्टी हरवून जातात. 232 00:10:37,680 --> 00:10:40,216 यातून मला हार्डवेअरबद्दल बरंच काही शिकता आलं. 233 00:10:40,240 --> 00:10:43,040 यशाची चिंता आड आली नाही. 234 00:10:44,040 --> 00:10:47,656 मला नेहमी विचारलं जातं, "काहीतरी उपयोगाचं करणार आहेस का कधी?" 235 00:10:47,680 --> 00:10:49,200 कोण जाणे, करेनही कधीतरी. 236 00:10:50,440 --> 00:10:51,736 माझ्या दृष्टीने, 237 00:10:51,760 --> 00:10:53,056 हेही उपयुक्तच आहे. 238 00:10:53,080 --> 00:10:55,440 कारण हे काम मी स्वतःहून सुरु केलं. 239 00:10:56,320 --> 00:10:59,176 योजना आखून करता येणार नाही असं काम आहे हे. 240 00:10:59,200 --> 00:11:00,416 हा व्यवसाय.. 241 00:11:00,440 --> 00:11:04,560 (टाळ्या) 242 00:11:06,000 --> 00:11:08,416 आखणी करून सुरु करता आला नसता. 243 00:11:08,440 --> 00:11:11,976 मी जे काही केलं ते उत्साहाने केलं, म्हणून हे सगळं घडलं. 244 00:11:12,000 --> 00:11:14,736 माझा उत्साह मी इतरांना वाटला. 245 00:11:14,760 --> 00:11:18,136 मला वाटतं, हेच कुचकामी यंत्रं बनवण्यातलं खरं सौंदर्य. 246 00:11:18,160 --> 00:11:20,176 इथे आपण कबुली देतो, की 247 00:11:20,200 --> 00:11:22,600 आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत. 248 00:11:23,160 --> 00:11:25,496 त्यामुळे, आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे, 249 00:11:25,520 --> 00:11:28,976 असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो. 250 00:11:29,000 --> 00:11:31,336 टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल, 251 00:11:31,360 --> 00:11:33,296 पण आपण निदान प्रश्न तरी विचारला! 252 00:11:33,320 --> 00:11:34,536 धन्यवाद. 253 00:11:34,560 --> 00:11:38,600 (टाळ्या)