WEBVTT 00:00:00.841 --> 00:00:04.572 टेड हे मोठ्या गोष्टींसाठी आहे, हे मला ठाऊक आहे. 00:00:04.596 --> 00:00:08.126 पण मी तुम्हाला एका अगदी छोट्या गोष्टीबद्दल सांगणार आहे. 00:00:08.150 --> 00:00:10.308 इतकी छोटी, की तिच्यासाठी एकच शब्द पुरतो. 00:00:11.093 --> 00:00:12.649 तो शब्द आहे, वेगळी. 00:00:13.347 --> 00:00:16.966 अगदी योग्य शब्द आहे. 00:00:17.403 --> 00:00:21.349 म्हणजे, एखादी व्यक्ती, जी सर्वांसारखी होऊच शकत नाही. 00:00:21.752 --> 00:00:24.048 किंवा, सर्वांच्यात वेगळी ठरते. 00:00:24.658 --> 00:00:27.581 किंवा, अशी व्यक्ती, जी नव्या वातावरणाशी 00:00:27.605 --> 00:00:30.473 योग्य रीतीने जुळवून घेऊ शकत नाही. 00:00:31.298 --> 00:00:33.520 माझ्यावर वेगळेपणाचा जणु शिक्काच आहे. 00:00:34.307 --> 00:00:37.140 मी या सभागृहातल्या इतर वेगळ्यांसाठी इथे आले आहे. 00:00:37.164 --> 00:00:38.975 कारण मी एकटीच वेगळी, असं कधीच होत नाही. 00:00:39.995 --> 00:00:41.880 मी वेगळेपणाची गोष्ट सांगणार आहे. NOTE Paragraph 00:00:43.237 --> 00:00:45.769 मी तिशीत पाऊल टाकलं तेव्हा, 00:00:45.793 --> 00:00:49.355 लेखिका होण्याचं स्वप्न माझ्या दारी चालत आलं. 00:00:50.198 --> 00:00:51.802 खरं तर, ते माझ्या टपालातून आलं. 00:00:51.826 --> 00:00:55.485 एका पत्राच्या रूपात. माझ्या एका लघुकथेला मोठं बक्षीस मिळाल्याचं 00:00:55.509 --> 00:00:57.434 त्यात लिहिलं होतं. 00:00:58.183 --> 00:01:01.944 ती लघुकथा माझ्याच आयुष्याबद्दल होती. माझ्या स्पर्धांतून पोहण्याबद्दल. 00:01:02.632 --> 00:01:04.687 वाईट घरगुती आयुष्याबद्दल. आणि थोडीशी, 00:01:05.258 --> 00:01:10.155 दुःखामुळे आणि आपलं माणूस गमावल्यामुळे कशी वेड लागायची वेळ येऊ शकते, त्याबद्दल. 00:01:11.829 --> 00:01:16.502 मोठमोठे प्रकाशक, एजंट्स आणि लेखक यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कची सफर, 00:01:16.526 --> 00:01:17.850 असं ते बक्षीस होतं. 00:01:18.278 --> 00:01:21.342 म्हणजे होतकरू लेखिकेचं स्वप्नच, हो ना? 00:01:22.573 --> 00:01:25.413 ते पत्र मिळाल्याच्या दिवशी मी काय केलं, ठाऊक आहे तुम्हाला? 00:01:26.037 --> 00:01:27.835 मी अशी आहे ना, 00:01:27.859 --> 00:01:30.056 ते पत्र मी स्वयंपाकघरातल्या टेबलावर ठेवलं 00:01:30.080 --> 00:01:33.522 स्वतःसाठी एक मोठा ग्लासभरून वोडका ओतली, 00:01:33.922 --> 00:01:36.292 सोबत बर्फ आणि लिंबू, 00:01:36.722 --> 00:01:40.926 आणि दिवसभर नुसत्या अंतर्वस्त्रांत तिथेच बसले. 00:01:40.950 --> 00:01:43.032 त्या पत्राकडे बघत. 00:01:44.608 --> 00:01:47.753 आजवर आयुष्यात मी किती प्रकारचे घोळ घातले आहेत, त्याचा विचार करीत. 00:01:47.777 --> 00:01:50.951 न्यूयॉर्कमध्ये जाऊन, लेखिका असल्याची बतावणी करायला 00:01:50.975 --> 00:01:52.705 मी होते तरी कोण? 00:01:53.681 --> 00:01:55.046 कोण होते मी? NOTE Paragraph 00:01:55.070 --> 00:01:56.268 तुम्हांला सांगते, 00:01:56.745 --> 00:01:57.912 मी होते "वेगळी." 00:01:58.625 --> 00:02:00.988 कित्येक मुलांसारखी, 00:02:01.908 --> 00:02:04.276 कौटुंबिक अत्याचारापासून 00:02:04.300 --> 00:02:06.956 कसाबसा जीव वाचवून निसटलेली. 00:02:07.727 --> 00:02:12.218 अगदी वाईट प्रकारे विस्कटलेली दोन लग्नें गाठीला होती. 00:02:12.242 --> 00:02:15.208 एकदाच नव्हे, तर दोनदा मला कॉलेजातून डच्चू मिळाला होता. 00:02:15.232 --> 00:02:18.424 मला वाटतं, तिसऱ्यांदा देखील, पण ते मी तुम्हाला सांगणार नाही. NOTE Paragraph 00:02:18.448 --> 00:02:20.258 (हशा) NOTE Paragraph 00:02:20.582 --> 00:02:24.243 मी एकदा ड्रग्स सोडण्याचा प्रयत्नही केला होता. 00:02:24.795 --> 00:02:29.245 आणि दोनदा तुरुंगातही पाहुणचार झोडला होता. 00:02:30.228 --> 00:02:32.132 म्हणजे मी इथे आले ते बरोबरच आहे. NOTE Paragraph 00:02:33.680 --> 00:02:35.770 (हशा) NOTE Paragraph 00:02:36.744 --> 00:02:40.237 पण माझ्या वेगळेपणाचं खरं कारण हे, 00:02:40.261 --> 00:02:43.523 की माझी मुलगी जन्मल्या दिवशीच मरण पावली होती, 00:02:43.547 --> 00:02:46.666 आणि हे दुःख घेऊन कसं जगायचं ते मला कळत नव्हतं. 00:02:48.233 --> 00:02:53.360 तिच्या मृत्यूनंतर मी बराच काळ घरहीन अवस्थेत काढला. 00:02:53.384 --> 00:02:55.328 मी एका पुलाखाली राहत होते. 00:02:55.352 --> 00:02:59.570 तीव्र दुःखामुळे आणि तिला गमावल्यामुळे भ्रमिष्ट झालेल्या अवस्थेत. 00:02:59.594 --> 00:03:02.108 आयुष्यात काहींना या अवस्थेचा अनुभव येतो. 00:03:02.132 --> 00:03:04.863 कदाचित पुष्कळ जगलात, तर तुम्हांलाही तो अनुभव येईल. 00:03:06.240 --> 00:03:10.237 घरहीन लोक हे "वेगळ्या" लोकांमधले शूर लोक असतात. 00:03:10.261 --> 00:03:13.357 कारण त्यांचं आयुष्य आपल्यासारखंच सुरु होतं. 00:03:14.670 --> 00:03:20.088 मी कुठल्याच साच्यात बसत नव्हते. 00:03:20.112 --> 00:03:24.580 मुलगी, बायको, आई, विदुषी. 00:03:25.474 --> 00:03:27.973 आणि माझं लेखिका होण्याचं स्वप्न म्हणजे 00:03:27.997 --> 00:03:33.438 जणु माझ्या घशाशी दाटलेला हुंदका होता. NOTE Paragraph 00:03:34.906 --> 00:03:38.375 इतकं असूनही मी विमानात बसले 00:03:38.399 --> 00:03:40.786 आणि न्यूयॉर्कला गेले. 00:03:40.810 --> 00:03:42.366 लेखकांच्या गावी. 00:03:43.168 --> 00:03:46.843 माझासारख्या "वेगळ्यांनो", तुमचे चेहरे उजळलेले दिसताहेत. 00:03:46.867 --> 00:03:48.779 मी कुठेही तुम्हाला ओळखेन. 00:03:48.803 --> 00:03:51.241 तसं सुरुवातीला ते आवडण्यासारखंच होतं. 00:03:51.265 --> 00:03:54.217 कोणत्या तीन प्रसिद्ध लेखकांना भेटायचं, ते आपण ठरवायचं. 00:03:54.241 --> 00:03:56.599 मग ते लोक जाऊन त्या लेखकांना शोधून आणीत. 00:03:56.623 --> 00:03:59.413 ग्रामरसी पार्क हॉटेल मध्ये राहायचं. 00:03:59.437 --> 00:04:02.071 रात्री उशिरा स्कॉच प्यायची. 00:04:02.095 --> 00:04:04.586 तीही एकदम सही, स्मार्ट भपकेबाज लोकांबरोबर. 00:04:04.610 --> 00:04:09.119 आणि आपणही सही, स्मार्ट आणि भपकेबाज आहोत असं दाखवायचं. 00:04:09.143 --> 00:04:12.331 तिथे पुष्कळ लेखक, संपादक आणि एजन्ट्स भेटत. 00:04:12.355 --> 00:04:16.418 खूप म्हणजे खूपच भारी लंच आणि डिनर्स असत. 00:04:17.377 --> 00:04:19.005 किती भारी ते विचारा. NOTE Paragraph 00:04:19.735 --> 00:04:21.696 प्रेक्षक : किती भारी? NOTE Paragraph 00:04:22.077 --> 00:04:26.395 मी कबुली देते: मी तीन नॅपकिन्स चोरले. NOTE Paragraph 00:04:26.419 --> 00:04:27.990 (हशा) NOTE Paragraph 00:04:28.014 --> 00:04:29.671 तीन रेस्टोरंटस मधून. 00:04:30.430 --> 00:04:32.696 आणि एक मेन्यू कार्ड पॅंटमधे लपवून आणलं. NOTE Paragraph 00:04:32.720 --> 00:04:34.796 (हशा) NOTE Paragraph 00:04:34.820 --> 00:04:38.526 मला आठवण म्हणून घरी न्यायला काहीतरी हवं होतं. 00:04:38.550 --> 00:04:40.835 हे खरंच घडलं यावर 00:04:41.241 --> 00:04:42.470 विश्वास बसण्यासाठी. NOTE Paragraph 00:04:43.467 --> 00:04:45.131 मला कॅरोल मेसो, लिन टिलमन 00:04:45.155 --> 00:04:47.964 आणि पेगी फेलन या तीन लेखिकांना भेटायचं होतं 00:04:48.496 --> 00:04:51.550 या सर्वाधिक खपाच्या, प्रसिद्ध लेखिका नव्हत्या. 00:04:51.574 --> 00:04:54.881 पण माझ्या नजरेत त्या महान लेखिका होत्या. 00:04:55.700 --> 00:04:59.262 कॅरोल मेसो ने लिहिलेलं पुस्तक माझ्या कलेसाठी बायबल ठरलं. 00:05:00.056 --> 00:05:02.557 लिन टिलमनने मला विश्वास दिला, 00:05:02.581 --> 00:05:06.062 की माझ्या गोष्टींना या जगात जागा मिळू शकेल. 00:05:06.839 --> 00:05:08.793 पेगी फेलन ने आठवण करून दिली, 00:05:08.817 --> 00:05:13.826 की माझ्या रूपापेक्षा माझा मेंदू जास्त महत्वाचा आहे. 00:05:15.500 --> 00:05:18.184 त्या लेखनाच्या मुख्य प्रवाहातल्या लेखिका नव्हत्या. 00:05:18.208 --> 00:05:21.985 पण आपल्या लिखाणाने त्या मुख्य प्रवाहात 00:05:22.009 --> 00:05:23.342 मार्ग काटत होत्या. 00:05:24.294 --> 00:05:28.429 नदीने मार्ग काटून ग्रँड कॅनियन निर्माण झाली, तशा. NOTE Paragraph 00:05:29.371 --> 00:05:31.082 पन्नाशीपुढल्या त्या तीन लेखिकांच्या 00:05:31.106 --> 00:05:34.947 भेटीमुळे, अत्यानंदाने माझा प्राण जाईल असं वाटू लागलं. 00:05:34.971 --> 00:05:37.897 कारण, 00:05:37.921 --> 00:05:39.990 यापूर्वी कधीच मला इतका आनंद वाटला नव्हता. 00:05:40.014 --> 00:05:41.696 अशा ठिकाणी मी कधीच गेले नव्हते. 00:05:42.350 --> 00:05:44.108 माझी आई कधीच कॉलेजात गेली नव्हती. 00:05:44.747 --> 00:05:47.236 त्या वेळेपर्यंत माझी प्रतिभा म्हणजे 00:05:47.260 --> 00:05:51.712 जणु मृतावस्थेत जन्मलेलं अर्भक होतं. 00:05:53.394 --> 00:05:56.673 तर न्यूयॉर्कमधल्या सुरुवातीच्या काही रात्रींत, मला मरावंसं वाटे. 00:05:56.697 --> 00:06:00.137 "हे किती सुंदर आहे. जगण्याचं सार्थक झालं. आता मी मरायला तयार आहे." 00:06:01.187 --> 00:06:04.335 त्यानंतर जे घडलं, ते आपल्यापैकी काही समजू शकतील. NOTE Paragraph 00:06:04.935 --> 00:06:09.230 त्यांनी मला फरार, स्ट्राउस आणि जरू यांच्या ऑफिसांत नेलं. 00:06:09.863 --> 00:06:13.038 फरार, स्ट्राउस आणि जरू म्हणजे माझ्या कल्पनेतले भव्यदिव्य प्रकाशक. 00:06:13.062 --> 00:06:16.753 टी. एस. एलियट आणि फ्लॅनरी ओ'कॉनर यांचे प्रकाशक. 00:06:17.418 --> 00:06:21.793 त्यांच्या मुख्य संपादकांनी मला बसवून घेतलं आणि ते माझ्याशी बराच वेळ बोलले. 00:06:21.817 --> 00:06:24.135 माझ्या पोहण्याबद्दल मी एक पुस्तक लिहावं, 00:06:24.159 --> 00:06:25.864 म्हणजे आठवणींचा संग्रह, 00:06:26.498 --> 00:06:27.785 असा आग्रह करीत होते. 00:06:28.630 --> 00:06:30.866 ते जितका वेळ माझ्याशी बोलत होते, 00:06:30.890 --> 00:06:34.595 तितका सगळं वेळ मी मूर्खासारखी हसत आणि मान डोलावत बसले होते. 00:06:35.509 --> 00:06:37.361 हाताची घडी घालून. 00:06:37.385 --> 00:06:42.302 माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. 00:06:43.875 --> 00:06:47.242 शेवटी त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं. 00:06:47.266 --> 00:06:48.847 पोहण्याच्या शिक्षकांसारखंच. 00:06:49.580 --> 00:06:51.415 त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. 00:06:51.439 --> 00:06:53.877 आणि काही पुस्तकं विनामूल्य दिली. 00:06:53.901 --> 00:06:55.692 ते मला दारापर्यंत सोडायला आले. NOTE Paragraph 00:06:57.588 --> 00:07:00.855 त्यानंतर त्या लोकांनी मला डब्ल्यू डब्ल्यू नॉर्टनच्या ऑफिसात नेलं. 00:07:00.879 --> 00:07:03.579 मला खात्री वाटत होती, की ते मला लगेच बाहेर नेऊन सोडतील. 00:07:03.603 --> 00:07:05.492 डॉक मार्टेन चे बूट घातले, म्हणून. 00:07:06.190 --> 00:07:07.639 पण तसं काही घडलं नाही. 00:07:08.512 --> 00:07:10.941 नॉर्टनच्या ऑफिसात असं वाटलं, की 00:07:10.965 --> 00:07:15.437 मी रात्रीच्या अंधारात हात उंचावून आभाळातल्या चंद्राला स्पर्श करते आहे, आणि 00:07:15.461 --> 00:07:19.098 चांदण्या ब्रह्मांडावर माझं नाव कोरताहेत. 00:07:19.599 --> 00:07:21.744 ही गोष्ट मला अशी प्रचंड मोठी वाटत होती. 00:07:21.768 --> 00:07:22.949 कळलं ना? 00:07:23.567 --> 00:07:26.065 त्यांच्या मुख्य संपादिका कॅरोल हूक स्मिथ, 00:07:26.089 --> 00:07:30.432 जरा वाकल्या, आणि आपले तेजस्वी डोळे माझ्यावर रोखून म्हणाल्या, 00:07:30.456 --> 00:07:33.566 चल तर मग, ताबडतोब मला काहीतरी लिखाण पाठवून दे. 00:07:34.328 --> 00:07:36.620 इतकं झाल्यावर कोणीही, विशेषतः टेड मधले लोक, 00:07:36.644 --> 00:07:38.984 लगेच पोष्टात धावले असते ना? 00:07:39.651 --> 00:07:42.929 पण पाकिटात काहीतरी घालून त्याला स्टँम्प लावण्याची कल्पना करायलाच 00:07:42.953 --> 00:07:46.830 मला एका दशकाहून जास्त वेळ लागला. NOTE Paragraph 00:07:48.741 --> 00:07:50.315 शेवटच्या रात्री, 00:07:50.339 --> 00:07:53.608 मी नॅशनल पोएट्री क्लब मध्ये मी एक मोठं साहित्यवाचन केलं. 00:07:54.342 --> 00:07:56.289 ते संपताच 00:07:56.313 --> 00:08:00.616 किडी, हॉयट आणि पिकार्ड या साहित्य संस्थेच्या कॅथरीन किडी सरळ माझ्याजवळ आल्या 00:08:00.640 --> 00:08:03.227 आणि त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. 00:08:03.251 --> 00:08:06.429 लगेच तिथल्या तिथे त्यांनी माझं प्रतिनिधित्व करण्याची तयारी दाखविली. 00:08:08.558 --> 00:08:11.545 माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. 00:08:11.569 --> 00:08:13.155 तुम्हांला असा अनुभव आला आहे का? 00:08:13.703 --> 00:08:15.815 मला वाटलं, आता मला रडू कोसळणार. 00:08:15.839 --> 00:08:19.764 कारण, इतके सुरेख कपडे घातलेल्या लोकांच्या त्या खोलीत हे घडत होतं. 00:08:19.788 --> 00:08:22.941 मी फक्त इतकंच बोलू शकले: 00:08:22.965 --> 00:08:26.075 "मी आत्ता काही सांगू शकत नाही. मला विचार करावा लागेल. " 00:08:26.805 --> 00:08:31.097 त्या म्हणाल्या, "ठीक आहे." आणि निघून गेल्या. 00:08:32.884 --> 00:08:39.403 इतके हात मला मदत करायला पुढे आले होते. माझ्या घशातला तो हुंदका.. NOTE Paragraph 00:08:39.427 --> 00:08:43.365 मी तुम्हांला माझ्यासारख्या लोकांबद्दल काही सांगायचा प्रयत्न करते आहे. 00:08:43.389 --> 00:08:47.442 आम्हां वेगळ्यांना कधी कळतच नाही, कशाची आशा बाळगावी, कशाला होकार द्यावा. 00:08:47.466 --> 00:08:49.077 किंवा एखादी महत्त्वाची गोष्टही 00:08:49.101 --> 00:08:51.247 घेता येत नाही. अगदी डोळ्यासमोर असली तरी. 00:08:51.271 --> 00:08:52.890 आम्ही शरमेचं ओझं वाहात असतो. 00:08:52.914 --> 00:08:54.905 आपल्याला चांगलं काही हवंसं वाटतं याची शरम. 00:08:54.929 --> 00:08:56.921 काही चांगली भावना जाणवते आहे, याची शरम. 00:08:56.945 --> 00:09:01.327 आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या लोकांच्यात मिसळायचा आपल्याला हक्क आहे, 00:09:01.351 --> 00:09:03.468 या अविश्वसनीय गोष्टीबद्दलची शरम. NOTE Paragraph 00:09:04.472 --> 00:09:07.398 शक्य झालं असतं तर मी भूतकाळात जाऊन स्वतःला सुधारलं असतं. 00:09:07.422 --> 00:09:11.765 मग मी, मला मदत करणाऱ्या त्या पन्नाशीपुढल्या स्त्रियांसारखीच झाले असते. 00:09:11.789 --> 00:09:13.690 मी स्वतःला ध्येय ठेवायला शिकवलं असतं. 00:09:13.714 --> 00:09:16.054 त्यासाठी उभं राहून, ते मिळवायला शिकवलं असतं. 00:09:16.078 --> 00:09:20.384 मी म्हणाले असते, "तू! हो तूच. तूही या खोलीतलीच एक आहेस." 00:09:20.408 --> 00:09:22.680 ते दैवी तेज आपल्या सर्वाना लाभलं आहे. 00:09:22.704 --> 00:09:25.615 आणि एकमेकांशिवाय आपण कुणीच नाही आहोत. 00:09:27.041 --> 00:09:30.313 मी ओरेगॉनला परत आले. 00:09:30.337 --> 00:09:36.029 विमानातून झाडी आणि पाऊस पहात 00:09:36.053 --> 00:09:40.345 मी "स्वतःची कीव करणे" या पेयाच्या अनेक छोट्या बाटल्या ढोसल्या. 00:09:41.491 --> 00:09:46.333 मी जर लेखिका असलेच, तर एक "वेगळी" लेखिका असेन, असं मला वाटत होतं. 00:09:47.244 --> 00:09:48.403 म्हणजे असं की, 00:09:48.427 --> 00:09:50.431 मी ओरेगॉनला परत गेले लिखाणाच्या कराराशिवाय, 00:09:50.455 --> 00:09:51.606 एजन्ट न नेमता. 00:09:51.630 --> 00:09:54.115 मनात आणि डोक्यात आठवणी भरून घेऊन. 00:09:54.139 --> 00:09:57.287 इतक्या छान लेखिकांच्या 00:09:57.311 --> 00:09:59.581 इतकं जवळ जाता आल्याच्या आठवणी. 00:10:00.278 --> 00:10:03.684 आठवणी हे एकच बक्षीस मी स्वतःला घेऊ दिलं. NOTE Paragraph 00:10:05.175 --> 00:10:08.304 तरीही, घरी परतल्यावर अंधारात 00:10:09.272 --> 00:10:10.835 पुन्हा अंतर्वस्त्रांत बसल्यावर 00:10:11.788 --> 00:10:13.518 मला त्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. 00:10:14.264 --> 00:10:18.305 त्या म्हणाल्या, "कुणाचं ऐकून तोंड बंद करू नकोस. 00:10:18.329 --> 00:10:19.880 तुझी कहाणी सुद्धा बदलू नकोस. 00:10:20.861 --> 00:10:24.540 तुझी कहाणी, जी फक्त तुलाच ठाऊक आहे, तिला व्यक्त होऊ दे. 00:10:24.564 --> 00:10:26.994 काहीवेळा कहाणी सांगितल्यामुळे 00:10:27.018 --> 00:10:30.064 आपला प्राण वाचू शकतो." NOTE Paragraph 00:10:31.703 --> 00:10:35.393 आता पहा, मी पन्नाशीपुढची स्त्री आहे. 00:10:36.278 --> 00:10:37.453 आणि मी एक लेखिका आहे. 00:10:38.516 --> 00:10:39.743 आई आहे. 00:10:40.441 --> 00:10:41.978 शिक्षिका आहे. 00:10:42.970 --> 00:10:44.851 माझे आवडते विद्यार्थी कोण असतील, ओळखा. 00:10:46.604 --> 00:10:48.232 ते पत्र आल्यादिवशी नसेल, 00:10:48.256 --> 00:10:50.510 पण नंतर 00:10:50.534 --> 00:10:52.207 मी माझ्या आठवणी लिहिल्या. 00:10:52.231 --> 00:10:54.064 "क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर" 00:10:54.889 --> 00:10:59.588 किती वेळा मला चुकीच्या निर्णयांच्या अवशेषांतून पुन्हा स्वतःला घडवावं लागलं, 00:10:59.612 --> 00:11:02.016 त्याबद्दलच्या गोष्टी त्यात आहेत. 00:11:02.575 --> 00:11:07.985 अपयश भासलं तरी त्यातून विचित्र प्रकारे सुंदर भविष्याची वाट सापडली, 00:11:08.009 --> 00:11:09.531 अशा गोष्टीही. 00:11:10.309 --> 00:11:13.761 मी फक्त त्या गोष्टी व्यक्त केल्या. NOTE Paragraph 00:11:15.552 --> 00:11:19.798 अनेक समाजांत, आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, असा समज असतो. 00:11:20.664 --> 00:11:22.385 हा यशस्वी लोकांचा समज. 00:11:23.679 --> 00:11:25.503 पण माझा जास्त विश्वास आहे, 00:11:25.527 --> 00:11:27.306 तो त्याशेजारीच किंवा 00:11:27.330 --> 00:11:28.487 त्याच्या मुळाशी असलेल्या 00:11:29.089 --> 00:11:30.941 "वेगळ्यांच्या" समजावर. 00:11:31.763 --> 00:11:33.028 तो समज असा: 00:11:33.623 --> 00:11:35.878 अपयशाच्या क्षणी देखील 00:11:35.902 --> 00:11:38.480 तुम्ही सुंदरच असता. 00:11:39.585 --> 00:11:40.737 त्या वेळी ठाऊक नसलं, 00:11:40.761 --> 00:11:43.938 तरी स्वतःला पुन्हा एकदा घडवणं शक्य असतं. 00:11:43.962 --> 00:11:45.160 सतत. 00:11:45.184 --> 00:11:46.778 हेच तुमचं सौंदर्य. NOTE Paragraph 00:11:47.694 --> 00:11:49.210 तुम्ही दारुडे असाल, 00:11:49.234 --> 00:11:51.583 अत्याचारातून वाचलेले असाल, 00:11:51.607 --> 00:11:53.043 एकेकाळचे ठग असाल, 00:11:53.067 --> 00:11:54.565 घरहीन असाल, 00:11:54.589 --> 00:11:57.867 तुम्ही सगळे पैसे गमावले असतील, किंवा नोकरी, किंवा नवरा, 00:11:57.891 --> 00:12:00.305 किंवा बायको, किंवा, 00:12:00.329 --> 00:12:01.479 सर्वात वाईट म्हणजे, 00:12:01.864 --> 00:12:03.917 तुमचं मूल. 00:12:03.941 --> 00:12:08.010 तुम्ही तुमच्या अपयशाच्या अगदी मध्यभागी उभे असाल, 00:12:08.034 --> 00:12:10.912 आणि तरीही, मी तुम्हांला इतकंच सांगेन, 00:12:10.936 --> 00:12:13.049 की तुम्ही खूप सुंदर आहात. 00:12:13.073 --> 00:12:15.372 तुमच्या कहाणीला व्यक्त होण्याचा हक्क आहे. 00:12:15.396 --> 00:12:19.669 कारण तुम्ही आहात, एक दुर्मिळ आणि जबरदस्त "वेगळा". 00:12:19.693 --> 00:12:21.949 एक नवीन प्रजाति. 00:12:22.568 --> 00:12:24.537 तुमची कहाणी 00:12:24.561 --> 00:12:26.177 तुम्ही जशी सांगू शकता, 00:12:26.201 --> 00:12:28.609 तशी ती इतर कुणीही सांगू शकणार नाही. 00:12:29.710 --> 00:12:31.220 आणि मी ती ऐकेन. NOTE Paragraph 00:12:32.863 --> 00:12:34.039 धन्यवाद. NOTE Paragraph 00:12:34.063 --> 00:12:45.423 (टाळ्या)