1 00:00:01,973 --> 00:00:06,535 स्वमग्नता [ऑटिझम] म्हणजे काय, हे अनेकांना ठाऊक असतं. 2 00:00:07,570 --> 00:00:09,890 उदाहरणार्थ, काही लोकांना वाटतं, की 3 00:00:09,914 --> 00:00:14,440 स्वमग्नता फक्त गोऱ्या पुरुषांच्यात आढळते, 4 00:00:14,464 --> 00:00:16,519 त्यांचं बोलणं एकसुरी असतं, 5 00:00:16,543 --> 00:00:20,130 आणि ते सतत एकाच विषयाबद्दल बोलत राहतात. 6 00:00:21,258 --> 00:00:26,252 काहींना वाटतं, की स्वमग्न लोकांना चूक आणि बरोबर यातला फरक समजत नाही. 7 00:00:26,276 --> 00:00:27,808 ते लक्ष वेधून घेणं टाळतात, 8 00:00:27,832 --> 00:00:31,832 आणि नेमकं चुकीच्या वेळी, चुकीचं बोलतात. 9 00:00:31,856 --> 00:00:36,354 काहींना वाटतं, की स्वमग्न लोकांना समाजात वावरता येत नाही. 10 00:00:36,378 --> 00:00:38,417 त्यांना विनोदबुद्धी किंवा समानुभूती नसते. 11 00:00:39,679 --> 00:00:43,060 हे सगळं तुम्हांला पटलं असेल, 12 00:00:43,084 --> 00:00:44,498 तर माफ करा, पण 13 00:00:44,522 --> 00:00:48,307 तुमची स्वमग्नतेबद्दलची कल्पना चुकीची आहे. 14 00:00:48,934 --> 00:00:50,084 मला कसं ठाऊक? 15 00:00:50,744 --> 00:00:53,593 कारण मला स्वमग्नता आहे. 16 00:00:54,323 --> 00:00:59,437 काही गोष्टी मला पछाडून टाकतात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्स, 17 00:00:59,461 --> 00:01:01,736 किंवा सार्वजनिक वाहने. 18 00:01:01,760 --> 00:01:04,188 पण ही काही माझी ओळख नव्हे. 19 00:01:04,553 --> 00:01:08,378 प्रत्येक व्यक्ती आपल्या तऱ्हेने निराळी, एकमेव असते. 20 00:01:09,252 --> 00:01:12,839 परंतु स्वमग्न आयुष्य खरोखर कसं असतं, 21 00:01:12,863 --> 00:01:16,069 याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे 22 00:01:16,093 --> 00:01:19,458 त्याचं साचेबंद वर्णन केलं जातं. 23 00:01:19,831 --> 00:01:22,231 बऱ्याच वेळा हे माध्यमांतून दिसून येतं. 24 00:01:22,712 --> 00:01:26,744 सर्वसाधारणपणे माध्यमांत दाखवलेली स्वमग्न लोकांची साचेबंद वर्णनं म्हणजे 25 00:01:26,768 --> 00:01:28,910 समाजात वावरता न येणारे, 26 00:01:28,934 --> 00:01:30,633 समानुभूती नसणारे, 27 00:01:30,657 --> 00:01:33,164 आणि अगदी अतिबुद्धिमान देखील. 28 00:01:35,687 --> 00:01:40,503 आणि स्वमग्नतेबद्दलचं अज्ञान इथे संपत नाही. 29 00:01:40,527 --> 00:01:44,125 काही लोक स्वमग्नतेवर इलाज शोधताहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का? 30 00:01:44,149 --> 00:01:46,752 कारण ते स्वमग्नता म्हणजे एक नकारार्थी गोष्ट मानतात. 31 00:01:46,776 --> 00:01:48,291 जणु एखादा रोग. 32 00:01:48,950 --> 00:01:51,410 या कल्पनेला अनेकांनी आव्हान दिलं आहे. 33 00:01:51,434 --> 00:01:55,990 आणि आम्हांला विचाराल, तर आम्हांला तो रोग वाटत नाही. 34 00:01:56,014 --> 00:02:00,188 स्वमग्नता म्हणजे विचार करण्याची आणि जगाकडे पाहण्याची एक निराळी पद्धत. 35 00:02:00,679 --> 00:02:04,188 आमच्या मेंदूचं कार्य बहुसंख्य लोकांपेक्षा निराळ्या पद्धतीने चालतं. 36 00:02:04,577 --> 00:02:07,926 जणु एक्स बॉक्स आणि प्लेस्टेशन यात तुलना करतो आहोत, असं समजा. 37 00:02:07,950 --> 00:02:11,490 या दोन्ही साधनांजवळ उच्च क्षमता असली, तरी कार्यपद्धती निराळ्या आहेत. 38 00:02:12,292 --> 00:02:16,188 एक्स बॉक्सचा खेळ प्लेस्टेशनमध्ये चालणार नाही. 39 00:02:16,212 --> 00:02:20,521 कारण प्लेस्टेशनचं कार्य निराळ्या तऱ्हेने चालतं. 40 00:02:25,199 --> 00:02:26,588 मी आरशात पाहतो, तेव्हा 41 00:02:26,612 --> 00:02:28,706 मला दिसते एक निराळा विचार करणारी व्यक्ती. 42 00:02:28,730 --> 00:02:30,603 आणि हो, सुंदर केसही दिसतात. 43 00:02:30,627 --> 00:02:32,665 (हशा) 44 00:02:32,689 --> 00:02:39,313 (टाळ्या) 45 00:02:39,337 --> 00:02:41,448 आता प्रश्न असा, की 46 00:02:41,472 --> 00:02:44,805 माझी विचार करण्याची पद्धत निराळी आहे, म्हणजे मी रोगी आहे का? 47 00:02:48,387 --> 00:02:53,061 आजच्या समाजात एक स्वमग्न म्हणून जगताना जाणवणारी प्रमुख समस्या म्हणजे 48 00:02:53,085 --> 00:02:56,077 हे जग आमच्यासाठी रचलेलं नाही. 49 00:02:56,101 --> 00:02:59,652 आम्हांला अनेक प्रकारांनी परिस्थिती असह्य वाटू शकते. 50 00:03:00,478 --> 00:03:02,057 उदाहरणार्थ, 51 00:03:02,081 --> 00:03:07,355 मला नेहमीच मोठे आवाज असह्य होतात. 52 00:03:07,379 --> 00:03:10,478 म्हणून मी फार मोठ्या आवाजात संगीत लावत नाही. 53 00:03:10,502 --> 00:03:14,601 तसंच मला मोठे समारंभ आवडत नाहीत. 54 00:03:15,323 --> 00:03:18,762 पण स्वमग्नतेच्या वेगळ्या प्रकारांत, वेगळ्या गोष्टी असह्य वाटू शकतात. 55 00:03:18,786 --> 00:03:22,260 जसे की, प्रखर दिवे किंवा तीव्र वास, 56 00:03:22,284 --> 00:03:24,307 किंवा चिकट स्पर्श. 57 00:03:24,950 --> 00:03:28,217 या सर्वांमुळे चिंताविकार जडण्याची शक्यता असते. 58 00:03:28,847 --> 00:03:34,299 यापूर्वी तुम्ही कोणत्या सामाजिक समारंभांना हजर राहिला होतात, ते आठवा. 59 00:03:34,323 --> 00:03:36,257 तिथे मोठ्या आवाजात संगीत लावलं होतं का? 60 00:03:36,807 --> 00:03:39,394 फार प्रखर दिवे होते का? 61 00:03:39,800 --> 00:03:44,236 एकाच वेळी अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचे वास येत होते का? 62 00:03:44,260 --> 00:03:48,243 एकाच वेळी अनेक संभाषणं सुरु होती का? 63 00:03:49,491 --> 00:03:51,959 या गोष्टींमुळे तुम्हां लोकांना त्रास झाला नसेल. 64 00:03:51,983 --> 00:03:54,855 पण स्वमग्नता असणाऱ्या व्यक्तीला 65 00:03:54,879 --> 00:03:56,946 या गोष्टी फार असह्य वाटू शकतात. 66 00:03:57,522 --> 00:04:03,156 अशा वेळी आम्ही पुनरावर्ती वर्तन करू लागतो. 67 00:04:03,180 --> 00:04:06,230 म्हणजे एखादी हालचाल किंवा आवाज पुन्हा पुन्हा करतो, चुळबुळ करतो. 68 00:04:06,254 --> 00:04:11,822 आमचं हे वागणं कधी साधं वाटतं, तर कधी विचित्र वाटतं. 69 00:04:12,853 --> 00:04:15,242 काहीजण जोरजोरात हात वरखाली हलवतात, 70 00:04:15,266 --> 00:04:18,860 काही आवाज काढतात, किंवा गिरक्या घेतात. 71 00:04:20,361 --> 00:04:23,479 भोवतालच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची ही आमची पद्धत असते. 72 00:04:24,559 --> 00:04:27,432 अशा पुनरावर्ती वर्तनाची गरज आम्हांला अनेक वेळा वाटू शकते. 73 00:04:27,893 --> 00:04:31,043 पण ते पाहून लोक नापसंती दाखवतात. 74 00:04:31,067 --> 00:04:32,934 त्यामुळे आम्हांला ते लपवावं लागतं. 75 00:04:33,900 --> 00:04:37,881 स्वमग्नतेची ही लक्षणं अशी लपवावी लागतात, 76 00:04:37,905 --> 00:04:39,239 त्याला मुखवटा घालणं म्हणतात. 77 00:04:41,460 --> 00:04:44,491 काही लोक हे लपवण्यात जास्त कुशल असतात. 78 00:04:44,865 --> 00:04:50,712 मी काही वेळा हे इतकं छान लपवतो, की 79 00:04:50,736 --> 00:04:54,546 मला स्वमग्नता आहे हे मी सांगेपर्यंत त्यांना समजतही नाही. (हसतो.) 80 00:04:56,430 --> 00:04:59,620 एकंदरीत यामुळे फार तणाव वाटू शकतो. 81 00:04:59,644 --> 00:05:02,882 अगदी रात्री गृहपाठ करणंसुद्धा 82 00:05:02,906 --> 00:05:04,771 कष्टाचं वाटतं. 83 00:05:05,839 --> 00:05:07,902 आम्ही हे लपवू शकतो, 84 00:05:09,347 --> 00:05:11,434 त्यामुळे काही लोकांना वाटतं, की 85 00:05:11,458 --> 00:05:13,592 हाच यावर उपाय आहे. 86 00:05:13,991 --> 00:05:16,721 पण खरं तर लपवण्यामुळे, आमच्या खऱ्या स्वरूपात 87 00:05:16,745 --> 00:05:19,038 जगासमोर येण्याची आम्हांला शरम वाटते. 88 00:05:23,839 --> 00:05:28,950 स्वमग्नतेचं आणखी एक साचेबंद वर्णन म्हणजे, 89 00:05:28,974 --> 00:05:31,441 स्वमग्न लोकांना समानुभूती नसते. 90 00:05:32,458 --> 00:05:34,497 आणि पुन्हा सांगतो, हेदेखील खरं नाही. 91 00:05:35,124 --> 00:05:37,258 मला पुष्कळ समानुभूती वाटते. 92 00:05:37,601 --> 00:05:40,201 पण ती मला चांगल्या प्रकारे दाखवून देता येत नाही. 93 00:05:40,997 --> 00:05:43,152 एखादा मित्र जेव्हा 94 00:05:43,176 --> 00:05:45,843 त्याच्या आयुष्यातल्या समस्यांविषयी बोलत असतो, 95 00:05:45,867 --> 00:05:48,914 तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यावा, हे मला बरेचदा समजत नाही. 96 00:05:49,271 --> 00:05:51,597 आणि यामुळेच मी, स्वमग्न नसणाऱ्या मित्रांसारखी 97 00:05:51,621 --> 00:05:54,080 समानुभूती दाखवू शकत नाही. 98 00:05:57,250 --> 00:06:01,324 भावना व्यक्त करणं, कितीही कमी किंवा जास्त प्रमाणात का असेना, 99 00:06:01,348 --> 00:06:02,710 मला कठीण जातं. 100 00:06:03,671 --> 00:06:06,403 कारण एखाद्या व्यक्तीला सतत अनुभवाला येणाऱ्या 101 00:06:06,427 --> 00:06:10,442 सर्व भावनांचा कल्लोळ माझ्या मनात चाललेला असतो. 102 00:06:11,188 --> 00:06:14,498 पण अर्थातच मी त्या भावना तशा स्वरूपात व्यक्त करू शकत नाही. 103 00:06:14,522 --> 00:06:19,052 नाहीतर काय होईल, आनंदाची भावना व्यक्त होताना 104 00:06:19,076 --> 00:06:22,354 एक मोठी जोरकस शीळ वाजेल, 105 00:06:22,378 --> 00:06:25,814 हात जोरजोराने फडफडतील, आणि जोरदार हू.. हू.. आवाज येईल. 106 00:06:25,838 --> 00:06:27,377 (हशा) 107 00:06:28,125 --> 00:06:29,776 पण तुम्ही याऐवजी फक्त स्मित कराल. 108 00:06:29,800 --> 00:06:32,126 (हशा) 109 00:06:33,569 --> 00:06:37,761 वाढदिवसाला मिळालेली सुंदर भेट असो, 110 00:06:37,785 --> 00:06:43,111 किंवा बातम्यांत ऐकलेली एखादी वाईट बातमी असो, 111 00:06:43,135 --> 00:06:47,895 भावनांचा कल्लोळ झाल्याशिवाय मला प्रतिक्रिया देता येत नाही. 112 00:06:47,919 --> 00:06:52,906 सामान्य व्यक्तीसारखं दिसावं, म्हणून मला हे लपवावं लागतं. 113 00:06:53,990 --> 00:06:56,855 माझ्या मनात अमर्याद भावना असतात. 114 00:06:56,879 --> 00:07:01,136 पण मी एकतर टोकाला जाऊन त्या व्यक्त करतो, किंवा अजिबातच करत नाही. 115 00:07:03,804 --> 00:07:05,836 म्हणजे, 116 00:07:05,860 --> 00:07:09,517 भावना व्यक्त करणं मला फारसं जमत नाही. 117 00:07:09,541 --> 00:07:12,569 मी निराळ्या तऱ्हेने संवाद साधतो. 118 00:07:12,593 --> 00:07:17,815 म्हणून मला स्वमग्नता आहे, असं निदान झालं. 119 00:07:18,514 --> 00:07:22,915 माझ्या मनाचं कार्य कसं चालतं, हे या निदानाच्या आधाराने 120 00:07:22,939 --> 00:07:26,447 मला, माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना समजतं. 121 00:07:27,511 --> 00:07:28,925 जागतिक लोकसंख्येच्या 122 00:07:28,949 --> 00:07:31,564 साधारण एक टक्का लोकांना 123 00:07:31,588 --> 00:07:35,164 स्वमग्नता असल्याचं निदान केलं जातं. 124 00:07:35,188 --> 00:07:36,988 आणि हा आकडा वाढतो आहे. 125 00:07:37,760 --> 00:07:40,852 पण तरीही अजून आम्ही अल्पसंख्यांक आहोत. 126 00:07:41,217 --> 00:07:44,876 आज अनेक लोक आम्हांला इतरांच्या बरोबरीचे 127 00:07:44,900 --> 00:07:46,209 समजत नाहीत. 128 00:07:48,368 --> 00:07:50,122 हे माझं कुटुंब. 129 00:07:50,784 --> 00:07:53,580 आणि माझ्या कुटुंबात 130 00:07:53,604 --> 00:07:57,823 आणखी एक व्यक्ती स्वमग्न आहे. 131 00:07:58,411 --> 00:07:59,688 माझी आई. 132 00:07:59,712 --> 00:08:03,348 हो. प्रौढ स्त्रियादेखील स्वमग्न असू शकतात. 133 00:08:04,690 --> 00:08:08,261 माझे वडील आणि भाऊ स्वमग्न नाहीत. 134 00:08:08,912 --> 00:08:13,212 तरीसुद्धा, एकमेकांशी संवाद साधणं 135 00:08:13,236 --> 00:08:14,386 कधी कधी कठीण जातं. 136 00:08:15,045 --> 00:08:17,831 उदाहरणार्थ, मी म्हणतो, 137 00:08:17,855 --> 00:08:20,826 "टोरांटोचं युनियन स्टेशन, हो ना?" 138 00:08:20,850 --> 00:08:24,572 मला वाटतं, की यामुळे 139 00:08:24,596 --> 00:08:27,683 त्यांना त्याबद्दल काहीतरी आठवेल. 140 00:08:27,707 --> 00:08:32,617 पण ते गोंधळले, की मला नीट खुलासा करावा लागतो. 141 00:08:34,284 --> 00:08:37,807 अनेकदा, सर्वांना समजावं म्हणून 142 00:08:37,831 --> 00:08:41,413 आम्ही त्याच गोष्टी निरनिराळ्या प्रकारांनी बोलतो. 143 00:08:42,419 --> 00:08:43,862 असं असलं तरीसुद्धा 144 00:08:43,886 --> 00:08:47,686 आम्ही एकमेकांना समान लेखून प्रेमाने,आदराने वागतो. 145 00:08:48,188 --> 00:08:50,545 "न्यूरो ट्राइब्स" या पुस्तकात 146 00:08:50,569 --> 00:08:56,786 लेखक स्टीव्ह सिलबरमन म्हणतात, स्वमग्नतेसारख्या मानसिक अवस्थांना 147 00:08:56,810 --> 00:08:59,730 नैसर्गिक मानवी मानसिकतांच्या समूहातला 148 00:08:59,754 --> 00:09:02,609 एक भाग मानलं पाहिजे, 149 00:09:02,633 --> 00:09:04,577 कमतरता नव्हे. 150 00:09:04,601 --> 00:09:07,910 आणि या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. 151 00:09:08,903 --> 00:09:13,450 स्वमग्नता हा नैसर्गिक मानवी स्थितींच्या समूहातला एक भाग मानला, 152 00:09:13,474 --> 00:09:20,069 तर स्वमग्न लोकांना सहज वावरता येण्यासारखं जग निर्माण करता येईल. 153 00:09:20,728 --> 00:09:23,450 मला माझ्या स्वमग्नतेची शरम वाटत नाही. 154 00:09:24,188 --> 00:09:27,188 मी तुमच्यासारखा विचार करत नसेन, 155 00:09:27,212 --> 00:09:28,887 किंवा तुमच्यासारखा वागत नसेन. 156 00:09:28,911 --> 00:09:32,124 पण मीही एक माणूसच आहे. मला कोणताही रोग झालेला नाही. 157 00:09:33,730 --> 00:09:34,889 धन्यवाद. 158 00:09:34,913 --> 00:09:39,008 (टाळ्या)