पक्क्या आळशाच्या मनाचा शोध
-
0:01 - 0:02तर कॉलेजमध्ये असताना,
-
0:03 - 0:05प्रशासन हा माझा मुख्य विषय होता.
-
0:05 - 0:07त्यामुळे मला खूप पेपर्स लिहावे लागले.
-
0:07 - 0:09जेव्हा एखादा साधारण विद्यार्थी
पेपर लिहितो, -
0:09 - 0:12तेव्हा त्याचं काम काहीसं
अशा पद्धतीने होत असेल. -
0:12 - 0:13तर,
-
0:13 - 0:15(हशा)
-
0:15 - 0:17सुरुवात थोडी संथ होते.
-
0:17 - 0:19पण पहिल्या आठवड्यात पुरेसं काम होतं.
-
0:19 - 0:20त्यानंतरचे काही दिवस भरपूर काम होतं.
-
0:20 - 0:23असं एकंदरीत काम पार पडतं
सारं आटोक्यात राहतं. -
0:23 - 0:24(हशा)
-
0:24 - 0:26आणि मला हे असंच घडावं असं वाटायचं.
-
0:26 - 0:27बेत तर तसाच असायचा.
-
0:27 - 0:30मी अगदी तयार असायचो.
-
0:30 - 0:32पण मग, खरोखरच पेपर लिहायची वेळ यायची.
-
0:32 - 0:34आणि मी असं काहीसं करायचो.
-
0:34 - 0:37(हशा)
-
0:37 - 0:39आणि हे प्रत्येक पेपरच्या वेळी घडत असे.
-
0:40 - 0:44पण मग आला सिनियर वर्षातला ९० पानी थिसिस.
-
0:44 - 0:46या पेपरवर एक वर्षभर काम करायचं असतं.
-
0:46 - 0:49अशा पेपरसाठी माझी नेहमीची पध्दत चालली नसती
हे मला ठाऊक होतं. -
0:49 - 0:51हा पुष्कळच मोठा प्रकल्प होता.
-
0:51 - 0:52म्हणून मी योजना आखली.
-
0:52 - 0:55आणि असं काहीसं करायचं ठरवलं.
-
0:56 - 0:57तर हे वर्ष असं जायला हवं.
-
0:57 - 0:59मी सुरुवात हलकीशी करेन.
-
0:59 - 1:02मधल्या महिन्यांत काम वाढवेन.
-
1:02 - 1:04मग शेवटी, अगदी जोरदार काम करेन.
-
1:04 - 1:06एखाद्या छोट्या जिन्याप्रमाणे.
-
1:06 - 1:08जिने चढणं असं
कितीसं कठीण असणार? -
1:08 - 1:10त्यात काय मोठंसं?
-
1:11 - 1:13पण मग, अत्यंत मजेशीर गोष्ट घडली.
-
1:13 - 1:14ते पहिले काही महिने?
-
1:15 - 1:16ते आले आणि गेले.
-
1:16 - 1:18पण मी फार काही करू शकलो नाही.
-
1:18 - 1:19मग मी एक मस्त नवी सुधारित योजना आखली
-
1:19 - 1:21(हशा)
-
1:21 - 1:22आणि मग --
-
1:22 - 1:24(हशा)
-
1:24 - 1:27मग ते मधले महिने खरोखरच निघून गेले.
-
1:27 - 1:29पण मी एक शब्दही लिहिला नव्हता.
-
1:29 - 1:31तर, आपण इथे होतो.
-
1:32 - 1:34मग दोन महिन्यांचा एक महिना झाला.
-
1:34 - 1:36त्याचेही दोन आठवडे झाले.
-
1:36 - 1:37आणि एके दिवशी मी जागा झालो,
-
1:38 - 1:40तेव्हा अंतिम मुदतीला तीन दिवस बाकी होते.
-
1:42 - 1:43आणि अजून एक शब्दही लिहून झाला नव्हता.
-
1:43 - 1:46मग मी शक्य असणारी एकमेव गोष्ट केली.
-
1:46 - 1:48७२ तासांमध्ये ९० पानं लिहिली.
-
1:48 - 1:50एकच नव्हे, तर दोन रात्री जागरण केलं --
-
1:50 - 1:53मनुष्यप्राण्यांनी दोन रात्री जागरण
करायचं नसतं -- -
1:54 - 1:56विद्यापीठाच्या आवारात पळत सुटलो
-
1:56 - 1:58जणुकाही उडतच गेलो, आणि अगदी
-
1:58 - 2:00शेवटच्या क्षणी पेपर पूर्ण करून दिला.
-
2:00 - 2:02मला वाटलं, चला, झालं काम.
-
2:02 - 2:04पण एका आठवड्यानंतर एक फोन आला.
-
2:04 - 2:05विद्यापीठाकडून.
-
2:06 - 2:07ते म्हणाले, "आपण टिम अर्बन का?"
-
2:07 - 2:09मी म्हणालो, "होय"
-
2:09 - 2:11ते म्हणाले, "आपल्या थिसिसबद्दल
बोलायचं आहे. " -
2:11 - 2:13मी म्हणालो, "बरं."
-
2:13 - 2:15आणि ते म्हणाले,
-
2:15 - 2:17"इतका उत्तम थिसिस पाहिला नव्हता"
-
2:17 - 2:19(हशा)
-
2:20 - 2:23(टाळ्या)
-
2:25 - 2:26हे असं घडलं नव्हतं.
-
2:26 - 2:28(हशा)
-
2:28 - 2:31तो एक खूप खूप वाईट थिसिस होता.
-
2:31 - 2:33(हशा)
-
2:33 - 2:37मला त्या एकाच क्षणाची मजा लुटायची होती,
जेव्हा तुम्हाला सर्वांना वाटलं होतं, -
2:38 - 2:39"काय अफलातून माणूस आहे हा!"
-
2:39 - 2:41(हशा)
-
2:41 - 2:42नाही, नाही. तो खूपच वाईट होता.
-
2:43 - 2:47असो. तर आज मी एक लेखक आणि ब्लॉगर आहे.
-
2:47 - 2:49"वेट बट व्हाय" हा ब्लॉग मी लिहितो.
-
2:49 - 2:52आणि दोन वर्षांपूर्वी,
मी आळशीपणाबद्दल लिहायचं ठरवलं. -
2:52 - 2:56उत्साही लोकांना
माझं वागणं नेहमीच गोंधळात पाडतं. -
2:56 - 2:59आळशी लोकांच्या डोक्यात
काय चाललेलं असतं, ते -
2:59 - 3:01मला जगभरातल्या उत्साही
लोकांना सांगायचं होतं. -
3:01 - 3:03आम्ही जसे असतो, तसे का असतो?
-
3:03 - 3:04माझं एक गृहीतक होतं.
-
3:04 - 3:07आळशी लोकांचे मेंदू, प्रत्यक्षात,
-
3:07 - 3:09इतर लोकांच्या मेंदूंपेक्षा वेगळे असतात.
-
3:10 - 3:12याची चाचणी घेण्यासाठी
मी एक एमआरआय लॅब शोधली. -
3:12 - 3:14त्यांनी मला माझा मेंदू आणि
-
3:14 - 3:17एका उत्साही माणसाचा मेंदू,
दोन्हींचे स्कॅन काढू दिले. -
3:17 - 3:18तुलना करण्यासाठी.
-
3:19 - 3:21ते मी आज इथे आणले आहेत,
तुम्हाला दाखवण्यासाठी. -
3:21 - 3:24नीट लक्षपूर्वक बघा, काही फरक दिसतो का.
-
3:24 - 3:27जर तुम्ही प्रशिक्षित मेंदूतज्ज्ञ नसाल,
-
3:27 - 3:29तर ते सहज समजणार नाही.
तरी पण एकदा पहाच. -
3:29 - 3:31तर हा आहे उत्साही माणसाचा मेंदू.
-
3:32 - 3:34(हशा)
-
3:34 - 3:35आता..
-
3:36 - 3:38हा माझा मेंदू.
-
3:38 - 3:41(हशा)
-
3:44 - 3:45दोघांत फरक आहे.
-
3:46 - 3:48दोन्हींत एक
"विचारपूर्वक निर्णय घेणारा" आहे. -
3:48 - 3:50पण आळशाच्या मेंदूत एक
-
3:50 - 3:53"झटपट समाधानाचं माकड" सुद्धा आहे.
-
3:53 - 3:55तर याचा आळशावर काय परिणाम होतो?
-
3:55 - 3:58याचा अर्थ, सगळं आलबेल आहे.
हे असं काही घडेपर्यंत.. -
3:58 - 4:00[काम पूर्ण करायला ही वेळ उत्तम आहे.]
[नाही!] -
4:00 - 4:03तर, "विचारपूर्वक निर्णय घेणारा",
-
4:03 - 4:05काहीतरी भरीव काम करण्याचा निर्णय घेतो.
-
4:05 - 4:07पण माकडाला हा बेत आवडत नाही.
-
4:07 - 4:09म्हणून माकड, चक्र ताब्यात घेतं
-
4:09 - 4:12आणि म्हणतं, "आपण विकिपीडियातलं
ते पूर्ण पान वाचूया, -
4:12 - 4:14नॅन्सी केरिगन/ टोन्या हार्डिंग भानगडीचं.
-
4:14 - 4:16कारण ती भानगड झाली होती,
हे मला आत्ता आठवलं. -
4:16 - 4:17(हशा)
-
4:17 - 4:18मग..
-
4:18 - 4:20(हशा)
-
4:20 - 4:22मग आपण फ्रीजजवळ जाऊ.
-
4:22 - 4:24गेल्या १० मिनिटांत त्यात काही
नवं आलं आहे का, ते पाहू. -
4:25 - 4:27मग आपण यूट्यूब ची सफर करू.
-
4:27 - 4:30रिचर्ड फाईनमन यांच्या, लोहचुंबकाबद्दलच्या
व्हिडियोपासून सुरुवात करून -
4:30 - 4:33बऱ्याच वेळानंतर,
आपली सफर संपेल, -
4:33 - 4:35ती जस्टिन बीबरच्या आईच्या मुलाखतीने.
-
4:35 - 4:37(हशा)
-
4:37 - 4:39"हे सर्व करायला खूप वेळ लागणार,
-
4:39 - 4:43त्यामुळे आपल्या वेळापत्रकात कामासाठी
जागाच उरणार नाही. -
4:43 - 4:44सॉरी!"
-
4:44 - 4:45(हं )
-
4:46 - 4:50आता, इथे काय चाललं आहे?
-
4:51 - 4:54"झटपट समाधानाचं माकड" हा प्राणी
चक्र धरू देण्याच्या -
4:54 - 4:55लायकीचा दिसत नाही.
-
4:55 - 4:57हा केवळ आत्ताच्या क्षणापुरता जगतो.
-
4:57 - 5:00याला भूतकाळाचं स्मरण नाही,
भविष्याचं ज्ञान नाही. -
5:00 - 5:02याला फक्त फिकीर आहे,
-
5:02 - 5:04सोप्या आणि गमतीच्या गोष्टींची.
-
5:04 - 5:07प्राण्यांच्या जगात हे चालतं.
-
5:07 - 5:09तुम्ही जर कुत्रा असाल,
-
5:09 - 5:12आणि तुमचं सगळं आयुष्य तुम्ही सोप्या आणि
गमतीच्या गोष्टी करण्यात घालवत असाल, -
5:12 - 5:13तर तुम्ही यशस्वी ठराल.
-
5:13 - 5:15(हशा)
-
5:15 - 5:17त्या माकडाच्या दृष्टीने,
-
5:18 - 5:20माणसं म्हणजे प्राण्यांतलीच एक जात.
-
5:20 - 5:25अन्न, झोप आणि पुनरुत्पादन
इतकं त्यांना पुरतं. -
5:25 - 5:27आदिवासींच्या काळात हे चाललं असतं.
-
5:27 - 5:30पण, लक्षात आलं का,
हा आदिवासींचा काळ नव्हे. -
5:30 - 5:34आपण एका प्रगत संस्कृतीत राहतो,
आणि या माकडाला त्याविषयी काही माहीत नाही. -
5:34 - 5:36म्हणून आपल्या मेंदूत दुसरा प्राणी असतो.
-
5:36 - 5:39विचारपूर्वक निर्णय घेणारा.
-
5:39 - 5:42इतर प्राण्यांना अशक्य अशा गोष्टी
आपण त्याच्यामुळे करू शकतो. -
5:42 - 5:44आपण भविष्याची कल्पना करू शकतो.
-
5:44 - 5:45परिस्थितीचं पूर्ण चित्र बघू शकतो.
-
5:45 - 5:47दीर्घ मुदतीचे बेत आखू शकतो.
-
5:47 - 5:49हे सगळं तो लक्षात घेतो.
-
5:50 - 5:52आणि योग्य त्याच गोष्टी
-
5:52 - 5:55आपल्याला करू देतो.
-
5:55 - 5:56कधीतरी सोप्या आणि मजेदार
-
5:56 - 5:58गोष्टी करणंही योग्य असतं.
-
5:58 - 6:00जसं की जेवताना किंवा झोपण्यापूर्वी.
किंवा -
6:00 - 6:02कष्टाने कमावलेले फुरसतीचे क्षण भोगताना
-
6:02 - 6:04इथे दोघे एकत्र येतात.
-
6:04 - 6:06काही वेळा, त्यांची मतं जुळतात.
-
6:06 - 6:08पण इतर वेळी, पूर्ण परिस्थिती पाहता,
-
6:08 - 6:12कठीण आणि कमी मजेच्या गोष्टी करणंच
-
6:12 - 6:14जास्त योग्य ठरतं.
-
6:14 - 6:15आणि इथेच झगडा होतो.
-
6:16 - 6:17आळशी माणसाचा झगडा
-
6:17 - 6:20नेहमी एका विशिष्ट प्रकाराने संपतो.
-
6:20 - 6:24त्याचा बराचसा वेळ या केशरी भागात घालवून.
-
6:24 - 6:28या सोप्या आणि मजेच्या जागेत, जी पूर्णपणे
योग्य गोष्टींच्या वर्तुळाबाहेर आहे. -
6:28 - 6:30मी त्या जागेला गडद मैदान म्हणतो.
-
6:30 - 6:32(हशा)
-
6:32 - 6:35गडद मैदान ही जागा,
-
6:35 - 6:38तुम्हा सगळ्या आळशी लोकांना
चांगलीच ठाऊक आहे. -
6:39 - 6:41तिथे रिकामटेकडे उद्योग केले जातात.
-
6:41 - 6:44ज्या वेळी ते करायला नकोत, त्या वेळी.
-
6:44 - 6:46काळ्या मैदानात केलेली गंमत ही
-
6:46 - 6:49खरोखरची गंमत नसते.
कारण ती कमावलेली अजिबात नसते. -
6:49 - 6:52तिथल्या हवेत असतो अपराधीपणा,
भीती, चिंता, स्व-तिरस्कार -
6:52 - 6:54या सगळ्या पक्क्या आळशाच्या भावना.
-
6:55 - 6:58आता प्रश्न असा, की
माकडाच्या हातात चक्र असताना, -
6:58 - 7:02आळशी या निळ्या भागात येऊच कसा शकेल?
-
7:02 - 7:05जिथे मजा कमी,
पण महत्त्वाची कामं होतात, तिथे? -
7:05 - 7:10तर, आळशाचा पाठीराखा एक देवदूत असतो.
-
7:10 - 7:13जो सतत त्याच्यावर नजर ठेवून ,
त्याची काळजी वाहत असतो. -
7:13 - 7:15त्याच्या कठीण समयी.
-
7:15 - 7:17त्याचं नाव घबराट राक्षस.
-
7:17 - 7:20(हशा)
-
7:22 - 7:27हा घबराट राक्षस एरवी सुप्तावस्थेत असतो.
-
7:27 - 7:31पण जेव्हा एखादी मुदत संपत येते, किंवा
चारचौघात लाज जाईल असा धोका निर्माण होतो, -
7:31 - 7:33व्यवसाय धोक्यात येतो,
किंवा असाच काही -
7:33 - 7:36भयंकर परिणाम होतो,
तेव्हा तो अचानक जागा होतो. -
7:36 - 7:40आणि महत्त्वाचं म्हणजे,
माकड फक्त त्याला एकट्यालाच घाबरतं. -
7:40 - 7:45नुकताच त्याचा माझ्या आयुष्याशी
जवळचा संबंध आला. -
7:45 - 7:48सहा महिन्यांपूर्वी टेड च्या लोकांनी
माझ्याशी संपर्क साधला -
7:48 - 7:50आणि मला टेड भाषण करण्याचं आमंत्रण दिलं.
-
7:50 - 7:52(हशा)
-
7:55 - 7:57अर्थातच, मी हो म्हटलं.
-
7:57 - 8:01मी मागे कधीतरी टेड भाषण केलेलं असावं,
असं स्वप्न मी नेहमीच पाहायचो. -
8:01 - 8:05(हशा)
-
8:05 - 8:09(टाळ्या)
-
8:12 - 8:14पण या सगळ्या गडबडीमध्ये
-
8:14 - 8:17"विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या"च्या मनात
काही वेगळाच विचार होता. -
8:18 - 8:20तो म्हणत होता, "आपण काय कबूल केलं,
कळलं का?" -
8:20 - 8:23भविष्यात एके दिवशी काय घडणार आहे,
ते नीट समजलं आहे का? -
8:23 - 8:26आपल्याला आत्ताच बसून यावर काम केलं पाहिजे.
-
8:26 - 8:29पण माकड म्हणालं, "एकदम कबूल.
पण आधी आपण गूगल अर्थ उघडूया. -
8:29 - 8:32आणि भारताचं दक्षिण टोक जवळून पाहूया.
अगदी जमिनीपासून २०० फुटांवर. -
8:32 - 8:36मग अडीच तास वर सरकत जाऊ,
अगदी उत्तर टोक दिसेपर्यंत. -
8:36 - 8:38म्हणजे भारताचं नीट दर्शन घडेल.
-
8:38 - 8:42(हशा)
-
8:43 - 8:45तर त्या दिवशी आम्ही तेच केलं.
-
8:45 - 8:47(हशा)
-
8:49 - 8:52सहा महिन्यांचे चार झाले,
मग दोन आणि मग एक. -
8:53 - 8:56टेड च्या लोकांनी
वक्त्यांची नावं प्रसिद्ध केली. -
8:56 - 8:58मी वेबसाईट उघडली.
तिथे माझाच चेहरा -
8:58 - 9:00माझ्याकडे पाहत होता.
-
9:00 - 9:01ओळखा पाहू, कोण जागा झाला असेल?
-
9:01 - 9:04(हशा)
-
9:05 - 9:08तर घबराट राक्षसाचं डोकंच फिरतं.
-
9:08 - 9:11काही सेकंदांतच सर्वत्र कल्लोळ माजतो.
-
9:11 - 9:13(हशा)
-
9:16 - 9:19आणि माकड - ते घबराट राक्षसाला घाबरतं,
आठवतंय? -
9:19 - 9:20धूम.. ते चढतं झाडावर.
-
9:20 - 9:21आणि शेवटी,
-
9:21 - 9:24"विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या"च्या
हातात चक्र येतं. -
9:24 - 9:25आणि मला माझ्या भाषणावर
काम करता येतं. -
9:25 - 9:28घबराट राक्षस हा
-
9:28 - 9:31आळशांचा सर्व मूर्खपणा उलगडू शकतो.
-
9:31 - 9:34उदाहरणार्थ, माझ्यासारखा कोणी
दोन आठवडे घालवून -
9:34 - 9:37पेपरची सुरुवातही करू शकत नाही.
-
9:37 - 9:40पण नंतर अचानक गवसलेल्या विलक्षण उत्साहाने
-
9:40 - 9:43रात्रभर जागून आठ पानं लिहितो.
-
9:44 - 9:47आणि ही संपूर्ण परिस्थिती,
त्यातल्या तीन पात्रांसहित, -
9:47 - 9:49ही आळशाची रीत.
-
9:50 - 9:54ती नेटकी दिसत नाही,
पण सरतेशेवटी काम पार पाडते. -
9:54 - 9:58तर दोन वर्षांपूर्वी मी
माझ्या ब्लॉगवर हेच लिहायचं ठरवलं. -
9:58 - 10:01आणि ते लिहिल्यावर आलेल्या
प्रतिसादांनी मी थक्क झालो. -
10:01 - 10:03अक्षरशः हजारो ईमेल्स आल्या.
-
10:03 - 10:06जगभरातल्या अनेक ठिकाणांहून,
अनेक प्रकारच्या लोकांकडून. -
10:06 - 10:07अनेक प्रकारच्या गोष्टी करणाऱ्यांकडून
-
10:07 - 10:10यात होत्या नर्सेस, बॅँकर्स,
रंगारी, अभियंते, -
10:10 - 10:13आणि पी. एच डी चे अनेकानेक विद्यार्थी.
-
10:13 - 10:15(हशा)
-
10:15 - 10:17आणि त्या सगळ्यांनी एकच गोष्ट लिहिली होती.
-
10:17 - 10:19"माझीसुद्धा हीच समस्या आहे."
-
10:19 - 10:23पण मला जाणवलं, की माझं लिखाण
जरी हलकंफुलकं असलं, -
10:23 - 10:25तरी या ईमेल्स मात्र गंभीर होत्या.
-
10:25 - 10:28हे लोक तीव्र निराशेने लिहित होते.
-
10:28 - 10:31आळशीपणामुळे त्यांच्या आयुष्यावर
झालेल्या परिणामांबद्दल. -
10:31 - 10:33या माकडाने काय केलं त्याबद्दल.
-
10:35 - 10:38मी विचार केला,
-
10:38 - 10:41आळशाच्या रीतीनेही कामं होतात,
तर मग इथे काय चुकलं? -
10:41 - 10:44हे सगळे लोक असे गर्तेत का?
-
10:44 - 10:47तर, आळस दोन प्रकारचा असतो असं दिसतं.
-
10:48 - 10:51आज मी ज्या गोष्टींबद्दल बोललो,
जी उदाहरणं दिली, -
10:51 - 10:52त्यांना मुदत होती.
-
10:52 - 10:53आणि जेव्हा मुदत असते,
-
10:53 - 10:56तेव्हा आळसाचे परिणाम थोडावेळ टिकतात.
-
10:56 - 10:58कारण तिथे घबराट राक्षस अवतरतो.
-
10:58 - 11:00पण दुसऱ्या प्रकारचाही एक आळस असतो.
-
11:00 - 11:03ज्या परिस्थितीला मुदत नसते,
तिथे हा आळस दिसतो. -
11:03 - 11:06जर तुम्हाला स्वबळावर
व्यवसाय घडवायचा असेल, -
11:06 - 11:08काही कलाविषयक, किंवा उद्योगधंदा
-
11:08 - 11:11तर, आरंभ करताना मुदत नसते,
कारण काम सुरूच झालेलं नसतं. -
11:12 - 11:14जोपर्यंत तुम्ही खूप कष्ट करून
-
11:14 - 11:15कामाची गती वाढवत नाही, तोपर्यंत.
-
11:15 - 11:19व्यवसायाव्यतिरिक्त इतरही
अनेक महत्त्वाच्या गोष्टींना -
11:19 - 11:20मुदत नसते.
-
11:20 - 11:23जसं की, नातेवाईकांना भेटणं, व्यायाम करणं,
आरोग्याची काळजी घेणं. -
11:23 - 11:25जोडीदाराशी चांगलं नातं जुळवणं
-
11:25 - 11:28किंवा संबंध असह्य झाला असल्यास तो तोडणं.
-
11:28 - 11:33आता या कामांत केवळ घबराट राक्षसाची भीती
हीच जर आळशाची रीत असेल, -
11:33 - 11:35तर हा मोठा प्रश्न आहे.
-
11:35 - 11:37कारण या मुदत नसलेल्या कामांत,
-
11:37 - 11:39घबराट राक्षस पुढे येतच नाही.
-
11:39 - 11:41त्याला जागं व्हायला कारण नसतं
-
11:41 - 11:43त्यामुळे आळसाचे परिणाम रोखले जात नाहीत.
-
11:43 - 11:45ते सतत पुढे पसरत जातात.
-
11:46 - 11:49हा दीर्घ मुदतीचा आळस
-
11:49 - 11:52फार दिसून येत नाही.
त्याबद्दल फार बोललं जात नाही. -
11:52 - 11:55छोटी मुदत असणाऱ्या,
धमाल उडवणाऱ्या आळसाइतकं. -
11:55 - 11:58याचे परिणाम गपचूप सहन केले जातात.
-
11:59 - 12:00या आळसामधून
-
12:00 - 12:04दीर्घकाळचं दुःख आणि
हळहळ निर्माण होऊ शकते. -
12:05 - 12:07मग मला वाटलं, म्हणूनच हे सगळे लोक
ईमेल्स करताहेत. -
12:07 - 12:10म्हणूनच ते गर्तेत आहेत.
-
12:10 - 12:13ते एखाद्या कामाशीच अडलेले नाहीत.
-
12:13 - 12:16तर, आळसात खूप काळ घालवल्यामुळे ते
आपल्याच आयुष्याचे -
12:16 - 12:18जणु प्रेक्षक बनले आहेत.
-
12:19 - 12:22स्वप्नं साकार झाली नाहीत,
म्हणून ते निराश झालेले नाहीत. -
12:22 - 12:25तर ते स्वप्नांचा पाठलाग
सुरूच करू शकले नाहीत, म्हणून. -
12:25 - 12:29या ईमेल्स वाचून मला एक साक्षात्कार झाला..
-
12:30 - 12:34मला वाटतं, अजिबात आळस नसणारी माणसं
अस्तित्वातच नाहीत. -
12:34 - 12:37हो, बरोबर. मला वाटतं,
तुम्ही सगळे आळशी आहात. -
12:38 - 12:40आता, तुम्ही अगदी रद्दड नसाल,
-
12:40 - 12:41आपल्यापैकी काही आहेत तसे.
-
12:41 - 12:43(हशा)
-
12:43 - 12:46तुमच्यापैकी काही मुदतीच्या तारखांशी
सख्य राखून असतील. -
12:46 - 12:49पण लक्षात ठेवा: जेव्हा मुदतीची तारीखच नसते
-
12:49 - 12:50तेव्हाच माकड सर्वात छुपी चाल खेळतं.
-
12:51 - 12:53आता, एक शेवटची गोष्ट दाखवतो.
-
12:53 - 12:56याला मी आयुष्याचं कॅलेंडर म्हणतो.
-
12:56 - 13:01यात नव्वद वर्षांच्या आयुष्यातल्या प्रत्येक
आठवड्यासाठी एक चौकोन आहे. -
13:01 - 13:03म्हणजे काही फार चौकोन नव्हेत.
-
13:03 - 13:06आजपर्यंत आपण त्यातले
बरेच चौकोन वापरले आहेत. -
13:07 - 13:12मला वाटतं, आपण सर्वांनी
या कॅलेंडरकडे नीट पहावं. -
13:13 - 13:16आपण नक्की कसला आळस करीत आहोत,
त्याचा विचार करावा. -
13:16 - 13:19कारण प्रत्येकजणच कसला ना कसला
आळस करीत असतो. -
13:21 - 13:24आपण त्या झटपट समाधानाच्या माकडापासून
सावध राहायला हवं. -
13:25 - 13:28हे काम आपण सर्वांनीच करायला हवं.
-
13:29 - 13:31तिथे काही फार चौकोन शिल्लक उरलेले नाहीत.
-
13:31 - 13:33म्हणून आजच हे काम सुरू करायला हवं.
-
13:33 - 13:36हं.. म्हणजे अगदी आजच नव्हे काही,
-
13:36 - 13:38(हशा)
-
13:38 - 13:39कळलं ना,
-
13:40 - 13:41लवकरच कधीतरी.
-
13:41 - 13:43धन्यवाद.
-
13:43 - 13:50(टाळ्या)
- Title:
- पक्क्या आळशाच्या मनाचा शोध
- Speaker:
- टिम अर्बन
- Description:
-
आळस करण्यात अर्थ नाही, हे टिम अर्बन यांना ठाऊक आहे. पण काम करताना शेवटच्या मिनिटापर्यंत थांबायची त्यांची सवय काही सुटत नाही. आपल्या विनोदी आणि बोधप्रद भाषणात अर्बन आपल्याला प्रवास घडवतात, यूट्यूबच्या व्यसनाचा, विकिपीडियात हरवण्याचा आणि खिडकीबाहेर रमण्याचा. आपलं आयुष्य संपण्यापूर्वी, आपण कशाचा आळस करीत आहोत, त्यावर विचार करण्याचा ते आपल्याला आग्रह करतात.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 14:03
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Inside the mind of a master procrastinator |