कुचकामी यंत्रं बनवा.
-
0:02 - 0:03हॅलो.
-
0:03 - 0:04माझं नाव सिमोन.
-
0:05 - 0:09तुम्ही ऐकलं असेल, की
व्यासपीठावर वाटणारी भीती कमी होण्यासाठी, -
0:09 - 0:11समोरचे लोक विवस्त्र बसले आहेत,
अशी कल्पना करावी. -
0:11 - 0:14त्यामुळे तुमचा धीर वाढू शकतो.
-
0:15 - 0:16पण मला वाटलं, की
-
0:16 - 0:21आज, २०१८ साली विवस्त्र प्रेक्षकांची
कल्पना करणं विचित्र आणि चुकीचं ठरेल. -
0:21 - 0:24आपण या असल्या गोष्टी मागे टाकण्याचा
प्रयत्न करत आहोत. -
0:24 - 0:27आता व्यासपीठावरच्या भीतीसाठी
-
0:27 - 0:29आपल्याला एक नवीन उपाय शोधला पाहिजे.
-
0:29 - 0:31मग माझ्या लक्षात आलं, की
-
0:31 - 0:35तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात,
तसंच मला तुमच्याकडे पाहता आलं, -
0:35 - 0:38तर फिटंफाट होईल.
-
0:38 - 0:40म्हणजे माझ्याकडेही पुष्कळ डोळे असले,
-
0:41 - 0:43तर मग मला तितकीशी भीती वाटणार नाही.
-
0:43 - 0:47म्हणून मग आजच्या व्याख्यानासाठी
मी एक शर्ट तयार केला. -
0:47 - 0:50(खुळखुळ आवाज )
-
0:53 - 0:55(हशा)
-
0:58 - 1:01हे आहेत हलणारे डोळे.
-
1:01 - 1:03हा शर्ट बनवायला मला १४ तास
-
1:03 - 1:07आणि २२७ डोळे लागले.
-
1:07 - 1:10तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात,
तसंच मला तुमच्याकडे पाहता यावं, -
1:10 - 1:12हे खरं तर, हा शर्ट बनवण्यामागचं
फक्त अर्धंच कारण आहे. -
1:12 - 1:14आणि असं करता यावं,
हे उरलेलं अर्धं कारण. -
1:14 - 1:16(खुळखुळ आवाज )
-
1:16 - 1:17(हशा)
-
1:17 - 1:19मी अशा अनेक गोष्टी करते.
-
1:19 - 1:22मला एखादा प्रश्न पडतो आणि मग
मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढते. -
1:22 - 1:24उदाहरणार्थ, दात घासणे.
-
1:24 - 1:27हे काम आपल्याला सर्वांना करावं लागतं,
पण ते कंटाळवाणं आहे. -
1:27 - 1:29कुणालाच ते आवडत नाही.
-
1:29 - 1:32आता इथे प्रेक्षकांत कोणी
सात वर्षांची मुलं असतील, -
1:32 - 1:34तर ती नक्की म्हणतील, "हो हो, अगदी खरं."
-
1:34 - 1:37पण हे काम एखाद्या यंत्राने केलं तर?
-
1:43 - 1:46(हशा)
-
1:47 - 1:48मी या यंत्राला
-
1:50 - 1:52नाव ठेवलं आहे.. टूथब्रश हेल्मेट.
-
1:53 - 1:56(हशा)
-
1:57 - 2:00(यांत्रिक हाताचा आवाज)
-
2:00 - 2:03(हशा)
-
2:03 - 2:07(टाळ्या)
-
2:07 - 2:12माझ्या या टूथब्रश हेल्मेटची शिफारस
दहापैकी शून्य दंतवैद्यांनी केली आहे. -
2:12 - 2:16या यंत्राने दंतवैद्यकशास्त्रात
कसलीही क्रांती घडवली नाही. -
2:16 - 2:19पण त्याने माझं आयुष्य
पूर्णपणे बदलून टाकलं. -
2:19 - 2:22हे टूथब्रश हेल्मेट बनवण्याचं काम
तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालं. -
2:22 - 2:24हे यंत्र तयार झाल्यानंतर
-
2:24 - 2:27मी माझ्या दिवाणखान्यात गेले.
कॅमेरा सुरु केला, आणि -
2:27 - 2:29या यंत्राचं काम दाखवणारी
सात सेकंदांची फिल्म बनवली. -
2:30 - 2:31आणि आजच्या युगातली
-
2:31 - 2:34परीकथा अशी असते..
-
2:34 - 2:36एखादी मुलगी इंटरनेटवर
काहीतरी प्रसिद्ध करते. -
2:36 - 2:39ते जगभर पसरतं.
-
2:39 - 2:42मग प्रतिसादाच्या जागेत
हजारो पुरुष प्रकट होतात, -
2:42 - 2:43आणि तिला लग्नाची मागणी घालतात.
-
2:43 - 2:44(हशा)
-
2:44 - 2:47पण तिकडे लक्ष न देता
ती एक YouTube चॅनल काढते, -
2:47 - 2:48आणि यंत्रं बनवत राहते.
-
2:49 - 2:53त्यावेळेपासून मी इंटरनेटवर
स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. -
2:53 - 2:56मी आहे कुचकामी यंत्र संशोधक.
-
2:56 - 2:57आपण सर्व जाणताच, की
-
2:57 - 3:01आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी
पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे -
3:01 - 3:03अगदी छोटं क्षेत्र निवडणं.
-
3:03 - 3:05(हशा)
-
3:05 - 3:10(टाळ्या)
-
3:10 - 3:13तर, मी माझ्या यंत्रांबद्दलचा
YouTube चॅनल चालवते. -
3:13 - 3:16ड्रोन वापरून मी केस कापते.
-
3:16 - 3:17(ड्रोनचा आवाज)
-
3:17 - 3:20(हशा)
-
3:20 - 3:21(ड्रोन पडतो.)
-
3:21 - 3:22(हशा)
-
3:22 - 3:23(ड्रोनचा आवाज)
-
3:23 - 3:25(हशा)
-
3:25 - 3:27(टाळ्या)
-
3:27 - 3:30हे यंत्र मला सकाळी उठवतं.
-
3:30 - 3:32(गजर)
-
3:32 - 3:35(हशा)
-
3:37 - 3:39(व्हिडीओ) आ!
-
3:39 - 3:42हे यंत्र भाजी चिरायला मदत करतं.
-
3:42 - 3:44(सुऱ्यांची पाती भाजी चिरतात.)
-
3:45 - 3:46मी अभियंती नाही.
-
3:46 - 3:49मी विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण
घेतलं नाही. -
3:49 - 3:52पण शाळेत असताना मी
खूप महत्त्वाकांक्षी होते. -
3:52 - 3:55माध्यमिक शाळेत मी सतत ए ग्रेड मिळवत असे.
-
3:55 - 3:57वर्गात मी पहिल्या क्रमांकावर होते.
-
3:57 - 3:58पण याची दुसरी बाजू अशी, की
-
3:58 - 4:02या यशाबद्दलची पराकोटीची चिंता
मला सतत भेडसावत असे. -
4:02 - 4:05त्या सुमाराला मी माझ्या भावाला लिहिलेली
ही ईमेल पहा. -
4:05 - 4:08"हे सांगणं मला किती कठीण जातंय,
याची तुला कल्पना येणार नाही. -
4:08 - 4:09ही कबुली देताना
-
4:09 - 4:11मला खूप शरम वाटते आहे.
-
4:11 - 4:13मी मूर्ख आहे, असं लोकांना वाटायला नको.
-
4:13 - 4:15आता मला रडू येतंय.
-
4:15 - 4:16छे!"
-
4:16 - 4:20नाही, मी काही घराला चुकून
आग वगैरे लावली नव्हती. -
4:20 - 4:24ज्या गोष्टीविषयी मी इतकं अस्वस्थ होऊन
ईमेल मध्ये लिहिलं ती गोष्ट होती, -
4:24 - 4:26गणिताच्या परीक्षेत मिळालेली बी ग्रेड.
-
4:27 - 4:31तो काळ आणि हा काळ... मधल्या काळात
नक्कीच काहीतरी घडलं असलं पाहिजे. -
4:32 - 4:36(हशा)
-
4:36 - 4:38त्यापैकी एक.. पौगंडावस्था.
-
4:38 - 4:40(हशा)
-
4:40 - 4:41खरंच, सुंदर काळ होता तो.
-
4:41 - 4:42आणि त्याच काळात
-
4:42 - 4:45मला यंत्रं बनवणंही आवडू लागलं.
-
4:45 - 4:48हार्डवेअरबद्दल जास्त शिकावंसं वाटू लागलं.
-
4:48 - 4:51पण स्वतःच स्वतःला हार्डवेअरबद्दल शिकवणं,
-
4:51 - 4:54आणि त्यापासून यंत्रं बनवणं
हे अतिशय कठीण आहे. -
4:54 - 4:56त्यात अपयश येण्याची शक्यता आहे.
-
4:56 - 4:57तसंच, त्यामुळे
-
4:57 - 5:00आपण मूर्ख आहोत असं वाटणंही साहजिक आहे.
-
5:00 - 5:02याच गोष्टीची भीती मला
सर्वात जास्त वाटत होती. -
5:03 - 5:09म्हणून मग शंभर टक्के यश मिळेल
अशी योजना मी आखली. -
5:09 - 5:12या योजनेत अयशस्वी होणं केवळ अशक्य होतं.
-
5:12 - 5:15ही योजना अशी, की
नीट चालणाऱ्या यंत्रांऐवजी, -
5:15 - 5:18कुचकामी यंत्रं बनवायची.
-
5:19 - 5:22त्यावेळी माझ्या लक्षात आलं नव्हतं,की
-
5:22 - 5:26कुचकामी गोष्टी बनवायलासुद्धा अक्कल लागते.
-
5:26 - 5:28हार्डवेअरबद्दल शिकताना,
-
5:28 - 5:30आयुष्यात पहिल्यांदाच,
-
5:30 - 5:32मला यशाची चिंता वाटेनाशी झाली.
-
5:33 - 5:37स्वतःवर लादलेलं अपेक्षांचं दडपण
दूर केल्यावर -
5:37 - 5:40त्याची जागा उत्साहाने घेतली.
-
5:40 - 5:42त्यामुळे तो खेळ वाटू लागला.
-
5:43 - 5:44एक संशोधक म्हणून,
-
5:44 - 5:47लोकांना कठीण वाटणाऱ्या गोष्टींमध्ये
मला रस वाटतो. -
5:47 - 5:50मग त्या गोष्टी छोट्या असोत, मोठ्या असोत,
किंवा अधल्यामधल्या. -
5:50 - 5:55TED व्याख्यान देताना काही
नवीन प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. -
5:55 - 5:56त्या मी सोडवू शकते.
-
5:56 - 5:59समस्या नीट समजून घेणं, ही
कुचकामी यंत्र बनवण्याच्या प्रक्रियेतली -
5:59 - 6:01पहिली पायरी आहे.
-
6:02 - 6:03हे व्याख्यान देताना
-
6:03 - 6:07येणाऱ्या समस्यांचा विचार
-
6:07 - 6:08मी इथे येण्यापूर्वी केला.
-
6:09 - 6:10काय बोलायचं ते मी विसरेन.
-
6:11 - 6:13लोक हसणार नाहीत.
-
6:13 - 6:14म्हणजे तुम्ही.
-
6:15 - 6:16किंवा त्याहून वाईट,
-
6:16 - 6:18तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसाल.
-
6:19 - 6:21आता इथे हसायला हरकत नाही.
-
6:21 - 6:22धन्यवाद.
-
6:22 - 6:23(हशा)
-
6:23 - 6:26किंवा, मला खूप भीती वाटेल.
माझे हात थरथर कापतील. -
6:26 - 6:28ही मला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
-
6:28 - 6:31किंवा माझी पॅन्ट व्याख्यानभर उघडीच राहील.
-
6:31 - 6:33आणि हे मला कळणार नाही, पण तुम्हाला दिसेल.
-
6:33 - 6:36पण पॅन्ट बंद आहे, तेव्हा ती भीती नाही.
-
6:36 - 6:40पण हात थरथरण्याची भीती
मला खूप अस्वस्थ करते. -
6:40 - 6:42मला आठवतं, लहानपणी
-
6:42 - 6:44शाळेत वर्गासमोर बोलताना
-
6:44 - 6:46मी माझे मुद्दे एका कागदावर लिहीत असे,
-
6:46 - 6:49आणि त्या कागदामागे एक वही धरत असे.
-
6:49 - 6:52थरथरणारा कागद कोणाच्या लक्षात येऊ नये,
म्हणून. -
6:52 - 6:54मी पुष्कळ व्याख्यानं देते.
-
6:55 - 6:59मला ठाऊक आहे,
इथले निम्मे प्रेक्षक म्हणत असतील, -
6:59 - 7:01"निरुपयोगी यंत्रं मजेशीर असतील,
-
7:01 - 7:04पण हा व्यवसाय कसा होऊ शकतो?"
-
7:04 - 7:06व्याख्यानं देणं हा त्याचा एक भाग आहे.
-
7:06 - 7:09व्यासपीठावर आयोजक एखादा पेला भरून
पाणी ठेवतात. -
7:09 - 7:11तहान लागली तर पिण्यासाठी.
-
7:11 - 7:15मला नेहमीच ते पाणी प्यायची
जोरदार इच्छा होते. -
7:15 - 7:17पण तो पेला उचलायची हिम्मत होत नाही.
-
7:17 - 7:20लोकांना माझे थरथरणारे हात दिसतील,
अशी भीती वाटते. -
7:20 - 7:24मग, पाण्याचा पेला उचलून देणारं
यंत्र बनवलं तर? -
7:24 - 7:28हलणाऱ्या डोळ्यांचा शर्ट घातलेली
घाबरट मुलगी ते यंत्र विकत घेईल. -
7:28 - 7:31आता हा शर्ट काढते, कारण मला
तुम्हांला काहीतरी दाखवायचं आहे. -
7:31 - 7:34(डोळ्यांचा खुळखुळ आवाज)
-
7:39 - 7:41ओह
-
7:41 - 7:42(खुळखुळ)
-
7:42 - 7:45(हशा)
-
7:53 - 7:56मला या यंत्रासाठी अजून नाव सुचलेलं नाही.
-
7:56 - 8:00"मस्तक कक्षा यंत्र" वगैरे काहीतरी म्हणू.
-
8:00 - 8:03कारण याचं कडं आपल्या डोक्याभोवती फिरतं.
-
8:03 - 8:05त्यावर आपण काहीही ठेवू शकतो.
-
8:05 - 8:08यावर कॅमेरा ठेवला, तर आपल्या
संपूर्ण डोक्याची छायाचित्रं मिळतील. -
8:08 - 8:12या यंत्राचे अनेक उपयोग आहेत.
-
8:12 - 8:14(हशा)
-
8:14 - 8:16उदाहरणार्थ,
-
8:16 - 8:18आपण यावर
खाद्यपदार्थ ठेवू शकतो. -
8:18 - 8:20आपल्या इच्छेनुसार.
-
8:20 - 8:22माझ्याकडे पॉपकॉर्न आहेत.
-
8:22 - 8:26त्यातले थोडे मी या यंत्रावर ठेवले.
-
8:27 - 8:29आणि मग..
-
8:29 - 8:31विज्ञानासाठी थोडासा त्याग केला.
-
8:31 - 8:34यापैकी काही पॉपकॉर्न जमिनीवर सांडले.
-
8:34 - 8:36आता कक्षेतून भ्रमण पूर्ण करू.
-
8:36 - 8:38(यंत्राचा आवाज)
-
8:38 - 8:39(हशा)
-
8:39 - 8:41आता एक छोटासा हात पुढे येईल.
-
8:41 - 8:43तो योग्य उंचीवर आणू.
-
8:43 - 8:44फक्त खांदे उडवले, की झालं.
-
8:44 - 8:46(हशा)
-
8:46 - 8:48(टाळ्या)
-
8:48 - 8:49छोटासा हात..
-
8:49 - 8:50(हात जोरात ढकलतो.)
-
8:50 - 8:51(हशा)
-
8:51 - 8:55(टाळ्या)
-
8:59 - 9:02मी मायक्रोफोन पाडला वाटतं.
-
9:02 - 9:04पण काही हरकत नाही. ठीक आहे.
-
9:05 - 9:08आता मला हे पॉपकॉर्न चावून खाल्ले पाहिजेत.
-
9:08 - 9:11तुम्ही आणखी थोडा वेळ
टाळ्या वाजवत राहाल का? -
9:11 - 9:15(टाळ्या)
-
9:15 - 9:18तर ही आहे माझी खाजगी सूर्यमाला.
-
9:18 - 9:19या शतकात जन्मल्यामुळे,
-
9:20 - 9:22मी आत्मकेंद्रित आहे.
सगळं माझ्याभोवती फिरलं पाहिजे. -
9:22 - 9:25(हशा)
-
9:25 - 9:28आता पुन्हा पाण्याच्या पेल्याकडे वळू.
-
9:28 - 9:30या यंत्रावर अजून.. खरं सांगते..
-
9:30 - 9:31या पेल्यात पाणी नाहीये.
-
9:31 - 9:33माफ करा.
-
9:33 - 9:37पण या यंत्रावर मला अजून काम केलं पाहिजे.
-
9:38 - 9:41पेला उचलून कड्यावर ठेवता आला पाहिजे.
-
9:41 - 9:43आता माझे हात जरासे थरथरले,
-
9:43 - 9:44तरी ते दिसणार नाहीत.
-
9:44 - 9:47कारण या अद्भुत यंत्राने
तुम्हांला मंत्रमुग्ध केलं आहे. -
9:47 - 9:48माझी काळजी मिटली.
-
9:48 - 9:50ठीक आहे.
-
9:50 - 9:51(यंत्राचा आवाज)
-
9:51 - 9:53(गाते)
-
9:54 - 9:56अरेरे, हे तर अडकलं.
-
9:56 - 9:59या यंत्रालाही कधीकधी
व्यासपीठावर भीती वाटते. -
10:00 - 10:02मग ते जरासं अडकतं.
-
10:03 - 10:05अगदी माणसांसारखं.
-
10:06 - 10:08थांबा.. थोडं मागे जाऊ.
-
10:09 - 10:10आणि मग..
-
10:10 - 10:11(पेला पडतो)
-
10:11 - 10:13(हशा)
-
10:13 - 10:16आजच्या काळात जन्माला येणं
किती भाग्याचं आहे. -
10:16 - 10:18(हशा)
-
10:18 - 10:23(टाळ्या)
-
10:25 - 10:29माझी यंत्रं म्हणजे जणु आंगिक विनोदाचा
अभियांत्रिकी अवतार. -
10:29 - 10:33पण यातून मला काहीतरी महत्त्वाचं सापडलं.
आनंद आणि विनम्रपणा. -
10:33 - 10:38बरेचदा, अभियांत्रिकी जगात
या गोष्टी हरवून जातात. -
10:38 - 10:40यातून मला हार्डवेअरबद्दल
बरंच काही शिकता आलं. -
10:40 - 10:43यशाची चिंता आड आली नाही.
-
10:44 - 10:48मला नेहमी विचारलं जातं,
"काहीतरी उपयोगाचं करणार आहेस का कधी?" -
10:48 - 10:49कोण जाणे, करेनही कधीतरी.
-
10:50 - 10:52माझ्या दृष्टीने,
-
10:52 - 10:53हेही उपयुक्तच आहे.
-
10:53 - 10:55कारण हे काम मी स्वतःहून सुरु केलं.
-
10:56 - 10:59योजना आखून करता येणार नाही
असं काम आहे हे. -
10:59 - 11:00हा व्यवसाय..
-
11:00 - 11:05(टाळ्या)
-
11:06 - 11:08आखणी करून सुरु करता आला नसता.
-
11:08 - 11:12मी जे काही केलं ते उत्साहाने केलं,
म्हणून हे सगळं घडलं. -
11:12 - 11:15माझा उत्साह मी इतरांना वाटला.
-
11:15 - 11:18मला वाटतं, हेच कुचकामी यंत्रं बनवण्यातलं
खरं सौंदर्य. -
11:18 - 11:20इथे आपण कबुली देतो, की
-
11:20 - 11:23आपल्याला सगळ्या प्रश्नांची
उत्तरं ठाऊक नाहीत. -
11:23 - 11:25त्यामुळे, आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे,
-
11:26 - 11:29असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज
गप्प बसतो. -
11:29 - 11:31टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल,
-
11:31 - 11:33पण आपण निदान प्रश्न तरी विचारला!
-
11:33 - 11:35धन्यवाद.
-
11:35 - 11:39(टाळ्या)
- Title:
- कुचकामी यंत्रं बनवा.
- Speaker:
- सिमोन गिर्ट्झ
- Description:
-
सिमोन गिर्ट्झ यांचं एक हसतंखेळतं मजेशीर हृद्य भाषण. यात आहेत त्यांनी स्वतः बनवलेल्या चित्रविचित्र अद्भुत वस्तूंची प्रात्यक्षिकं. निरुपयोगी यंत्रं बनवण्याच्या आपल्या कलेची ओळख त्यांनी इथे करून दिली आहे. भाजी चिरणे, केस कापणे, लिपस्टिक लावणे, आणि अशीच इतर अनेक कामं करण्यासाठी त्यांनी बनवलेली यंत्रं कुचकामी ठरली आहेत. आणि हाच मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणतात, "आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत हे कबूल करणं, हीच तर निरुपयोगी गोष्टी बनवण्यामागची खरी मजा आहे. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे, असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो. टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल, पण आपण निदान प्रश्न तरी विचारला, हे महत्त्वाचं."
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:57
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for Why you should make useless things | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for Why you should make useless things |